Bablu Wankhede PATIL

प्रथम_वंदन_माता_पित्याला...
#मातीच्या_गोळ्याला_कुंभार_जसा_आकार_देतो
#तसा_तुम्ही_माझ्या_आयुष्याला_आकार_दिलात_आणि #संस्कारांचं_अमृत_पाजून_त्यात_जीव_ओतलात_माझ्या_अस्तित्वाचं_सारं_श्रेय_तुमचं...

#गुरूपौर्णिमेचे_हार्दिक_शुभेछ्या...💐💐...

माऊली...
आषाढ़ी एकादशी निमित्त प्रति पंढरपुर ( वाळूज पंढरपुर ) येथे स्वछता मोहिम ..
#राम_कृष्ण_हरि

#विनोद_भैय्या_पाटिल व
सर्व मराठा बांधवांना शुभेच्छा...
केलेल्या प्रयत्नांना मिळालेले यश हे नेहमी अश्याच प्रकारे मिळावे व यामुळे आपल्या प्रगतीस अजून चालना मिळावी....!!!!

#मराठाआरक्षण 💪💪💪💪

आपणांस व आपल्या परिवारास
*दसरा-विजयादशमीच्या*
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
🌿🌿

शुभचिंतक :- *विजय(बबलू) वानखेडे & परिवार*

[07/17/18]   चार पैसे खर्च केल्याशिवाय दोन पैसे मिळत
नाहीत..."
"शंभर लोक जोडल्याशिवाय चार लोक हाथ देत
नाहीत..."
"उगीचच काही करतो म्हणून केले तर
प्राणी सुधा जवळ येत नाहीत..."
"आणि नाविन्यपूर्ण केल्याशिवाय कोणी कौतुक
करत नाहीत☝

Profile pictures

Bablu Wankhede PATIL

औरंगजेब १६८१ साली आपले ६ लाखांचे सैन्य व अब्जावधीच्या संपत्तीसह दख्खन जिंकण्यासाठी दक्षिणेत उतराला . मोगली सैन्यामध्ये त्याकाळी जगातील सर्वश्रेषठ लढवया जाती म्हणून नामांकीत असणार्या तुर्क, इराणी, अफगाणी, उझबेकी, कझाकी, मोंगल, पठाणी, काबूली, पंजाबी, राजपूत, जाट, गुज्जर तसेच अरब जातींच्या खुंखार योध्यांचा भरणा होता. १-२ महिन्यात मराठा साम्राज्याला किड्या मुंगीसारखे चिरडायचे व पुन्हा दिल्लीकडे रवाना हो़यचे असा डाव औरंगजेबाने आखला होता. परंतू मराठ्यांनी व नियतीने त्याच्यासाठी काही वेगळाच डाव मांडून ठेवला होता, मुठभर मराठा सैन्याने आपल्या अलैकिक पराक्रमाच्या व विजिषू वृत्तीच्या बळावर औरंगजेबाचे सर्व मनसूबे उधळून लावत त्याला ह्या महाराष्ट्राच्या मातीत झुंज झुंज झुंजवला, थक थक थकवला व ह्या पावन मातीचा तसूभर कणही जिंकू न देता ह्या मातीतच गाडला.. राष्ट्भक्तीने प्रेरीत झालेल्या मराठ्यांनी अत्यंत तुटपुंज्या साधनसामग्रीसह ६ लाखाच्या बलाढ्य मोगली सैन्याला दिलेल्या ह्या २७ वर्षांच्या अभूतपुर्व लढ्याला आज देखील जगाच्या इतिहासात तोड नाही... असे म्हटले जाते की औरंगजेब इतकी मोठी जातीवंत फौज, प्रचंड दाहक तोफखाना व अब्जावधीची दौलत घेऊन जगाच्या पाठीवर कुठेही व कोणा विरूद्धही लढला असता तर त्याने ५-६ वर्षात अर्ध्याहूनही आधिक जग जिंकले असते.
म्हणूनच तर मराठ्यांच्या ह्या शौर्यगाथेचे पोवाडे जगाभरात आजही गायले जातात...

कारण अख्ख्या जगाला माहित आहे...

पुरणार आणि उरणार
फक्त मराठाच !!

Bablu Wankhede PATIL

Bablu Wankhede PATIL's cover photo

छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यात झाला. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी झाले. 25 मार्च 1689 रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता, त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. सन 1694 साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. 9 जून 1696 रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.
सन 1700 साली जिंजी मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखारखानने सर्वांची मुक्तता केली. 2 मार्च 1703 रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये धनाजी जाधव, बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी मात्तबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन 1705 साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनविली.
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली.
सन 1705 मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्‌या बळकट केली.
सन 1707 साली औरंगजेबाचा औरंगाबादजवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी मराठी राज्यात भाऊबंदकी सुरू व्हावी म्हणून शाहूंची सुटका केली आणि त्यांच्या डोक्‍यात ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. परिणामी, ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला. 12 ऑक्‍टोबर 1707 रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूंचा विजय झाला.
सन 1708 मध्ये शाहू महाराजांनी ताराबाईंचा पन्हाळा घेतला; परंतु पुढच्या चारच महिन्यांत सावंतवाडीच्या खेम सावंताच्या मदतीने ताराबाईने पन्हाळा हस्तगत करून 1710 मध्ये शिवाजी प्रथम (कोल्हापूर) सार्वभौम राजे म्हणून जाहीर करून कोल्हापूरच्या स्वतंत्र राज्याची द्वाही फिरविली. तिथेही काही काळाने त्यांच्या पदरी अपयश येऊन आपल्याच सवतीच्या व सावत्रपुत्राच्या कैदेत राहवे लागले. पुढे शाहुंजवळ साताऱ्यास त्या बऱ्याच वर्षे होत्या. परंतु, शाहू हयात असल्याने राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याचा वा राजकारण खेळण्याचा त्यांच्यावर प्रसंगच आला नाही. पुढे शाहूंच्या पश्‍चात मात्र त्यांनी सातारा दरबारची सूत्रे आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. त्याकरता खऱ्या खोट्या नातवाची उभारणी केली.
ताराबाई कालीन पत्रव्यवहार अभ्यासताना असे लक्षात येते कि, समस्त मराठशाही व पेशवाईत ताराबाईंच्या योग्यतेची दुसरी राज्यकर्ती स्त्री झालीच नाही. राजारामच्या निधनानंतर डोईजड सरदारांना सांभाळून तिने मोगलांशी शक्‍य तितका संघर्ष केला.
पेशव्याशी संघर्षही केला. पण कोल्हापूरकर संभाजींच्या कैदेत पडल्यापासून सन 1714 ते शाहूंच्या निधनापर्यंत म्हणजे सन 1749 पर्यंत जो सक्तीचा राजकीय संन्यास ताराबाईस घेणे भाग पडले, त्यामुळे तिला पेशव्याचा समर्थपणे मुकाबला करता आला नाही. या प्रदीर्घ काळात छत्रपती, पेशवे, उर्वरित प्रधानमंडळ, सरदार, निजाम, मोगल आदींचेचे राजकीय संबंध इतके बदलले होते की, ताराबाईंच्या पदरी हार येणे अपेक्षितच होते !

Bablu Wankhede PATIL's cover photo

Bablu Wankhede PATIL

आपल्यापैकी बर्याच जणांना देशाच्या खर्या
सुपरमॅनची ओळख व्हावी म्हणून हे लिहितोय.
तुम्हाला गर्व वाटेल या माणसाचा.
नाव - अजित डोवल. दहशतवाद्यांचा कर्दनकाळ. भारताचा ढाण्या वाघ. यांच्या
नावाने ९९% दहशतवाद्यांच्या चड्डया ओल्या होतात.
आधी IPS, नंतर रॉ एजंट म्हणून पाकिस्तानात ७ वर्ष काम,
नंतर इंटेलिजेंस ब्यूरोचे डायरेक्टर आणी आता नरेंद्र
मोदी सरांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार.
अगोदर हल्ला झाला की आर्मी
परवानगी मागायची आणी आदेश
येईपर्यंत वाट बघत बसायची.
आता कोणी दगड मारला तर गोळी घालते
आणी गोळी मारली तर बॉम्ब.
कारण सरांनी सुट दिलीय, कारण त्यांच मत आहे,
कागदी सोपस्कार नंतर, जवानंचा जीव जास्त
महत्वाचा.
आता सर ७१ वर्षाचे आहेत, पण कुठेही हल्ला झाला तर
दिल्लीत बसून आदेश न देता स्वत: युद्धभूमिवर जातात.
ज्या पिढीचे शाहरुख, सलमान हे हिरो आहेत त्या
पिढीला, देशाचे खरे हिरो माहीत व्हावे म्हणून हे
लिहितोय.
या भारताच्या जेम्स बॉन्डला मानाचा मुजरा

!! जय शिवराय !!

बाबांचा मला कळलेला अर्थ...
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतः च्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून
मुलांसाठी झ़टणार अंतःकरण...
FATHERS DAY च्या मनापासून शुभेच्छा....

एक पोलादी मानसिकतेची स्त्री जिने अत्यंत प्रतिकूल काळाशी झुंज देत अंधारमय भूतकाळाच्या मुसक्या आवळून उज्वल भविष्यचा वेध घेणारा युगंधर महापुरूष घडवला... जिने आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या बळावर एक नाही दोन नाही तर तब्बल पाच पाच सुलतानशाह्या सुरूंग लावून पाताळात गाडल्या... जिने आपल्या कणखर बाण्याने व करारी दरार्याने गुलामीच्या काटेरी शृंखला तहसनहस करत हिंदूस्तानला यवनी गुलामगिरीतून मुक्तता मिळवून दिली.. ती आई जिजाऊ आजही ह्या जगती जागृत आहे.
जय जिजाऊ.....!
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता!
जिवंतपणा, जागेपणा, बाणेदारपणा, ईश्वरार्पणवृत्ती
याच गुणसमुच्चयाचं सगुणरूप असलेल्या जिजाबाईसाहेबांचे पोटी जन्म घेऊन असं एक हिंदवी- स्वराज्य आपण आम्हाला दिलत
सन १६०५ मध्ये फर्जंद शहाजी राजे आणि जिजाऊ यांचा विवाह झाला. जो पर्यंत जिजाऊ सिंदखेडला होत्या तोपर्यंत उंबरठ्याच्या आतच त्यांचे जग लग्न झाल्यावर त्या दौलताबादला आल्या तेव्हा त्यांना चौफेर माजलेली बादशाही मनमानी समजली , सुलतानशाही चा हैदोस त्यांना समजला.
कत्तली, आगीचे प्रलय, देवळांचे पतन ह्या गोष्टी पाहून त्यांचे मन भरून आले त्यातच फर्जंद शहाजी राजांनी आदिलशाही विरुद्ध बंड करून स्वराज्याचा मार्ग धरला आणि जिजाऊंच्या मनात स्वराज्यच बहरू लागले. त्यावेळी शिवबा राजे आऊसाहेबांच्या पोटात होते आणि जणू स्वराज्याचेच गर्भ संस्कार त्यांवर झाले.
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
घोड्यावरून दौड करावी, तलवार कमरेला लटकवावी. गडाचा गार वारा खूप प्यावा कड्यावर उभे राहून खालची माळवद डोळे भरून पहावीत.असे डोहाळे आई साहेबांना होते आणि ते नियतीने पुरविले देखील.
हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती ह्याच मातेने घडविले
ह्या मातेस कोटी कोटी प्रणाम
तुम्ही नसता तर,नसती दिसली अंगणात तुळस,
तुम्ही नसता तर,नसते दिसले मंदिरांचे कळस.
तुम्ही नसता तर,सुवासिनींच्या नसते कुंकू भाळी,
पतीव्रतांच्या किंकाळ्या मग,विरल्या असत्या रानी....

रयत अन्यायाने ञस्त असताना त्या रयतेला उज्वल भविष्य देणारा युगषुरूष देणाय्रा,

शिवरायां बरोबर या मातीत सुद्धा ज्यांनी संस्काराचे बिजारोपण केले त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन....

माँसाहेब_मुजरा🚩🚩🚩

शिवाजी राजा हा अप्रतिम सैनिक होता . शासन कलेत तो निपूण होता . सदगुणी आणि धर्मशील व्यक्तींचा तो मित्र होता , त्याचे नियोजन हुषारीचे आणि कार्यवाही चिकाटीची असे , तो सर्वांशी विचार विनिमय करी, मात्र निर्णय त्याच्या मनातील उद्देशाला सुसंगत असाच घेई, त्याच्या मनातील उद्देश त्याच्या कार्यवाही नंतरच स्पष्ट होत असे .
जे. स्कॉट याने शिवाजीराजांचे गुण वर्णन केलेले आहे
शिव सकाळ 🚩

चंदनखोऱ्यातील महादुर्ग नरनाळा
सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात फिरून राकट-कणखर महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाची दिव्य प्रचिती घेतली आणि दुर्गभ्रमंतीचा पायंडा नव्याने सुरु झाला. जागतिक वारसा असलेला असा आपला विविधरंगी, असाध्य सह्याद्री हा भटक्या भक्तमंडळींचे हक्काचे सेकंड होम. वेस्टर्न घाट म्हणून नावारूपास आलेल्या सह्याद्री च्या मानाने इस्टर्न घाट तसा दुर्लक्षित राहिला, तो चर्चेत राहिला नक्षलवादी कारवायांनी त्यामुळे इकडे येण्यास कुणी धजावत नाही. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील सातपुडा पर्वतरांग आणि जोडून असलेल्या भामरागड, चिरोली, घाईकुरी, मेळघाट, चिंचघाट या डोंगररांगा तशा कुणाच्या खिजगिनतीत नसलेल्या अशा दुर्लक्षित. सह्याद्रीच्या रांगांना समांतर असलेल्या आणि भौगोलिक दृष्ट्या प्रगत शहरांपासून दूर अशा विदर्भातील डोंगरराजीत तब्बल २००० वर्षांचा प्राचीन इतिहास असलेले किल्ले आणि काही प्रसिद्ध अभयारण्ये आहेत. भंडारा, अकोला, इंद्र्नगरी अमरावती आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या विदर्भातील महत्वाच्या जिल्ह्यात काही अनगड आणि भव्य किल्ले ठाण मांडून बसले आहेत. मात्र या किल्ल्यांच्या बाबतीत असलेले औदासिन्य आणि इथे पाचवीला पुजलेले मागासलेपण यामुळे इथले किल्ले त्यामानाने तसे दुर्लक्षित राहिले. ‘ना दुर्गप्रेमींचा ओघ ना सरकारी आशिर्वाद’ यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील किल्ल्यांवर सहसा कुणी फिरकत नाही, म्हणूनच कि काय इथल्या किल्ल्यांचा रुबाब आणि तोरा अजूनही टिकून आहे. मागे एकदा मुंबईचा ‘हाडाचा ट्रेकर’ उपेंद्र क्षिरसागर म्हणाला, अरे सातपुडा रांगेत नरनाळा नावाचा किल्ला आहे तब्बल ३६० एकरात पसरलेला एक गिरिदुर्ग आहे, जबरदस्त किल्ला आहे राव.. जाऊ या आपण. मग जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी फक्त नरनाळा दिसू लागला आणि मराठवाडा मोहिमेत वाट वाकडी करून नरनाळा पाहण्यासाठी निघालो.

अकोला जिल्ह्यातील पूर्व-पश्चिम वाहणारी पूर्णा नदी हि मुख्य जीवनदायिनी, पुढे या नदीला विद्रुपा, काटेपुर्णा, मोर्णा या नद्या येवून मिळतात. अकोला जिल्ह्यात सातपुडा रांगेतील डोंगराळ भाग, अजंठा रांगेतील तसेच गाविलगड डोंगराळ प्रदेशातील काही भाग येतो. अकोला जिल्ह्याच्या सीमेवर मेळघाट अभयारण्य सुरु होते, तसेच काटेपुर्णा अभयारण्य देखिल साग, ऐन, खैर, अंजन अशा वृक्षराजींनी नटलेले आहे. मराठवाड्याच्या मानाने तसा विदर्भ नैसर्गिक दृष्ट्या उजवा असा आहे. अकोला जिल्ह्यात अकोला, बाळापुर आणि नरनाळा असे तीन किल्ले आहेत यातील अकोला किल्ला उर्फ असदगड हा नगरदुर्ग आहे..

बाळापुरचा किल्ला: मन आणि म्हैस नदीच्या संगमावर उभा ठाकलेला बाळापुरचा किल्ला नक्षीदार दरवाजा मुळे प्रसिद्ध आहे. या बाळापुर किल्ल्यापासून धरणाच्या अलिकडे एक नक्षीदार शिल्पकलेने उभारलेली २२ खांबांची छत्री आहे, ती मिर्झा राजे जयसिंग याने बांधल्याचे इतिहासकार सांगतात. मन आणि म्हैस (नद्या) आणि या दोघांच्या कात्रीत सापडलेला बाळापुरचा किल्ला पाहून अकोल्यातील नगरदुर्ग पाहण्यास निघालो. औरंगजेबाने त्याचा दिवाण असदखां याला अकोला हे गाव इनाम म्हणून दिले त्याने १६९७ मध्ये इथे असदखानाने अकोला गावाच्या चौबाजूंनी कोट चढविला तो म्हणजे अकोल्याचा असदगड किल्ला. किल्ल्याला एकूण चार दरवाजे असून दहीहंडा वेस, बाळापुर वेस, अगरवेस, गजवेस या नावाने प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणे काही उंच आणि भक्कम बुरुज बांधले त्यांना असद बुरुज, पंच बुरुज अगरवेस बुरुज असे म्हणतात. यातील पंचकोनी महाकाय असद बुरुज हा उंचीने आणि आकाराने थोरला आहे. सध्या उरलासुरला किल्ला आणि इतिहासाचे अवशेष याच भागात पाहता येतात. उर्वरित किल्ला पहायचा असल्यास दुर्गंधी आणि गल्लीबोळातून वाट काढून पाहावा लागतो. किल्ल्याजवळून वाहणाऱ्या लहानग्या नदीचा मात्र सध्या शहरात नाला झाला आहे.

अकोल्याहून साधारण ४८ कि.मी. वर अकोट शहर आणि तिथून शहराच्या मध्यातून डावीकडे जाणारा नरनाळा अभयारण्याचा रस्ता आहे. अकोट सोडलं तशी हि मेळघाटची डोंगररांग दिसू लागली आणि एका रोमांचक भटकंतीला सुरुवात झाली. अकोट- पोपटखेड-शहानुर मार्गे (२३ कि.मी.) भटखेडा गावी पोहोचलो आणि इथे चौकात डावीकडचा रस्ता नरनाळा अभयारण्याकडे जातो.. तिकडे निघालो.. शहरी धकाधकीपासून असा दूरच्या वाटांचा प्रवास सुरु झाला. समोर हिरव्याशार डोंगरांचे पदर, त्यांना लगडलेले ढगांचे पुंजके आणि पाठीची हाडं खिळखिळी करून टाकणारा रस्ता.. अर्ध्या पाउण तासात नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो तोवर साडेचार वाजले होते. संध्याकाळच्या आत किल्ला पहावं म्हटलं तर किल्ला पाहण्याची वेळ दुपारी ३ ला संपते असे इथल्या सुरक्षारक्षकाने सांगितले.. मग ‘इथेच टाका तंबू’ असे म्हणून नरनाळा वन्य जीव अभयारण्यातील वनखात्याने सुरु केलेल्या पर्यटक निवासात मुक्काम केला. इथे तीन माणसांसाठी टेंट – ७०० रु आणि बंकर बेड ६० रु प्रतिमाणशी दिल्यास मुक्कामाची जंक्शन सोय होते. सहकुटुंब अगदी निवांत रहावे अशी हि सुंदर जागा आहे पण त्यासाठी शहरी नखरे चार दिवस बाजूला टाकण्याची मनापासून तयारी हवी. शहरी अंगवळणाची कात टाकून इथे आल्यास एका मुक्त आणि दुर्गम निसर्गाविष्काराची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही.

मूळ नरनाळा किल्ला आठव्या शतकात हस्तिनापुर येथील पांडवकुळातील राजा नरेंद्रपुरी याने बांधला, त्यानंतर दहाव्या शतकात राजा नरनाळा स्वामी या राजाचे इथे शासन होते. नरनाळा स्वामी हा ‘राजा वैराट’ आणि ‘राजा इल’ यांच्या काळातील समकालीन राजा होता. इ स १४३५ मध्ये बहामनी राजा अहमदशाह याने नरनाळा जिंकला आणि गाविलगड आणि नरनाळा या दोन किल्ल्यांची डागडुजी केली. पुढे बहामनी १४९० मध्ये फतेउल्लाह इमाद उल मुल्क याकडे या किल्ल्याची जहागिरी आली आणि तद्नंतर बहामनी राज्याची शकले होताच इथे इमाद उल्क मुल्कचा इमादशाह झाला. मुघलशाही, कुतुबशाही, निजामशाही. आदिलशाही, बेरदशाही तशी हि इमादशाही. मुर्तझा निजामशाहीचे आक्रमण होण्यापूर्वी इमादशाहीने नरनाळा आणि गाविलगडावर सुमारे शतकभर राज्य केले.. पुढे मुघलशाहीने इथे सत्ता प्रस्थापित केली, नंतर पेशवाईच्या सुरुवातीच्या काळात मराठ्यांनी इथे भगवा फडकाविला आणि नागपूरच्या परसोजी राजे भोसले यांना इथली सुभेदारी मिळाली.. असा ह्या गडाचा संक्षिप्त इतिहास.. किल्ल्यावरील नौगज तोफेवर असलेला १००० वर्षापूर्वीचा फारसी शिलालेख तसेच महाकाली दरवाजावरील अज्ञात भाषेतील विशाल शिलालेख ह्या इथल्या इतिहासाची काही ठळक पाऊलखुणा..

नरनाळा किल्ला हा समुद्रसपाटीपासून ३१६० फूट उंचीवर असून जवळपास ३६० एकरात हा किल्ला पसरला आहे. किल्ल्याच्या दोन टोकांमधील अंतर हे साधारण ३.५ कि.मि. इतके लांब आहे, किल्ल्याचा परीघ अदमासे २२ मैलांचा आहे. नरनाळा किल्ल्यावर लहान-मोठे असे मिळून एकूण ३०० हून अधिक बुरुज आहेत आणि किल्ल्याला ६ बुलंद दरवाजे आहेत तसेच २०-२२ लहान दरवाजे आहेत. सध्या किल्ल्यावर थेट गाडी जाते पण रस्ता खराब असल्याने ती अलीकडे उभी करून चालत जावे लागते..

फॉरीस्टाच्या ऑफिसात रीतसर परवानगी मागून.. ऑफीशियल गाईड ठरवून निघालो.. पवार साहेब म्हणाले कि गाडी घेवून जा वर बुरुजापर्यंत म्हणजे जास्तित जास्त गड बघता येईल.. आमचे पवार साहेब.. “मेळघाटातल्या सागासारखे टणक, वाणीने मेळघाटातील मधासारखे मधाळ आणि आपल्या धडाकेबाज कर्तुत्वाचा दरवळ चंदनासारखा दूरवर पसरवणारे आमचे मेळघाटातील पवार साहेब..” पवार साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून लाजवंती ने मेळघाट मध्ये निघालो.. अरण्यात जेमतेम १०० मिटर पुढे गेलो असू आणि मोरांच्या जोडीने दर्शन दिले.. कॅमेरा बाहेर काढे पर्यंत डावीकडच्या डोंगरातून पसार झाले.. जंगलझाडीतून पुढे जाताच मोटोक्रॉस रस्ता सुरु झाला आणि लाजवंतीचं ऑफ रोड ट्रेनिंगही.. अन्ना माशाळकर रस्त्यावर उतरून दिनुभाऊना ऑफरोडींग चे ट्रेनिंग देऊ लागला.. अरे डावीकडे दाब..!! अरे येवू दे सरळ..!! अरे फुल्ल मार फुल्ल..!! हे असं चाललं होतं.. इथे अन्ना अचानक डायरेक्टर आणि दिनुभाऊ नायकाच्या भूमिकेत शिरला होता..

ऑफरोडींग थरार पोलो मधून अनुभवत एके ठिकाणी “आता जीप शिवाय पर्याय नाही..!!” असा खंगरी रस्ता सुरु झाला.. तशी गाडी उभी करून गाडीरस्ता सोडून पायवाटेने गडावर निघालो.. २० एक मिनिटांच्या खड्या चढण पार केल्यावर गडाचा पहिला दरवाजा आणि उजव्या बाजूची उत्तुंग तटबंदी दृष्टीक्षेपात आली.. तसा पावलांचा वेग वाढला आणि वाघ दरवाजात येवून पोहोचलो.. गड सर केल्याची पहिली पावती इथे मिळाली एवढा हा दरवाजा सुंदर होता.. दरवाजाच्या बाह्य कमानीच्या दुबाजूस व्याघ्र प्रतिमा कोरल्या असून, मुघल स्थापत्यशैलीची नक्षीदार छाप या दरवाजावर पडली आहे.. आत दोन्ही बाजूस ३-३ देवड्या,.. त्यात कोनाडे आणि उजवीकडे २ एक फुटी चिंचोळ्या भुयारी पायऱ्यांचा रस्ता एका मंदिरात घेवून जातो.. पण भुयारी मार्गात दगड ढासळल्याने इथे जाण्याचा अन्नाचा प्रयत्न फसला आणि मग दरवाजाच्या आतील बाजूस उजव्या अंगाने वर जाणाऱ्या पायऱ्यांनी दरवाजाच्या माथ्यावरील तटबंदीवर आलो.. इथून चंदनखोऱ्याचे भव्य दिव्य असे पहिले दर्शन घडते.. ह्याच साठी केला होता काल कृष्णविवरांचा प्रवास..!! पण ह्या नजाऱ्याने डोळ्यांचे पारणे फिटले.. छातीइतक्या गवतातून पुढची पायवाट जात होती तिकडे निघालो.. मेळघाट चा किल्ला पाहण्यासाठी गाईड सक्तीचा असल्याने अनायसे स्थानिक भाषेतून गडाचा इतिहास बोलका होणार होता.. गाईड ‘श्री. हिरासिंग जव्हारकर’ विशीतले तरुण तडफदार पोरगं त्याच्या अनुभवातून नरनाळा किल्ल्याचे दर्शन घडवू लागलं..

माह्ये नाव हिरासिंग हे.. हिरासिंग जव्हारकर.. माह्ये गाव हे शहानुर.. भटखेड्यातून ५ किलोमीटर.. शक्कर तलावाची बाबतीत मी तुम्हाले सांगतो.. की शक्कर तलावाचे ते पानी आह्ये ते पानीमध्ये लई शक्ति हे.. ते शक्ती मा राजाचा.. नळ राजा ते अन त्याचे राणी हे.. अंबा राणी.. ते राणीचं नाव हे अंबा.. ते राणीचा ते जेवरात-गेवरात ते हाये.. ते तलावामध्ये टाकून देलं.. ते अंग्रेज हे ना.. ते राणीवं (राज्यावर) हमला केला होता पण राणीनं ते जेवरात-गेवरात शक्कर तालाबमध्ये फेकला.. आणि ते पाणीचे शक्ति हटत नाई.. म्हणजे तिथे जो कुत्तर देव आह्ये.. ते लोकं येतेत त्याचे दर्शन करते.. दर्शन गिर्षण आणि पाणीचा (महिमा) इतका आह्ये कि ते आंघोळ केलात कि ते ठीक होतं.. कुत्रं चावला की.. तर ते पानीची शक्ति तेवढं हाये.. ते शक्कर तालाव..

अधून मधून हिरासिंग ची मुलाखत सुरूच होती.. गडावर आणखी पाहण्यासारखं काय काय आहे?
ते महाकाली दरवाजा (आ)हे.. वाघ दरवाजा (आ)हे.. अं अं अं.. बारुदखाना (आ)हे.. अं अं अं.. हमाम (आ)हे म्हणजे राणीचं होतं ते.. चंद्रकांत : साबण आहे ते.. अं अं अं.. साबणाचं नही.. राणीचं साबण म्हणजे चंदनचं साबण होते त्याचं.. आन तिकडे (उजव्या बाजुला) जाफरबाद आह्ये.. जाफरबाद किल्ला.. आणि इकडे (डावीकडे) पॉइंट तेलियागड.. म्हनजे राजगड किल्ला.. आन आकोट दरवाजा.. अन तीन तोफ आह्येत.. एक नौगजी तोफ.. दोन एक बांगडी तोफ.. पण खाली लहान.. आणखी एक गुल्लर घाट पॉइंट.. आणि तिकडे एक चेतलीबाबाचा टेकडी (आ)हे.. आणि समोर तिथे मंदिर आहे म्हनजे गुफासारखा (आ)हे.. शिवमंदिर.. धारगड तेचं नाव..

थोडसं जाफराबाद आणि तेलियागड किल्ल्याविषयी सांगा?

ते जाफरबाद किल्ला तिकडे ते म्हनजे.. तिकडे जनवरचा लई खतरा (आ)हे.. म्हणून तिकडे नो एन्ट्री केला ये.. जनावर तिकडे वाघ (आ)हे.. वाघाचे पन.. जास्त तून नाही.. पण अस्वल आये.. बिबट (आ)हे.. पण अस्वलची लही भिंती (भिती) आहे.. अंगावरंच येतं ते.. ते जरा तिकडे दाट जंगल (आ)ह्ये.. म्हणून तिकडे नो एन्ट्री केला ये.. तुमाले दाखवायची काय हरकत नव्हती.. चौकीदार ची परमिशन घेवून आपन गेलो असतो जाफराबाद पॉइंटले..!! ‘जाफराबाद किल्ल्यावर काय काय आहे?’ तेच्यावर.. अं.. म्हणजे.. मंदिर आह्ये.. ते आपला बजरंगबलीचं मंदिर (आ)ह्ये..आन तालाब आह्ये ती चार आहे.. शक्कर तलावसारखे चार आहेत ती.. आणि बुरुज (आ)ह्ये.. ते सहा हाये.. तोफ नाही तथी.. पण लई खतरा आह्ये तिकडं..

आता तेलियागड या उपकिल्ल्याबद्दल आम्हाला सांगा?

त्या ती एक.. आणि कुठलं एक पीरबाबा हाय.. आं तेलियागड वर.. नाही जाफराबाद मध्ये.. आणि एक होतं ते आपला दुर्गामा(ता) चे ते थोडी मूर्ती होते.. ते दुर्गामाता चे मूर्ती तोडले आता ते.. अर्धेच होते ते.. हां.. दगडातली मूर्ती.. आज फक्त त्याचा मंदिर होते तिकडे.. बस एवढं पाह्येल हे मी जाफराबाद.. पूर्ण हिंडेल नाही मी..

तेलियागड मधे पायऱ्या (आ)ह्ये.. बावन पायरी आहे तथी (तिथे).. आन.. बावन पायरीत मधी.. ते बावन पायरी खाली जाते.. ते पायरीतून खाली जाते अन उतरते आता.. ते आपला चेतलीबाबाचा दर्गाचा दिसतो आपल्याला.. ते पायऱ्यातून.. आणि समोर आपन जातो ते शिवबाबाचा गुफा आपल्याले दिसतो (धारगड).. आणि तेलियागडले दरवाजा (आ)ह्ये.. मोठा दरवाजा.. कमळचं फुल आह्ये.. दोन्ही बाजूला.. कमळ फुल.. पण दोन अलग अलग प्रकारचं (आ)ह्ये.. जसं शाधू दर्ग्यात कसे कमळचे फुल आह्ये.. ती तसंच म्हणजे त्या प्रकारे आह्येत.. आन.. घोड्याचे तथी (तिथे) चित्र दिलाय.. आं.. डावीकडं.. ‘सजवलेला घोडा आहे कि साधा आहे..?’.. ते तथी गोठ्यात च बांधेल हाय.. साधा (आ)ह्ये.. आपण वाघचं पाहिलं नाही.. ते चित्र दिलाय त्याच्यावर.. बस एवढं पाह्यलं.. ते मुसलमानांनी नाव दिलं तेलियागड.. आमी लोग त्याले राजगड म्हनतो..

आमची भटकंती साधारण अशी झाली.. वाघ दरवाजातून पुढे जाताच तीव्र चढाई सुरु झाली आणि ३०-४० पावलांवर गडाची दुसरी तटबंदी दिसू लागली.. इथला बुरुज मात्र अतिविशाल गटात मोडणारा असा धिप्पाड बुरुज आहे.. हिरासिंग ला विचारलं बाबा काय आये इकडे.. महाकाली दरवाजा.. बुरुजाला वळसा मारून उजवीकडच्या पायऱ्या चढून गेलो आणि आत एक देखण्या शिल्पकलेचे पैलू अंगाखांद्यावर मिरवणारा दांडगा दरवाजा नजरेस पडला.. आजवर पाहिलेल्या गडकोट दरवाजामध्ये महाकाली दरवाजा अग्रस्थानी असेल यात शंका नाही.. म्हणजे बघा.. दरवाजाची आखीव-रेखीव कमान.. ठिकठिकाणी असलेल्या शिल्पपट्टिका.. राजबिंडे नक्षीदार खांब.. दुबाजूस कोरीव रथाच्या मखरीसारखे सज्जे.. आणि कमानीवरचे दोन शिलालेख.. यातील भाषा मात्र फारसी नाही हे नक्की.. ती कोणती भाषा आहे हे फारसे ज्ञात नाही.. पण कॅलीग्राफीचा सुंदर नमुना म्हणजे हा शिलालेख.. फक्त इथे अक्षरे कातळावर कोरली आहेत हाच काय तो फरक.. कातळकोरीव कॅलीग्राफी.. महाकाली दरवाजातून आत आलो आणि डावीकडे निघालो.. गडाचे अंतरंग पाहायला.. गडावर पाहण्याचे अवशेष म्हणजे अंबरमहाल / राणीचा महल.. गडावरील एकूण २२ तलावातील सगळ्यात मोठा तलाव म्हणजेच ‘शक्कर तलाव’.. हत्ती-महाल, अश्वशाळा.. मागील बाजूस असलेल्या विस्तीर्ण तटावरून दिसणारा चंदन खोऱ्याचा मेगा नजारा आणि शक्कर तलावाशेजारी असलेली बाबाजी उर्फ ‘कुत्तर देव’ कि कबर.. याशिवाय बारूद (दारूगोळा) कारखाना-कोठार आणि गडाचे मुख्य आकर्षण अशा ३ बलाढ्य तोफा.. नरनाळा किल्ल्याला तेलियागड आणि जाफरागड हे उपकिल्ले आहेत.. तर हि जादुई सफर करण्यास निघालो.. डावीकडच्या चढणीच्या वाटेने.. वाटेत एके ठिकाणी तेलियागडाची नरनाळा किल्ल्यापासून जरा अलिप्त झालेली माची दिसते.. तेलियागडची माची पाहताना मात्र लोहगडाचा विंचूकाटा आठवल्यावाचून राहत नाही.. तेलीयागडाचे दुरून दर्शन घेवून पुढे निघालो राणीचा महाल दिसला इथे समोरच मोठा तलाव आहे त्याला शक्कर तलाव म्हणतात.. तसेच उजवीकडे तेल-तुपाची विहीर आहे.. या विहिरीत प्रतिध्वनीचा मनमोहक आवाज ऐकू येतो.. महालाच्या डावीकडे हत्ती बांधण्याची जागा आहे.. तलावाला प्रदक्षिणा मारून आपण गुल्लर घाट पॉइंट पाशी येतो आणि इथे दूरवर पसरलेली गर्द वनराई, डोंगरांचे पदर आणि मध्यभागी एका टेकडावर चेतलीबाबा ची समाधी.. आणि मागे धारगड असा मेगा नजारा आहे.. या गुल्लर घाट पॉइंट च्या अलीकडे फॉरेस्टचे चेक पोस्ट आहे.. याला वळसा घालून निघालं कि आपण नौगज तोफेकडे जातो.. एखाद किलोमीटरची रपेट मारून एका कड्यापाशी हि नौगज तोफ आहे.. नऊ गज लांबीची हि तोफ म्हणजे नौगजी तोफ.. एकदम धिप्पाड.. कधीकाळी शत्रूवर तिन्ही त्रिकाळ लक्ष ठेवणारी.. नौगज तोफ.. या तोफेच्या शेजारून एक वाट जाफारागडकडे जाते.. जिथे अस्वलांचा मुक्त संचार आहे..

तोफेच्या मुखाकडे पहात उभे राहिल्यास.. डावीकडची वाट नरनाळा किल्ल्याच्या काठाकाठाने वळसे मारीत पुन्हा शक्कर तलावाकडे जाते.. इथे जाताना बारूद कारखाना.. हमाम आणि जुन्या काळातील पावसाचे पाणी तलावात सोडण्यासाठी केलेल्या मोऱ्या पाहायला मिळतात.. बारूद कारखाना अजून सुस्थितीत असून गचपण वाढल्याने.. आत जाणे जरा अवघड आहे.. हमाम देखिल तीनमजली भिंतीने झाकून टाकला आहे.. दारूकोठारासमोर एक फोरेस्टचा वॉच पॉइंट आहे इथून नरनाळा किल्ल्याची सोंड दिसते मध्ये दरीतली दाट झाडी.. या डोंगरसोंडेवरच पलीकडच्या बाजून वाघ दरवाजा आहे.. अलीकडे नीट पाहिल्यास.. आणखी काही दरवाजे आणि बुरुज पाहायला मिळतात.. इथे पुढे तलावाकाठी एक कमान उन्हं खात उभी असल्याचे दिसते.. या कमानीतून शक्कर तलाव पाहताना त्यात पडलेल्या ढगांच्या प्रतिबिंबाने तर कमळ केली होती.. त्या एकांड्या कमानीच्या सावलीत चार क्षण रेंगाळून.. नरनाळा भटकंती पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले.. आणि पुन्हा खाली निघालो.. चंदनखोऱ्यातील महादुर्गाची (म्हणजे नरनाळा किल्ल्याची) गोंडस आणि विशाल निसर्गाची उदात्त क्षणचित्रे मनात कायमची साठवून.. पुन्हा दुर्गरांगड्या मराठवाड्याकडे.. अजंठा रांगेतील काही दुर्गांची ओळख करून घ्यायला..!!
Original Post & Photos: वाटाड्या - http://vatadya.blogspot.in/2014/01/blog-post.html

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


HUDCO
Aurangabad
431001
Other Aurangabad gyms & sports facilities (show all)
MSB Multifunctional Gym MSB Multifunctional Gym
Shivajinagar Rod Garkhed Parisar Apposite Indian Oil Petrol Pump
Aurangabad, 431009

Vikramaa Institute Of Dance Vikramaa Institute Of Dance
Aurangabad
Aurangabad, ZIP CODE

Life is nothing without Music n Dance because it gives Peace which is really important in this world.....

Mushtaque Shaikh Mushtaque Shaikh
Aurangabad, 431001

Adventure Squad Adventure Squad
Adventure Squad, Opposite To Government Engineering College, Near NCC Canteen, Osmanpura,
Aurangabad, 431005

Dream. Believe. Work Hard. Succeed. Looking for adventure?� You've come at the right place! Connecting people through adventures, amongst nature.

Veromod Veromod
Shop No. 1, Opposite Lota Karanja Masjid, Near City Chowk
Aurangabad, 431001

Exclusive Fashion Wear

CTaurangabad CTaurangabad
First Floo,r Chaudhary Chambers, Opposite Yashwantrao Chavan Natyagruha, Paithan Gate,
Aurangabad, 431001

We are committed to make outstanding Managers, Bankers,Administrators and noble human beings who care for MANKIND...

MGM & Kohm Gymnastics Academy MGM & Kohm Gymnastics Academy
Kaushalya, Second Floor, Khadkeshwar
Aurangabad, 431001

An initiative by passionate team of ex sports persons to promote sports awareness and develop sports culture in society

GYM HOLIC GYM HOLIC
Vitthalachi Daya Plot No.9 Basement Cannought Place Cidco
Aurangabad, 431001

In order to help you achieve your fitness goals, gym holic offers 2 free personal training sessions and a complete section of cardio equipment,free weight

Devgiri UM, Aurangabad Devgiri UM, Aurangabad
Mondha Naka Signal, Jalna Road,
Aurangabad, 431001

UM Aurangabad, RamTara Mobility - a store that works constantly towards Customer Delight.

Dynamic Fitness Dynamic Fitness
Aurangabad
Aurangabad

SRJ Fitness Academy SRJ Fitness Academy
Aurangabad
Aurangabad

#GOVT.. RECOGNISED #Learn Professionally #Train Professionally