Rotary Club Of Pune Phoenix

Rotary Club Of Pune Phoenix

Share

Rotary Club Of Pune Phoenix is part of Rotary District 3131, a Organization to cater social responsibilities of Society

Photos from Rotary Club Of Pune Phoenix's post 05/07/2026

Rotary Year 26-27 of RCP Phoenix's first meeting started with Atharvashirsh pathan and evening aarti at Sarasbaug ganapati devasthan on 1st of July 2026.
The first weekly meeting of RCP Phoenix was conducted at Sarasbaug by worshiping Lord Ganesh.

Vocational day celebration
CA day & doctor day were celebrated by RCP Phoenix.
CA and doctors of Phoenix club were felicitated, plus club & trust auditors (Rtn Prakash Joglekar and Rtn Ashok Gadgill) were felicitated at the hands of District Vocational director Rtn Yogesh Bhide on the first weekly meeting that is 1st of July.

Photos from Rotary Club Of Pune Phoenix's post 05/07/2026

रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स – पदग्रहण समारंभ वृत्तांत
दिनांक २४ जून २०२६ रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स (वर्ष २०२६-२७) च्या पदग्रहण समारंभाची (नवीन पर्वाची) सुरुवात उत्साह, आनंद आणि सेवाभावाच्या वातावरणात संपन्न झाली. या समारंभाकरता डिस्ट्रिक्ट ३१३१ चे गव्हर्नर इलेक्ट रो.नितीन ढमाले व फर्स्ट लेडी इलेक्ट रो.डॉ. नीलम ढमाले, व असिस्टंट गव्हर्नर इलेक्ट रो. गिरीश मठकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रो.शुभांगी मुळे यांच्या श्रद्धायुक्त गणपती श्लोकाने झाली व त्यानंतर क्लबच्या सर्व सदस्यांनी 'हीच आमुची प्रार्थना' हे समूहगीत मोठ्या प्रभावीपणे सादर केलं. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाला औपचारिक प्रारंभ झाला.
मावळते अध्यक्ष रो. माधव सोमण आणि मावळती सचिव रो. मधूर डोलारे यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा "The Year That Was" या सादरीकरणातून मांडला. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची आणि क्लबच्या यशस्वी वाटचालीची उपस्थितांना पुन्हा एकदा अनुभूती मिळाली.
यानंतर पदभार हस्तांतरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक सोहळा पार पडला. मावळते अध्यक्ष रो. माधव सोमण यांनी अध्यक्षपदाची कॉलर, पिन, चार्टर, गाँग आणि गॅव्हल यांचे हस्तांतरण करून नवीन अध्यक्षा रो. शुभांगी मुळे यांच्याकडे क्लबची धुरा सोपवली. तसेच मावळती सचिव रो. मधूर डोलारे यांनी सचिवपदाचा कार्यभार नवीन सचिव रो. हर्षद देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केला.
यानंतर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रोटेरियन नितीन ढमाले यांच्या हस्ते नवीन संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. नव्या संचालक मंडळाने क्लबला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
नवीन अध्यक्ष रो. शुभांगी मुळे यांनी "The Year Ahead" मधून आपल्या वर्षभराच्या योजनांचा आणि "Harmony in Service"व My Club My Family या संकल्पनेचा परिचय करून दिला. सेवाकार्यातील समन्वय, संघभावना आणि समाजपरिवर्तनाच्या दिशेने क्लबची वाटचाल कशी असेल याची प्रेरणादायी मांडणी त्यांनी केली. तसेच क्लबच्या मासिक बुलेटिन "भरारी" चे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमात नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले तसेच फिनिक्स फॅमिली सपोर्ट टीमचा गौरव करण्यात आला. विविध विशेष उपक्रमांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये प्रौढ साक्षरता अभियान, हॅपी व्हिलेज उपक्रम, प्रेरणा प्रोजेक्ट, इंटरॅक्ट क्लब उपक्रम, नवीन रोटरॅक्ट क्लब स्थापनेची घोषणा, विद्यार्थ्यांचा सन्मान, तसेच विविध ग्लोबल ग्रँट प्रकल्पांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रो. नितीन ढमाले यांचे मार्गदर्शन. त्यांनी रोटरीच्या मूल्यांवर प्रकाश टाकत नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या आणि आगामी वर्षासाठी प्रेरणादायी संदेश दिला.
प्रेसिडेंट इलेक्ट् रो. मधुर डोलारे यांनी आभार प्रदर्शन केले. आभार प्रदर्शनानंतर रो. शुभांगी मुळे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.केतकी कुलकर्णी व रो. अनुपमा जोशी यांनी केले. रोटरी क्लब पुणे फिनिक्सच्या सर्व पास्ट प्रेसिडेंट्सच्या प्रती अध्यक्षा रो.शुभांगी मुळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
उपस्थित सर्व मान्यवर, सदस्य आणि कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे हा पदग्रहण समारंभ संस्मरणीय ठरला. नवीन अध्यक्षा रो. शुभांगी मुळे आणि सचिव रो. हर्षद देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स समाजसेवेची नवी भरारी घेईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
"Harmony in Service" या ब्रीदवाक्याला साजेशा स्वरांत, सेवाभावाच्या सुरेल मैफलीची सुरुवात या पदग्रहण समारंभातून झाली. ✨🎵

Photos from Rotary Club Of Pune Phoenix's post 15/06/2026

A very happy moment to receive a Certificate of Appreciation to Rotary Club of Pune Phoenix in Club's outstanding efforts in successfully publishing the Annual Club Calendar for RY 2026 -27.It was received during Club Admin and Grants Management Seminar which was held on 14th June 2026.

18/05/2026

Rotary Club of Pune Phoenix BOD Training held on 3rd May

The Rotary believes in training, planning & ex*****on model.
So Rotary Club of Pune Phoenix carried out training for Board members of RY 26-27.Training intiative was taken by President Elect Rtn.Shubhangi Mulay and Secretary Elect Rtn.Harshad Deshpande.
It was a full day interactive training. The training was held at the Awani Agro tourism farm near Rajgurunagar owned by our club member Rtn.Suraj Watekar.
It was an activity based training which was enjoyed by all. The board members learned about various core Rotary avenues during the session.
District Learning Facilitator PDG Manjoo Phadke, PP Nitin Mulay, PP Pradnya Dange, and PP Vinay Kumthekar conducted various sessions. It was an enjoyable experience to all.

12/02/2026

काल बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी
रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स,
रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाईड
संयुक्तपणे,
श्री. संजय बडवे यांचे
व्याख्यान - आग्र्याहून सुटका हे आयोजित केले होते

दोन्ही क्लब च्या सदस्यांनी ह्याचा पुरेपूर आनंद लुटला. ह्याच व्याख्यानातील काही सादरीकरण आपल्या साठी खास शेअर करीत आहोत.

27/01/2026

प्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. अतुल खांडेकर ह्यांचे आवाहन - रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स कला संस्कृती महोत्सव वर्षे तिसरे.

दिनांक ३० जानेवारी आणि ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथेच अनुक्रमे "संगीत सौभद्र" आणि "संगीत कट्यार काळजात घुसली" या दर्जेदार नाटकांचे प्रयोग होणार आहेत. दोन नाटकांची एकत्रित देणगी प्रवेशिका रू. ५००/- एवढ्या किमतीला असून, फोन बुकिंग साठी संपर्क श्री. देवेंद्र भिडे - 7420050297 यांना करावा. रविवार दिनांक २५ जानेवारी पासून नाट्यगृहावर देणगी प्रवेशिका उपलब्ध आहेत.

Photos from Rotary Club Of Pune Phoenix's post 11/01/2026

Senior tabla maestro Pandit Pandurang Mukhade was honoured with the Vocational Excellence Award by Rotary Club of Pune Phoenix. The award was presented by Rotary District Vocational Director Mr. Prasad Ganpule. The award comprised a shawl, a coconut, and a citation.

The programme was held at the auditorium of Ruia Mukabadheer Vidyalaya, located within the premises of SPM School. On this occasion, Adv. Madhav Soman, President of Rotary Club of Pune Phoenix, Secretary Madhur Dolare, Nitin Mule, Mahananda Mukhade, Vivek Dixit, and other dignitaries were present.

As part of the programme, Shraddha Mukhade presented a graceful Kathak dance performance on the song “Baje Muraliya”. The programme was compered by Janmejay Khurjekar, while the vote of thanks was delivered by Shubhangi Mule.







रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्सतर्फे ज्येष्ठ तबलावादक पंडित पांडुरंग मुखडे यांचा व्यावसायिक गुणवत्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण रोटरी डिस्ट्रिक्टचे व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले यांच्या हस्ते झाले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

एसपीएम शाळेच्या आवारातील मुकबधीर विद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम पार पडला. या वेळी रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्सचे अध्यक्ष अॅड. माधव सोमण, सचिव मधुर डोलारे, नितीन मुळे, महानंदा मुखडे, विवेक दीक्षित आदी उपस्थित होते. याप्रसंगी ‘बाजे मुरलिया’ या गीतावर श्रद्धा मुखडे हिने कथक नृत्य सादर केले. जनमेजय खुर्जेकर यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी मुळे यांनी आभार मानले.

Photos from Rotary Club Of Pune Phoenix's post 16/12/2025

RCP Phoenix Proud WINNERS 🏆 of Rotary Yuva Box Cricket League 2025. This is our club's 3rd Title in 4 Years.

Heartiest Congratulations to all Participants for Dominating Performance and determination to WIN on the field cricket 🏆🏏



Champions
Cricket League Winners
Rotary District 3131

Photos from Rotary Club Of Pune Phoenix's post 05/11/2025

On 31st Oct & 1st Nov. RCP PHOENIX successfully hosted a District Event "Pre PELs". It's a first training event for all Presidents Elect in Rotary District 3131 for RY 2026-27.

The event took place at Hotel IKSHANA, Khandala. About 170 attendies had registered for this event. PRID Rtn. N. Subramanian was the Chief Guest for this event. PDG Mohan Palesha, PDG Palekar, PDG Pankaj Shah, PDG Dr. Anil Parmar, PDG Manjoor Phadake, IPDG Sh*tal Shah, DG Santosh Marathe, DG Elect Nitin Dhamale, DGN Charu Shrotri & other district officers also present for this event, who have conducted various sessions.

After plenary session, various breakout sessions have taken place, including various activities. Dr. Sameer Dolare was the Convenor of this successful event. This event put another feather in the cap of RCP PHOENIX.

Photos from Rotary Club Of Pune Phoenix's post 14/10/2025

Inauguration of Global Grant Project 2025.
Our club has been doing this Paediatric Heart Surgery project successfully since last year.

Synergy clubs and District directors supported the initiative in large numbers and holding our hands to make it a Grand Success.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Pune
411004

Opening Hours

Monday 7:30pm - 8:45pm