10/06/2024
नाशिक येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मिनी तलवारबाजी स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या आपल्या नगरच्या खेळाडूंचा सत्कार माझ्या हस्ते करण्यात आला.
रिद्धी महाडिक (ब्राँझ), वसुधा साठे (सिल्वर), निधी देशमुख (ब्राँझ), गार्गी देशमुख (सिल्वर), प्रांजल बडगु (सिल्वर), अक्षय दौंड (ब्राँझ) पदकं प्राप्त असून प्रज्वल सत्रे आणि आर्यन सत्रे यांनी टॉप 8 रँकिंग मध्ये स्थान मिळवल्यामुळे ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या सर्व खेळाडूंची निवड झाली आहे.
प्रशिक्षक सुनील गोडळकर यांनी खेळाडूंना बालवयातच तलवारबाजीचे प्रशिक्षक दिल्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नगर शहरातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित केले आहे.या सर्व खेळाडु व प्रशिक्षक यांचा सत्कार मा.आमदार संग्राम भैय्या यांचा हस्ते करण्यात आला या कामगिरीने शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.
इतर विद्यार्थ्यांनीही यांच्यापासून प्रेरणा घेत यश संपादन करावे.
यावेळी प्रशिक्षक सुनील गोडळकर, प्रा. संजय साठे, निलेश मदने, शैलेश गवळी, प्रा. संजय धोपावकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विलास दवणे, प्रा. दिनेश भालेराव, विवेक सूर्यवंशी, प्रशांत गंधे, प्रदीप पाटोळे, सचिन गायकवाड, अविनाश काळे, वैष्णवी गोडळकर, होनाजी गोडळकर, वेदिका गोडळकर, विनायक भुतकर, मुकुल काशीद, शंतनू पांडव आदी उपस्थित होते.