मामासाहेब मोहळ कुस्ती-संकुल

  • Home
  • India
  • Pune
  • मामासाहेब मोहळ कुस्ती-संकुल

मामासाहेब मोहळ कुस्ती-संकुल wrestler's

🙏 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🙏मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, कात्रज येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी पारंपरिक तालमीची पूजा...
31/08/2026

🙏 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🙏

मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, कात्रज येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी पारंपरिक तालमीची पूजा आयोजित करण्यात आली आहे.

या पूजेसाठी सर्व आजी-माजी पैलवान बंधूंना मनःपूर्वक आमंत्रण आहे. पैलवानांची उपस्थिती ही तालमीसाठी विशेष आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे. 🙏🏻

तारीख :- ३१ / ०८ / २०२६
वेळ :- सायंकाळी ५ ते ९
स्थळ :- मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन कात्रज

युवा कुस्तीपटू, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान *राहुल कोरडे* यांचे दुःखद निधन झाले आहे.ही बातमी समजताच संपूर्ण कुस्ती विश्वा...
26/04/2026

युवा कुस्तीपटू, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान *राहुल कोरडे* यांचे दुःखद निधन झाले आहे.
ही बातमी समजताच संपूर्ण कुस्ती विश्वावर शोककळा पसरली असून, एक होतकरू आणि दमदार खेळाडू काळाच्या पडद्याआड गेला आहे.

त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, ही भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻

वाघोली येथे संपन्न झालेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी वि...
22/03/2026

वाघोली येथे संपन्न झालेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी विजेते पदाची गदा उंचावत 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमान मिळवला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल हर्षवर्धन सदगीर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!


#एकमहाराष्ट्रएकमहाराष्ट्रकेसरी

12/03/2026

Celebrating my 8th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

📍मुंबई आझाद मैदानएक महाराष्ट्र… एकच महाराष्ट्र केसरी!गेल्या ६० वर्षांपासून चालत आलेली महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेची शा...
12/03/2026

📍मुंबई आझाद मैदान

एक महाराष्ट्र… एकच महाराष्ट्र केसरी!

गेल्या ६० वर्षांपासून चालत आलेली महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेची शान म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धा. पण सध्या राज्यात चार-चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असल्याने या मानाच्या किताबाची प्रतिष्ठा कमी होत आहे.

कुस्तीप्रेमी आणि मातीशी नातं असलेल्या प्रत्येकासाठी ही परंपरा जपणं गरजेचं आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे दरवर्षी एकच अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी आणि त्या किताबाचा मान, इतिहास आणि गौरव कायम राहावा हीच अपेक्षा!


#महाराष्ट्रकेसरी #कुस्ती #महाराष्ट्रकुस्ती #एकमहाराष्ट्रएकमहाराष्ट्रकेसरी #कुस्तीपरंपरा #मातीचीकुस्ती

मामासाहेब मोहळ कुस्ती संकुल चे वस्तादव अध्यक्ष, भोर-राजगड-मुळशी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस  मार्गदर्शक. गुरूवर्य पै. ...
19/10/2025

मामासाहेब मोहळ कुस्ती संकुल चे वस्ताद
व अध्यक्ष, भोर-राजगड-मुळशी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस मार्गदर्शक. गुरूवर्य पै. पंकज (भाऊ) हारपुडे आपनास वाढदिवस च्या हार्दिक शुभेच्छा...🎂💐 Pankaj Harpude

सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यातीलसत्यनारायण महापुजासोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ०५ ते ०९ वा. या शुभमुहूर्तावर करण्...
10/08/2025

सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यातील

सत्यनारायण महापुजा

सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ०५ ते ०९ वा. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे

मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज, पुणे

॥ निमंत्रक ॥•

मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज, पुणे वस्ताद महेशभाऊ मोहोळ / वस्ताद पंकजदादा हरपुडे

15/07/2025

स्पष्टीकरण

मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनाच्या वतीने, तळजाई टेकडीवर झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत काही प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे की, या घटनेत आमच्या संकुलातील काही कुस्तीपटू किंवा विद्यार्थी सहभागी आहेत.

याबाबत आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील कोणत्याही कुस्तीपटूचा किंवा विद्यार्थ्याचा त्या घटनेशी कोणताही संबंध नाही.

सदर घटनेत पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांवर मारहाण झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. आम्ही त्या विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो व त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही पूर्णपणे पाठिंबा दर्शवतो.

आमच्या संकुलातील सर्व खेळाडू शिस्तप्रिय व क्रीडाप्रेमी असून, ते नेहमीच कुस्ती व शारीरिक विकासावर लक्ष केंद्रित करतात. कोणतीही चुकीची माहिती समाजात गैरसमज पसरवू शकते, म्हणून सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे की त्यांनी योग्य व पडताळून घेतलेलीच माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी.

मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन नेहमीच खेळ, शिस्त व सामाजिक बांधिलकी यांचे संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे आणि पुढेही राहील.

धन्यवाद!

व्यवस्थापक,
मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन, पुणे
पै.पंकज सुरेशदादा हारपुडे.
पै.महेश ज्ञानेश्वर मोहोळ

Address

Pune
411046

Opening Hours

Monday 9am - 11pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when मामासाहेब मोहळ कुस्ती-संकुल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category