06/10/2025
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत शालेय जिल्हास्तरीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा कराड येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये प्रविण साळुंखे शुटिंग अकॅडमी, सातारा मधील नेमबाजांनी आपल्या बंदुकीने उत्कृष्ठ अशी खेळी करत पदकांची लयलूट केली.
१४ वर्ष पीप साईट रायफल मुले प्रकारात अर्जुन साळुंखे याने सुवर्ण पदक 🥇प्राप्त केले.
१४ वर्षा खालील ओपन साईट एअर रायफल मुले प्रकारात शौर्य विनय घाडगे याने व्दितीय क्रमांक मिळवत रौप्य 🥈पदक पटकविले.
१४ वर्षा खालील एअर पिस्टल मुले प्रकरात अध्रित बर्गे याने देखील रेकॉर्ड ब्रेक करत सुवर्ण 🥇 पदकावर नाव कोरले.
१७ वर्षा खालील पीप साईट एअर रायफल मुली प्रकारात आर्या अनिल घाडगे हिने तिसरा क्रमांक मिळवत कांस्य🥉 पदक पटकविले.
१७ वर्षा खालील ओपन साईट रायफल मुले प्रकारात रितेश जांगिड याने सुवर्ण 🥇पदक तर आदित्य जाधव याने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक🥈 पटकाविले.
१७ वर्षा खालील ओपन साईट रायफल प्रकारात तनिष्का फाळके हिने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य 🥈 पदक पटकाविले.
१७ वर्षा खालील एअर पिस्टल मुले प्रकारात सोहम काळे याने कांस्य 🥉पदकाची कमाई केली.
१९ वर्षा खालील ओपन साईट एअर रायफल मुली प्रकारात ईश्वरी कबाडे हिने देखील तिसरा क्रमांक मिळवत कांस्य🥉 पदक पटकविले.
१९ वर्षा खालील ओपन साईट एअर रायफल मुले प्रकारात श्रवण चव्हाण याने उत्कृष्ठ खेळी करत सुवर्ण 🥇 पदकावर नाव कोरले.
विजेते सर्व नेमबाज एन.आय.एस. नेमबाजी प्रशिक्षक प्रविण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. सर्व नेमबाजांचे सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तारळकर, सातारा जिल्हा रायफल असोसिएशनचे सचिव कन्हैयालाल राजपुरोहित यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
21/07/2025
गुरुवार दिनांक १७.७.२२०५ रोजी आपल्या शूटींग रेंज ला किर्लोस्कर ग्रुप मधील सन्माननीय पूनम जी किर्लोस्कर यांनी भेट देऊन नेमबाजी ( शुटींग ) खेळाची महिती घेतली व पुढील वाटचालीसाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी रेंज वर अकॅडमीचे प्रशिक्षक मा. प्रविण साळुंखे, राष्ट्रीय पदक विजेते नेमबाज आदित्य देशमुख, दिशा इंदलकर, राजवर्धन देशमुख, श्रेया सकपाळ आदि उपास्थित होते.
धन्यवाद श्री सागर किर्दत सर...
❤️
27/05/2025
रायफल शूटिंग , आर्चरी आणि लाठी - काठी प्रशिक्षण कार्यशाळा
प्रविण साळुंखे शूटींग अकॅडमी व शिवांतिका आर्चरी अकॅडमी अंतर्गत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दातार- शेंदुरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी एक उलेखनीय उपक्रम राबविण्यात येत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्वावलंबन आणि संरक्षण गुणांचा विकास करत , विविध संधींचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी देण्यात येत आहे. मुख्याध्यापक शबनम तरडे यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा दिनांक २१ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान शाळेच्या कोटेश्वर मैदानावर घेण्यात येत आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे माननीय विश्वस्त आणि शाळा समितीचे माननीय अध्यक्ष श्री. अनंत जोशी यांनी या कार्यशाळेस भेट देऊन शस्त्रांची माहिती घेतली. प्रत्यक्ष अनुभव घेतला. या कार्यशाळेत मार्गदर्शक मा. प्रविण साळुंखे ( NS-NIS Shooting Coach ), शिवशंकर चोरट ( NS-NIS Archery Coach ),यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे. लहान वयापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. शाळेतील सर्व पालकांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.
👑satarkar
27/03/2025
Congratulations Raj💐🎉🥳... Finished 8th in ISSF Junior Men's 10M Air Rifle Event At 07324 India Open At Army Marksmanship Unit, Mhow, Madhya Pradesh 2025...
🇮🇳
13/01/2025
Our 5 Shooters Selected In K.B.P University Shooting Team For All India Inter University Shooting Championship, Chandigarh Punjab 2024-25. Also Our Coach Appointed As A Team Coach And Manager...
27/11/2024
Our Star Shooter Vihang Got Silver🥈 medal In 10M Air Rifle Sub Youth Men At 39th MSSC At Shree Shiv Chatrapati Kreeda Sankul, Balewadi Stadium, Pune 2024-25... Congratulations Vihang🥳🤩💐...
24/11/2024
विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे झालेल्या शालेय विभागीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या प्रविण साळुंखे शुटींग अकॅडमी मधील नेमबाजांनी घवघवीत यश मिळवले.
१७ वर्षाखालील १० मी. एअर रायफल ओपन साईट मुले प्रकारात रितेश जांगिड याने आपल्या रायफलने उत्कृष्ठ खेळी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
तसेच १७ वर्षाखालील एअर रायफल पीप साईट प्रकारात विहंग शेडगे याने रौप्य पदक याच बरोबर १९ वर्षाखालील एअर रायफल ओपन साईट प्रकारात श्रवण चव्हाण व सर्वेश जोशी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
या सर्व नेमबाजांची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. हे सर्व नेमबाज आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक प्रविण साळुंखे यांच्या मार्गदरशनाखाली सराव करत आहेत. त्यांना सातारा जिल्हा रायफल असोसिएशन चे सचिव कन्हैयालाल राजपुरोहित सर यांनी सर्व नेमबाजांचे अभिनंदन करत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या...
12/10/2024
महा खंडेनवमी... शस्त्र पूजन ...
...
#सातारा 🔫
24/09/2024
Satara District Inter School Shooting Championship 2024-25...
PSSA Champs🔥🥳
U14 Open Sight Girls
Arya Gold 🥇
U14 Open sight Boys
Rudra Silver 🥈
Shaury Bronze 🥉
Swaraj 4th ❤️
U17 Air Pistol Boys
Soham Kale Bronze 🥉
U17 Open Sight Boys
Ritesh Gold 🥇
U 19 Open Sight Boys
Sarvesh Gold 🥇
Shravan Bronze 🥉
U19 Peep Sight Rifle Boys
Vihang Bronze 🥉
Congratulations To All Medal Winners💐💐🥳🥳...
All Shooters Select For Upcoming Zonal School Shooting Championship 2024-25... Thank You So Much To Coach Pravin sir , School Coach Disha Mam, All Parents, Satara District Rifle Association, District Sports Office Satara..
13/07/2024
"I have a very strict gun control policy: if there's a gun around, I want to be in control of it."
In frame Coach : .salunkhe.ind
20/06/2024
Basic Information About Shooting Sport To NCC Cadets At Sadhna English Medium School, Satara...
Thank You For Wonderful Opportunity Sir, Mr. Patil Sir & ANO Patil mam...