
वयाच्या १७ व्या वर्षी तिला कॉलेजमधून नाकारण्यात आले.
वयाच्या २५ व्या वर्षी तिची आई ही आजाराने मरण पावली.
वयाच्या २६ व्या वर्षी तिला गर्भपात झाला.
वयाच्या २७ व्या वर्षी तिचे लग्न झाले.
पतीने तिच्यावर अत्याचार केला. असे असूनही तिच्या पोटी मुलीचा जन्म झाला.
वयाच्या २८ व्या वर्षी तिचा घटस्फोट झाला आणि तिला गंभीर नैराश्याचे निदान झाले.
वयाच्या २९ व्या वर्षी ती सिंगल मदर होती.
वयाच्या ३० व्या वर्षी तिला या पृथ्वीवर राहायचे नव्हते.
पण, तिने तिच्या पॅशनवर लक्ष केंद्रित केले आणि ती लिहू लागली.
वयाच्या ३१ व्या वर्षी तिने अखेरीस तिचे पहिले पुस्तक प्रकाशित केले.
वयाच्या ३५ व्या वर्षी, तिने ४ पुस्तके प्रकाशित केली होती आणि तिला 'ऑथर ऑफ द इयर' हा पुरस्कार देखील प्राप्त झाला.
वयाच्या ४२ व्या वर्षी प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी तिच्या नवीन पुस्तकाच्या ११ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या!
ही महिला म्हणजे हॅरी पॉटरची जननी ... जे.के. रोलिंग!
वयाच्या ३० व्या वर्षी तिने आत्महत्येचा विचार कसा केला, हे लक्षात ठेवा.
आज, हॅरी पॉटर हा १५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा जागतिक ब्रँड आहे!
तेव्हा कधीही हार मानू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. उत्कट व्हा. मेहनत करा. अजूनही उशीर झालेला नाही.
Don't lose precious life...suicide is not the last option...