04/03/2024
आपल्या मंडळासाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट घडली. आपल्या मंडळातील खेळाडू व प्रशिक्षक श्री. कमलेश विकास पालव दि.०३/०३/२४ रोजी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन पंचवार्षिक निवडणूक २०२३- २८ मध्ये श्री साई गजानन पॅनल तर्फे कार्यकारणी सदस्य पदासाठी निवडणूक लढले. यामध्ये एकूण ३९४ अशी समस्त निवडणुकीत दुसऱ्या क्रमाकांची मते मिळवून अद्भुतपुर्व यश प्राप्त केले.त्याबद्दल श्री. कमलेश विकास पालव व श्री.साई गजाजन पॅनल चे आपल्या संपूर्ण जॉली परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !!!
24/02/2024
आजपासून सुरु होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल आपल्या मंडळातील अष्टपैलू खेळाडू कु. अभिषेक नर यांचे हार्दिक अभिनंदन आणि स्पर्धेसाठी मुंबई उपनगर संघाला शुभेच्छा !!!
चला मित्रांनो आपल्या लाडक्या अभिषेक ला आणि मुंबई उपनगर संघाला कमेंट्स मधून शुभेच्छा देऊया
19/02/2024
जोश जॉलीचा...
जल्लोष जोगेश्वरीचा...!!!
आपल्या जॉली क्रीडा मंडळाचा विजयाचा रथ मागील काही अपयशानंतर पुन्हा एकदा विजयाच्या मार्गांवर स्वार झाला आहे ही आपणा सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे.
दि.१४/०२/२४ ते १८/०२/२४ या कालावधीत #मुंबई_उपनगर_जिल्हा_कबड्डी_असोसिएशन यांच्या मान्यतेने #गुरु_गजानन_स्पोर्ट्स_क्लब यांच्या वतीने प्रथम श्रेणी गट या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन विलेपार्ले येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने आपला #जॉली_क्रीडा_मंडळ हा संघ #अंतिम_विजयी संघ ठरला. त्याबद्दल आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत प्रशिक्षक कमलेश पालव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला नामदेव इस्वलकर यांची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. तसेच रजत सिंग व विक्रम जाधव यांच्या चढायांनी प्रेषकांची मने जिंकली , दर्शन राऊळ व दिनेश यादव यांच्या पक्कडी जोरावर सामन्याला रंगत आणली. तर #सचिन सावंत यांनी पहिल्या दिवशी #प्लेयर_ऑफ_दी_डे चा मान पटकवला. तर #दर्शन राऊळ यांची #उत्कृष्ट_पक्कडपटू म्हणून निवड करण्यात आली व िंग यांची #सर्वोत्कृष्ठ_खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे सर्व खेळाडूंचे , प्रशिक्षक , संघ व्यवस्थापक , पाठीराखे व जॉली परिवाराचे #हार्दिक_अभिनंदन 💐💐💐🥇🏆
07/02/2024
#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना जोगेश्वरी विधानसभेच्या #विभाग_अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल #जॉली_क्रीडा_मंडळ तर्फे
#श्री_संदीप_भरत_ढवळे यांचे हार्दिक अभिनंदन 🚩
02/02/2024
आपल्या मंडळासाठी अभिमानाचा क्षण !!!
आपला तुफानी चढाईपटू कु. रजत सिंह याची राष्ट्रीय कुमार गट निवड चाचणी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुमार गटाच्या कर्णधारपदी निवड
तसेच आपला भक्कम बचावपटू कु. दिनेश यादव याची अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा अश्वमेध कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ संघात निवड
01/02/2024
कबड्डी हा एक आव्हानात्मक आणि रोमांचक खेळ आहे ज्यात यशस्वी होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक कौशल्यांची सांगड घालणे आवश्यक आहे. या आवश्यक कौशल्यांवर काम करत मैदानावर आपली कामगिरी सुधारून आपला खेळ पुढील स्तरावर घेऊन जाण्यात आपल्या जॉली संघाला यश आले आहे. याचे मुख्य कारण " संघ म्हणजे एकत्र काम करणाऱ्या लोकांचा समूह नाही. संघ म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवणारे लोक " याच विश्वासाच्या जोरावर पाचव्यांदा आपल्या संघाला जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारण्यात यश प्राप्त झाले आहे ही कौतुकास्पद बाब आहे.
दि.२३/०१/२४ ते ३१/०१/२४ या कालावधीत #मुंबई_उपनगर_जिल्हा_कबड्डी_असोसिएशन यांच्या वतीने प्रथम श्रेणी पुरुष गट या भव्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन विक्रोळी पार्क साईड येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने आपला #जॉली_क्रीडा_मंडळ हा संघ पश्चिम विभागामध्ये #अंतिम_उपविजयी संघ ठरला त्याबद्दल आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.त्याबद्दल समस्त जॉली परिवाराचे #हार्दिक_अभिनंदन...💐💐💐
या स्पर्धेत प्रशिक्षक विशाल राऊळ व कमलेश पालव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला संघाचे अनुभवी खेळाडू नामदेव इस्वलकर यांचा अष्टपैलू खेळ पाहायला मिळाला . तर आपले लाडके खेळाडू अभिषेक नर यांनी पक्कडीच्या जोरावर मैदान गाजवत प्रेषकांची मन जिंकली. संघातील नवीन उभरते सितारे दर्शन राऊळ व विकास चौरसिया यांच्या भरभक्कम पक्कडीची साथ संघास लाभली . संघाचे तुफानी खेळाडू विकी खिलजी यांनी त्याच्या तुफानी चढायांनी रंगत वाढवली. आपले जाधव बंधू विक्रम जाधव व दिनेश जाधव यांची साथ देखील संघास लाभली . तसेच शेखर यादव व सिद्धांत चव्हाण आपण संघावर दर्शविलेल्या विश्वासाबद्दल आपले आभार संघाचे कर्णधार सचिन सावंत व मंडळाचे संस्थांपक श्रीकांतजी बिर्जे आपण दिलेले प्रोत्साहन लाख मोलाचे ठरले.
यांसबरोबर संघ व्यवस्थापक , माजी खेळाडू व संघ पाठीराखे आपले देखील खूप खूप आभार आपली उपस्थिती देखील खूप महत्वाची होती.
जोगेश्वरी माते की जय 🙏🏻
31/01/2024
आपल्या जॉली क्रीडा मंडळासाठी आज दुहेरी आनंदाचा दिवस !!!
आपल्या जॉली क्रीडा मंडळातील प्रतिभावंत व मेहनती खेळाडू कु.दिनेश यादव यांची मुंबई विद्यापीठ अश्वमेध कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
त्याबद्दल समस्त जॉली परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ...!!!
तसेच दिनेश साठी मेहनत घेणारे नामदेव इस्वलकर , कमलेश पालव , श्रीकांत बिर्जे , विशाल राऊळ व रवी सुर्वे यांचे देखील मंडळाच्या वतीने खूप खूप आभार 🙏🏻
31/01/2024
आज आपल्या जॉली क्रीडा मंडळाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवण्यात आपल्या खेळाडूला यश आले आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंददायक व अभिमानास्पद गोष्ट आहे.
आपल्या जॉली क्रीडा मंडळातील प्रतिभावंत खेळाडू #कु._रजत_सिंग याची निवड सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत करण्यात आली आहे. ०१/०२/२४ ते ०४/०२/२४ या कालावधीत हैदराबाद येथे होणाऱ्या ४९ व्या कुमार गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र कुमार गट संघात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. तसेच महाराष्ट्र कुमार गट संघाच्या कर्णधार पदी देखील यांची नियुक्ती करण्यात आली आहे . आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे व मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे देखील आम्हा सर्वांच्या वतीने खूप खूप आभार 🙏🏻
समस्त जॉली परिवाराच्या वतीने कु.रजत सिंग यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!!
तसेच रजत साठी मेहनत घेणारे नामदेव इस्वलकर , कमलेश पालव , श्रीकांत बिर्जे , विशाल राऊळ , रवी सुर्वे यांचे देखील मंडळाच्या वतीने खूप खूप आभार 🙏🏻
14/01/2024
आपल्या जॉली परिवारासाठी या वर्षाची सुरुवात चांगली झाली असे म्हटले तर काही व्हावगे ठरणार नाही. चालू वर्षाची सुरुवात राज्य स्तरीय स्पर्धेने झाली या स्पर्धेत आपल्याला अंतिम फेरीत मजल मारण्यात जरी यश मिळाले नसेल तरी संघाची कामगिरी मात्र कौतुकास पात्र आहे. या वर्षात आपण राज्यस्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी सात्यत्याने करत राहू.
दि. १२ /०१/२०२४ ते १३/०१/२०२४ या कालावधीत #महाराष्ट्र_राज्य_कबड्डी_असोसिएशन व #सातारा_जिल्हा_कबड्डी_असोसिएशनच्या मान्यतेने #श्री_सेवागिरी_महाराज_मंदिर_ट्रस्ट यांच्या वतीने पुसेगाव, सातारा येथे भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने आपला #जॉली_क्रीडा_मंडळ हा संघ राज्यस्तरीय पुरुष गटात #उपांत्य_उपविजयी संघ ठरला. त्याबद्दल आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत प्रशिक्षक विशाल राऊळ व मंडळाचे संस्थापक श्रीकांतजी बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला नामदेव इस्वलकर, अभिषेक नर, रजत सिंग, दिनेश यादव, विक्रम जाधव यांचा झंझावात पाहावयास मिळाला. तसेच #विक्रम_जाधव यांची निवड स्पर्धेतील # सर्वोत्कृष्ट_चढाईपटू म्हणून करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे व सर्व खेळाडूंचे तसेच प्रशिक्षक , संघ व्यवस्थापक , पाठीराखे जॉली परिवार आपणा सर्वांचे #हार्दिक_अभिनंदन 💐💐💐
03/01/2024
आपल्या जॉली क्रीडा मंडळातील प्रतिभावंत खेळाडू कु.रजत सिंग व कु.दिनेश यादव यांची आगामी काळात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या कुमार गट प्रातिनिधीक संघात निवडीसाठी बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या सराव शिबिरात निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!!
तसेच रजत व दिनेश साठी मेहनत घेणारे नामदेव इस्वलकर, रवी सुर्वे, श्रीकांतजी बिर्जे, कमलेश पालव, विशाल राऊळ यांचे देखील मंडळाच्या वतीने खूप खूप आभार 🙏🏻
16/11/2023
मुंबई उपनगर ( पश्चिम विभाग ) कुमार गट प्रातिनिधिक संघात आपल्या जॉली क्रीडा मंडळाचे खेळाडू कु. रजत सिंग , दिनेश यादव व आदर्श लोवरे यांची निवड झाल्याबद्दल जॉली क्रीडा मंडळातर्फे या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
12/11/2023
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔
सर्व खेळाडू, मित्र परिवार आणि हितचिंतक यांना आग्रहाचे आमंत्रण !!!
सालाबादप्रमाणे यंदा ही आपल्या जॉली क्रीडा मंडळातर्फे आपल्या सराव क्रीडांगणाचे पूजन करण्याचे योजिले आहे. तरी आपल्या सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे. सर्वांनी क्रीडांगणावर आज सायंकाळी ७ वाजता पूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती !!! आपल्या सर्वांची आम्ही आणि आपले क्रीडांगण वाट पाहत आहोत.
आपले नम्र
🪔जॉली क्रीडा मंडळ 🪔
08/11/2023
#जोश_जॉलीचा....
#जल्लोष_जोगेश्वरीचा....
कालचा दिवस आपल्या जॉली परिवारासाठी सुवर्ण दिवस ठरला काल आनंदाची व अभिमानाची गोष्ट आज घडली ती म्हणजे मागील काही वर्षांपासून आपणास कुमार गट अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये हुलकावणी देणारे विजेतेपद अखेर आपल्या मंडळाने पटकावले.
दि. ०४ नोव्हेंबर २०२३ ते ०७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन तर्फे ४१ वी जिल्हास्तरीय कुमार गट कबड्डी निवड चाचणी स्पर्धा २०२३ ( पश्चिम विभाग ) चे आयोजन मालाड (पूर्व) येथे करण्यात आले होते.
जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने आपल्या #जॉली_क्रीडा_मंडळ कुमार गट या संघाने पार्ले स्पोर्ट्स क्लब (विलेपार्ले) यांच्या विरुद्ध ३८ विरुद्ध २७ या फरकाने विजय प्राप्त करून #अंतिम_विजयी संघ होण्याचा मान पटकवला.
या स्पर्धेमध्ये नामदेव इस्वलकर व विशाल राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला संपूर्ण संघाकडून पहिल्या फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत सांघिक खेळ पाहावयास मिळाला. उत्कृष्ट चढाया व जबरदस्त पक्कडीच्या जोरावर ही स्पर्धा जिंकण्यात संघास यश प्राप्त झाले त्याबद्दल समस्त जॉली परिवाराचे #हार्दिक_अभिनंदन 💐💐💐 व खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी #खूप_खूप_शुभेच्छा...
#जोगेश्वरी_माते_की_जय 🙏🏻
31/10/2023
🙏ॐ साई राम🙏
महाराष्ट्र राज्य किशोर किशोरी गट राज्य निवड चाचणी कब्बड्डी स्पर्धा दिनांक 5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मानवत, परभणी येथे आयोजित केली आहे. सदर स्पर्धेत आपल्या *मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन* जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिम मुले व मुली असे चार संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत आपल्या *जॉली क्रीड़ा मंडळ,( जोगेश्वरी ) चा खेळाडु *कु. शिवा श्रीकांत बिर्जे * यांची *मुंबई उपनगर किशोर गट* पश्चिम मुले संघात निवड करण्यात आली आहे . तरी मंडळातर्फे खुप खुप *अभिनंदन* व पुढील वाटचालीस *शुभेच्छा* .💐💐
28/10/2023
संकल्प चषक २०२३
भव्य अंडर आर्म बॉक्स क्रिकेट सामने चे विहंगम दृश्य
छायाचित्र साभार :Rutik Murkarr
24/10/2023
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या मैदानाचे आणि गणवेशाचे पूजन करण्यात आले आणि नवीन कबड्डी मोसमाच्या तयारी साठी श्रीफळ वाढवण्यात आले
22/10/2023
४१वी किशोर गट मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धा २०२३-२०२४ या स्पर्धे मधून *जॉली क्रीड़ा मंडळ,( जोगेश्वरी ) चा खेळाडु *कु. शिवा श्रीकांत बिर्जे * यांची *मुंबई उपनगर किशोर गट* संभाव्य संघात निवड करण्यात आली आहे . तरी मंडळा तर्फे खुप खुप *अभिनंदन* व पुढ़िल वाटचालीस *शुभेच्छा* .💐💐
06/08/2023
जॉली क्रिडा मंडळाचा हुकूमचा एक्का विशाल राऊळ अनेक स्पर्धा ज्याने आपल्या अष्टपैलू खेळाने गाजवल्या, मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र कबड्डी मधे ज्याला 'मामा' नावाने ओळखतात असा हा आपला लाडका खेळाडू आता आपल्या व्यावसायिक क्षेत्राची नविन सुरुवात करत आहे. जोगेश्वरी आई चरणी प्रार्थना आहे कि जसं त्याने खेळताना नावलौकिक कमवला तसाच व्यवसायात हि त्याला भरघोस यश मिळून देत.चला तर मग उद्या 07/08/2023 रोजी आपण सर्व आपल्या लाडक्या 'मामा' ला शुभेच्छा द्यायला आवर्जून उपस्थित राहूया.
!!गणपती बाप्पा मोरया!!
15/07/2023
स्व. बाबाजी जामसंडेकर, स्व. मुकुंद अण्णा जाधव आणि स्व. शंकर राव (बुवा) साळवी यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन शिष्यवृत्ती चा कुमार गटाचा मानकरी आपल्या जॉली क्रीडा मंडळाचा खेळाडू कु. रजत सिंह
12/07/2023
संकलन साभार : कु. ओंकार शिंदे
11/07/2023
आज आपल्या जॉली क्रीडा मंडळासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आपल्या मंडळातील कुमार गटातील राष्ट्रीय खेळाडू कु. रजत सिंह याची कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्व. बाबाजी जामसंडेकर, स्व. मुकुंद अण्णा जाधव आणि कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ असे ह्या शिष्यवृत्तीचे स्वरूप असेल. ह्या शिष्यवृत्तीमुळे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ह्यांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप ह्या दोघामुळे रजतचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल ह्यात शंका नाही.. चला आपल्या लाडक्या रजतला कमेंट्स मधून शुभेच्छा देऊया !!!
17/02/2023
जोष जॉलीचा ....
जल्लोष जोगेश्वरीचा...!!!
आज आपल्या जॉलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आपल्या खेळाडूंना यश आले आहे. मागील महिन्यात आपल्या संघास जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारण्यात जे सातत्याने यश प्राप्त होत आहे तेच यश या वर्षातील पहिल्याच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आपल्या मंडळास प्राप्त झाले.
दि. १४/०२/२०२३ ते १६/०२/२०२३ या कालावधीत #महाराष्ट्र_राज्य_कबड्डी_असोसिएशन व #रायगड_जिल्हा_कबड्डी_असोसिएशनच्या मान्यतेने #श्री_सुवर्णं_गणेश_कबड्डी_संघ_दिवेआगर यांच्या वतीने #मा_आदितीताई_ तटकरे ( आमदार श्रीवर्धन विधानसभा) #मा_आमदार_श्री_अनिकेतभाई_तटकरे ( कोकण स्वराज्य संस्था.) यांच्या मार्गदर्शनाखाली #आमदार_चषक_२०२३ चे आयोजन दिवेआगर ,श्रीवर्धन, रायगड येथे भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने आपला संघ #जॉली_क्रीडा_मंडळ कबड्डी संघ राज्यस्तरीय पुरुष गटात #अंतिम_फेरीत मजल मारत #अंतिम_उपविजयी संघ ठरला त्याबद्दल आकर्षक साडेपाच फुट असा भव्य चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये विशाल राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला अभिषेक नर , अनिकेत पाडलेकर , सचिन सावंत , रजत सिंग , विक्रम जाधव , दिनेश जाधव , अल्पेश जोशी , निशाण देवरस यांचा झंझावात पाहावयास मिळाला. अभिषेक नर यांची अष्टपैलू तर सचिन सावंत यांची जबरदस्त पकड्डीतील कामगिरी आपणास बघायला मिळाली तर आपल्या मंडळातील युवा खेळाडू िंग यांच्या अप्रतिम अश्या चढाईने त्यांना प्रेक्षकांचा खेळाडू बनवले त्यासाठी त्यांना #पहिल्या_दिवसाचा_उत्कृष्ट_चढाईपटूचा_मानकरी संपूर्ण स्पर्धतील #सर्वोत्कृष्ट_चढाईपटू म्हणून आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल समस्त जॉली परिवाराचे , खेळाडूंचे , प्रशिक्षक , पाठीराख्यांचे #हार्दिक_ अभिनंदन💐💐💐
09/02/2023
Proud Day for Our as our own bagged in
As we all know that it is just a start of your journey in Professional Career.. we wish you All The Best in your future endeavors
01/02/2023
*🔴 स्पोर्टवोट मुंबई उपनगर कबड्डी चॅम्पियनशिप २०२३ मधील, जॉली स्पोर्ट्स क्लब चे सर्व मॅचेस पाहिले नसतील तर आता पाहा*👇👇
*FINAL* 👇
*JOLLY SPORTS CLUB 🆚 SWASTIK KM*
https://sportvot.com/stream/63d68fdf052a75715cd9b4f4
*SEMIFINAL*👇
*JOLLY SPORTS CLUB 🆚 JAGAR SPORTS CLUB*
https://sportvot.com/stream/63d66934052a75715cd9ad15
*QUARTER FINAL*👇
*JOLLY SPORTS CLUB 🆚 OVALI KM*
https://sportvot.com/stream/63d625ce052a75715cd99477
*JOLLY SPORTS CLUB 🆚 ABHINAV KM*
https://sportvot.com/stream/63d38478052a75715cd8ecf0
*JOLLY SPORTS CLUB 🆚 YUVA KM*
https://sportvot.com/stream/63d38855052a75715cd8ed6b
*JOLLY SPORTS CLUB 🆚 SAGAR SPORTS CLUB*
https://sportvot.com/stream/63d10ef6052a7542c85d63b7
Final | A-Gut | Jolly Vs Swastik
Final A-Gut
31/01/2023
आपल्या जॉली परिवारासाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट एका महिन्यात घडली ती म्हणजे जे मागील दोन वर्षात अंतिम फेरी पर्यत मजल मारण्याचे सातत्य या वर्षी राखण्यात आपल्या मंडळाला यश आले आहे.या महिन्यात आपण तिसऱ्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे.
दि.२१/०१/२०२३ ते २९/०१/२०२३ या कालावधी मध्ये मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्पोर्टवोट आयोजित डी.एस.३ स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने स्पोर्टवोट मुंबई उपनगर कबड्डी चॅम्पियनशिप २०२३ चे आयोजन गोरेगाव (प.) येथे करण्यात आले होते.
जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने आपला #जॉली_क्रीडा_मंडळ हा संघ प्रथम श्रेणी पुरुष गटामध्ये स्वस्तिक क्रीडा मंडळ ( कुर्ला) यांच्या विरुद्ध अंतिम फेरीत ३४ विरुद्ध ३४ असा बरोबरीत राखीत ५ - ५ चढाया मध्ये आपला संघ #अंतिम_उपविजयी संघ ठरला त्याबद्दल आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये विशाल राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला नामदेव इस्वलकर , अभिषेक नर , विक्रम जाधव , दिनेश जाधव , सचिन सावंत, अनिकेत पाडलेकर , दिनेश यादव , अल्पेश जोशी , ओंकार शिंदे , रोशन हिंदळेकर , निशाण देवरस यांचा उत्कृष्ट असा खेळ आपणास बघायला मिळाला. तसेच नामदेव इस्वलकर , विक्रम जाधव , अभिषेक नर , दिनेश यादव , सचिन सावंत या खेळाडूंनी #प्लेअर_ऑफ_द_मॅचचा मान पटकवला तर विक्रम जाधव याची #प्लेयर_ऑफ_द_डे म्हणून निवड करण्यात आली. तर संपूर्ण स्पर्धेचा #सर्वोत्कृष्ट_खेळाडू म्हणून #नामदेव_इस्वलकर यांची निवड करण्यात आली व त्यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल समस्त जॉली परिवाराचे #हार्दिक_ अभिनंदन 💐💐💐 तसेच ह्या स्पर्धेसाठी यांनी सुंदर असा किट आपल्या मंडळाला दिल्याबद्दल त्यांचे देखील आभार !!!
26/01/2023
दि २३/०१/२०२३ ते २५/०१/२०२३ या कालावधी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्व. रमेश लटके चषक चे आयोजन अंधेरी पूर्व येथे करण्यात आले होते.
जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने ह्या स्पर्धेमध्ये आपला #जॉली_क्रीडा_मंडळ हा संघ प्रथम श्रेणी पुरुष गटात #अंतिम_उपविजयी संघ ठरला त्याबद्दल समस्त जॉली परिवाराचे #हार्दिक_अभिनंदन💐💐💐
तसेच आपल्या जॉली क्रीडा मंडळाचा अष्टपैलू खेळाडू कु. #अभिषेक_नर ह्याची स्पर्धेतील #सर्वोत्तम_खेळाडू म्हणून निवड करण्यात आली ह्या साठी अभिषेक चे पण समस्त जॉली परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !!!
जोगेश्वरी माते की जय🙏🏻
16/01/2023
दि.१३/०१/२०२३ ते १५/०१/२०२३ या कालावधी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने उत्कर्ष क्रीडा अकादमी आयोजित सुरक्षा प्रबोधिनी यांच्या सहकार्याने हुतुतु महोत्सव २०२३ या स्पर्धेचे आयोजन मालाड येथे करण्यात आले होते.
जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने चालू वर्षातील पहिल्या स्पर्धेमध्ये आपला #जॉली_क्रीडा_मंडळ हा संघ प्रथम श्रेणी पुरुष गटात उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडुप यांच्या विरुद्ध अंतिम सामन्यात ४० विरुद्ध २८ अशा फरकाने #अंतिम_विजयी संघ ठरला त्याबद्दल समस्त जॉली परिवाराचे #हार्दिक_अभिनंदन💐💐💐
या स्पर्धेचे विशेष सांगायचे झाले तर विशाल राऊळ व श्रीकांतजी बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी व उद्योन्मुख अशा खेळाडूचा भरणा आपल्या संघात पाहायला मिळाला.रजत सिंग व विक्रम जाधव यांच्या चौफेर चढायांच्या जोरावर तर दिनेश यादव याच्या जबरदस्त पक्कडीतील कामगिरी तसेच #अभिषेक_नर याच्या अष्टपैलू खेळामुळे, #अनिकेत_पाडलेकर , #निशांत_देवरस आणि #अल्पेश_जोशी यांच्या उत्तम बचावामुळे तसेच #नामदेव_इस्वलकर याच्या अनुभवी आणि संयमी खेळामुळे तसेच संपूर्ण संघाच्या परिश्रमामुळे संघाने अंतिम फेरीत दाखल होत अंतिम विजयी पद पटकावले. िंग ला त्याच्या जबरदस्त खेळासाठी स्पर्धेतील #सर्वोत्कृष्ट_खेळाडू व #दिनेश_यादव ला #सर्वोत्कृष्ट_पक्कड असे परितोषिक देऊन गौरविण्यात आले. सर्व खेळाडू, क्रीडारसिकांचे ,हितचिंतकांचे आणि जॉली परिवाराचे पुन्हा एकदा #हार्दिक_अभिनंदन💐💐🏆
जोगेश्वरी माते की जय🙏🏻
08/01/2023
Let's Congratulate Mr. Abhishek Nar & Team Mumbai Upnagar for winning Silver Medal in Maharashtra Olympic Sports Tournament 2022-23
21/12/2022
आपल्या जॉली क्रीडा मंडळातील प्रतिभावंत खेळाडू अभिषेक नर यांची अहमदनगर येथे होणाऱ्या ७० व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर प्रतिनिधिक संघात निवड करण्यात आली आहे.
त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्याचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!!
13/12/2022
आपल्या जॉली क्रीडा मंडळासाठी अभिमानाचा दिवस आहे. लातूर येथे होणाऱ्या किशोर/किशोरी राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धत आपल्या मंडळतील खेळाडू तसेच मुंबई उपनगर कार्यकारणी सभासद श्री. कमलेश पालव यांची मुंबई उपनगर या संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
श्री. कमलेश पालव व मुंबई उपनगर संघास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !