Yash Govinda Pathak

Yash Govinda Pathak

Share

2024 - नऊ थर लावणारे मुंबई शहर मधील दुसरे गोविंदा पथक बनण्याचा बहुमान प्राप्त🚩
2024 - PRO GOVINDA - 3rd Rank🏆 इतिहासाचा वारसा, भविष्याकडे वाटचाल

31/12/2025

वडाळा विभागातील दहीहंडी सण आणि गोविंदा खेळ जेव्हा उदयोन्मुख अवस्थेत होता, तेव्हा ज्या ज्या समाजरत्नांनी इथल्या या संस्कृतीला मोठे केले, त्यात प्रेसिलाताईंचे नाव सदैव आघाडीवर असेल.

वडाळ्यातील समस्त गोविंदा पथकांकडून आपणांस भावपूर्ण श्रद्धांजली!

Photos from Yash Govinda Pathak's post 29/12/2025

्रिडा_मंडळ संलग्न ्रिकेट_क्लब आयोजित कै. #वरुण_उत्तम_म्हात्रे. याच्या स्मरणार्थ स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये

🏆 #शिवनेरी_क्रिकेट_क्लब🏆, माहिम यांनी विजेतेपद पटकावले🌟✨

🏆 #मोठ_मोठे_गार_केले_गंमत_मधी🏆 संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.✨

विजेत्या संघांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!🙏🙏🎉🎉

27/12/2025

।। खेळूया त्याच्या आठवणीसाठी 🥹❤️, जिंकूया त्याच्या सन्मानासाठी 🤝🏆।।

21/12/2025

खारगंगा क्रीडा मंडळ यांच्यावतीने आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत यश क्रीडा मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.

सदर स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून यश क्रीडा मंडळाच्या गणेश पाटील याची निवड करण्यात आली.

खारगंगा क्रीडा मंडळाचे सदर स्पर्धा आयोजित खूप खूप आभार! आपण खूप चांगल्यारीतीने सदर स्पर्धा यशस्वी केली.

Yash Govinda Pathak

18/12/2025

धन्यवाद वहिनी 💛❤️ तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठी असुदे..

17/12/2025

येतोय आम्ही लवकरच २०२६ मध्ये नवीन संकल्पना घेऊन आपलाच यश गोविंदा पथक
महाराष्ट्राचा गोविंदा - Maharashtracha Govinda गोविंदा दादर प्रभादेवीचा

Photos from Yash Govinda Pathak's post 17/12/2025

“पुनर्निमित यश क्रिडा मंडळ क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा संपन्न”🚩

समाजसेविका श्रीमती तृष्णा विश्वासराव (वहिनी) यांच्या भक्कम सहकार्याच्या माध्यमातून यश क्रिडा मंडळ क्रीडांगणाची पुनर्निमिती करण्यात आली.

सदर नवीन क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला!

13/12/2025

कथा आमच्या 2025 मधील दुसऱ्या नऊ थरांची!!!

संस्कृती प्रतिष्ठान येथे यशस्वीरित्या नऊ थर उतरवून साधारण रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही कॅसल मिल नाका येथील शारदा प्रतिष्ठानच्या गोकुळ हंडीला पोहोचलो.

अर्थात दहीहंडीच्या दिवशी पाऊस खूपच होता, मात्र आम्ही दिवसभरात लावलेल्या आठ थरांच्या चार यशस्वी ट्रायवेळी आणि नऊ थराच्या एक यशस्वी ट्रायवेळी आम्हाला पाऊसाने म्हणावा तितका त्रास दिला नाही.

मात्र आम्ही कॅसलमिल नाक्यावर पोहोचताच पावसाने अक्षरशः रौद्ररुप धारण केले होते. सोबतच्या फोटोमध्ये तुम्हालाही त्याची तीव्रता कळेल.

मानसिकदृष्टया हजार टक्के सक्षम असलेल्या आमच्या प्रत्येक गोविंदा खेळाडूला तो पाऊस मात्र शारिरिकदृष्ट्या थकवत होता.

साधारण 45 मिनिटे प्रतिक्षा केल्यावर आम्ही कॅसल मिल नाक्यावरील आमची पहिली नऊ थराची ट्राय रचायला सुरुवात केली. ट्राय फॉर्मेशन सुस्थितीत होत होते मात्र पाऊसामुळे प्रत्येक गोविंदा खेळाडूच्या शरिराला एक वेगळेच जडत्व प्राप्त झाले होते. परिणामी आमची पहिली ट्राय कोलॅप्स झाली.

आता मात्र आमचा प्रत्येक गोविंदा खेळाडू पेटून उठला, ते हि तिथल्या भर पावसात!!!🔥🔥🔥

साधारण अर्ध्या तासाच्या अवकाशाने आम्ही नऊ थरांचा दुसरा प्रयत्न सुरु केला. पाऊसानेही आमच्या जिद्दीला आव्हान देण्यासाठी पुन्हा एकदा अतितीव्र रुप धारण केले. जणूकाही कोणीतरी दगडफेक करतंय, इतक्या जोराने पाऊसाचा प्रत्येक थेंब आम्हाला जाणवत होता. मात्र संघर्षाला घाबरणारे आम्ही यशवाले नाही.🚩 प्रत्येकाच्या डोळ्याच्या बुबूळात अक्षरशः रक्त साकळले होते. कारण आमच्या अश्रूचा प्रत्येक थेंब हा आता रक्तात रुपांतरित झाला होता.

पाऊसाने आम्हाला अयशस्वी करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. मात्र आम्ही यशवाले अखेर व्याजासकट यशस्वी झालो.❤

2025 च्या हंगामातील आमची शेवटची ट्राय!
आमचे आतापर्यंतचे सर्वात कठीण नऊ थर.

तळटीप - आमचा नववा थर उठताना अनावधानाने आठव्या थरावरील गोविंदा खेळाडूच्या डोळ्यावर आलेला हॅल्मेट आणि रुमाल जर तुम्हीदेखील नोटीस केला असेल. तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये पिन करुन ठेवलेले पिवळे ह्रदय कमेंट करा.😊👉 💛 Yash Govinda Pathak गोविंदा दादर प्रभादेवीचा ABP Majha

13/12/2025

श्री संस्कृती प्रतिष्ठान प्रभादेवी आयोजित मुंबई शहर कुमार गट स्पर्धा २०२५ चे तृतीय क्रमांक चे बक्षिस पटकावल्या बद्दल सर्वही खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा!
Yash Govinda Pathak

06/12/2025

When कृष्णाची पोरं ask,

Krrish ka gana sunega!!!💛❤️😍

04/12/2025

जेव्हा कोणी आम्हाला आमच्या थराचे फॉर्मेशन विचारतो!😆

04/12/2025

श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address

Mumbai