Pratap Krida Mandal, Shankarnagar-Akluj

Pratap Krida Mandal, Shankarnagar-Akluj

Share

Official page : Pratap Krida Mandal, Shankaranagar-Akluj

Photos from Pratap Krida Mandal, Shankarnagar-Akluj's post 25/04/2026

*प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित*
✨✨✨✨✨✨
*उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबीर-२०२५*
➖➖➖➖➖➖
> दिवस- ३ रा
> वार- शनिवार
> दिनांक- २५.०४.२०२६

*आजच्या क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराचे निवडक क्षणचित्रे.....*

Photos from Pratap Krida Mandal, Shankarnagar-Akluj's post 24/04/2026

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित
✨✨✨✨✨✨
#उन्हाळी_क्रीडा_व_कला_प्रशिक्षण_शिबीर_२०२६
➖➖➖➖➖➖
> दिवस- २ रा
> वार- शुक्रवार
> दिनांक- २४.०४.२०२६

*आजच्या क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराचे निवडक क्षणचित्रे.....*

Photos from Pratap Krida Mandal, Shankarnagar-Akluj's post 24/04/2026

#उन्हाळी_क्रीडा_व_कला_प्रशिक्षण_शिबीर

प्रताप क्रीडा मंडळाच्या मोफत उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ

अकलूज (प्रतिनिधी) :

ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळावे तसेच त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, स्पर्धा संयोजन समिती प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२३ ते २६ एप्रिल या कालावधीत आयोजित केलेल्या मोफत उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबीराचा प्रारंभ झाला.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय शंकरनगर च्या मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, संजय झंजे,सागर फुले, राष्ट्रीय खेळाडू सार्थक काळे, सुजल धडांबे,सचिव बिभीषण जाधव, कला व क्रीडा प्रशिक्षक, आदी मान्यवर प्रमूख उपस्थित होते.
सदरचे हे ४५ वे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर असून
शिबिरामुळे अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत. प्रताप क्रीडा मंडळाने राज्यात वेगळा ठसा उमटवलेला आहे. सदरचे शिबिर विद्यार्थ्यांसाठी मोफत असून
या शिबिरात रोज सकाळी ७ ते १० या वेळेत वेटलिफ्टिंग, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, कबड्डी व योगासने या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कला शिबिरामध्ये कागदकाम व रांगोळी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असल्याचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील यांनी सांगितले.
क्रीडा प्रशिक्षक म्हणून अरविंद वाघमोडे,संजय राऊत ,उमेश भिंगे, भीमाशंकर पाटील, प्रदीप पांढरे, दादा कोकाटे, निलप्पा बनसगोळकर, यशवंत माने देशमुख, भीमराव दुधाळ, मल्हारी मगर, दादाभाई सय्यद, अनिल मोहिते, अण्णा साळुंखे, रामचंद्र लोंढे, बाळासाहेब भोसले तर कला शिबिरासाठी धन्यकुमार साळवे, सिद्धनाथ टिंगरे, दत्ता शिंदे, तानाजी काशीद, विशाल लिके, लक्ष्मण धोत्रे, शाम कुंभार, माधुरी भांगे आदी मार्गदर्शन करीत आहेत.
सुत्रसंचलन संजय राऊत यांनी केले.
प्रशिक्षणार्थिना मंडळाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.

Photos from Pratap Krida Mandal, Shankarnagar-Akluj's post 21/04/2026

प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
अकलूज, दि. २१ (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळावे तसेच त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील तसेच स्पर्धा संयोजन समिती प्रमुख मा. चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यंदाही हे शिबिर उत्साहात पार पडणार आहे. दि. २३ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत क्रीडा प्रशिक्षण शिबीर, तर दि. २३ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत कला प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, शंकरनगर येथे दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत होणार आहे. क्रीडा शिबिरामध्ये वेटलिफ्टिंग, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, कबड्डी व योगासने या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार असून कला शिबिरामध्ये कागदकाम व रांगोळी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. नामवंत क्रीडा व कला प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
ही प्रशिक्षण शिबिरे पूर्णतः विनामूल्य असल्याने परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी खालील संपर्क क्रमांकांवर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्रीडा शिबिरासाठी संपर्क : भीमाशंकर पाटील (मो. 9860331717), संजय राऊत (मो. 9890434210), अनिल मोहिते (मो. 7387908110)
कला शिबिरासाठी संपर्क : सिद्धनाथ टिंगरे (मो. 7517484343), तानाजी काशीद (मो. 8806500009), विशाल लिके (मो. 9823196346)
तसेच सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज, रत्नाई संकुल अकलूज व महर्षी प्रशाला, यशवंतनगर येथेही नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव बिभीषण जाधव यांनी दिली.

20/04/2026

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित
#उन्हाळी_क्रीडा_व_कला_प्रशिक्षण_शिबीर

✨ प्रशिक्षण कालावधी- दि. २३ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६

✨वेळ- ७.०० ते १०.००

✨स्थळ- सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, शंकरनगर-अकलूज

✨प्रशिक्षण शुल्क- विनामूल्य

तरी जास्तीत जास्त खेळाडू व कलाकारांनी सदर प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा.

Photos from Pratap Krida Mandal, Shankarnagar-Akluj's post 04/03/2026

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती, शंकरनगर यांचे
वतीने आयोजित

पारंपारिक व नवकवींच्या लावण्यांचा नजराणा..!

#राज्यस्तरीय_लावणी_नृत्य_स्पर्धा_२०२६

Photos from Pratap Krida Mandal, Shankarnagar-Akluj's post 02/03/2026

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती शंकरनगर - अकलूज आयोजित
#राज्यस्तरीय_लावणी_नृत्य_स्पर्धा_२०२६

दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६

🔅लावणी स्पर्धेचे विजेते-🔅
🥇प्रथम क्रमांक -
नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी मोडनिंब जि सोलापूर

🥈द्वितीय क्रमांक -
रुक्मिणी अर्चना जोत्स्ना वाईकर पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे ता. वाई जि. सातारा

🥈द्वितीय क्रमांक -
(विभागून)
प्रिया नगरकर न्यु अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी यवत-चौफुला जि पुणे

🥉तृतीय क्रमांक -
वैशाली समसापूरकर जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी जि पुणे

🥉चतुर्थ क्रमांक -
अलंकार सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी सुपा जि अहिल्यानगर

⭐पाचवा क्रमांक-
वैष्णवी कोल्हापूरकर, रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप-वाठार जि. कोल्हापूर

⭐ पाचवा- (विभागून)
अपर्णा किर्ती नगरकर लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी जि पुणे

🔅 वैयक्तिक बक्षिसे 🔅

🎖️उत्कृष्ट मुजरा - ३ हजार
नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी मोडनिंब जि सोलापूर

🎖️उत्कृष्ट गायिका- राखी चौरे

🎖️उत्कृष्ट ढोलकी वादक - राहुल जावळेकर, रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप-वाठार जि. कोल्हापूर

🎖️उत्कृष्ट हार्मोनियम वादक- अनिकेत साळुंखे, रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप-वाठार जि. कोल्हापूर

🔅स्पर्धेचे मान्यवर परीक्षक🔅
मा. श्री. मधुकरराव गायकवाड, माजी कुलगुरू,
मा. डॉ. शशिकांत चौधरी, समीक्षक, लेखक,
मा. डॉ. चंद्रकांत जोशी, लेखक, कवी, चित्रपट पटकथाकर
🪄🪄🪄🪄🪄🪄🪄🪄🪄🪄
*सर्व विजेत्या पार्ट्यांचे सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

Photos from Pratap Krida Mandal, Shankarnagar-Akluj's post 28/02/2026

#सहकार_महर्षी_शंकरराव_मोहिते_पाटील_जयंती_समारंभ_समिती_शंकरनगर_अकलूज
आयोजित
#राज्यस्तरीय_लावणी_नृत्य_स्पर्धा_२०२६

अकलूज लावणी स्पर्धेचे दिमाखदार उदघाट्न

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव जतन करण्याचे कार्य केलेल्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अकलूज नगरीमध्ये त्यांच्या १०८ व्या जयंती निमित्त सालाबादप्रमाणे सहकार महर्षी जयंती समारंभ समितीच्या वतीने कलावंतांच्या पंखात बळ देऊन लोककलेला गतवैभव प्राप्त करून देणाऱ्या आदरणीय जयसिंह मोहिते-पाटील उर्फ बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक व नवकवींच्या लावण्यांच्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य स्पर्धेचे उदघाट्न मा. सौ. सुलक्षणादेवी मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री. विजयसिंह मोहिते-पाटील, जयंती समितीचे संस्थापक मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष मा.श्री.मदनसिंह मोहिते-पाटील, मा. सौ. सुमित्रादेवी खानविलकर, अकलूज नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक मा. चि. सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लावणी स्पर्धा कमिटीच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सहकार महर्षींच्या सांस्कृतिक कलेची जोपासना करण्याच्या उद्देशाने १९९३ सालापासून जयंती समितीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेतील पारंपरिक लावणीने जन-माणसात लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्येने रसिक प्रेक्षक या कलेचा निखळ आनंद घेतात. आजकालच्या डॉल्बीच्या युगात पारंपरिक लावणी जिवंत ठेवणे हे एक मोठे आव्हान असून समितीच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून अविरतपणे जयंती समितीचे संस्थापक मा. श्री. जयसिंह मोहिते-पाटील (बाळदादा) यांच्या मार्गदर्शनाखाली कलेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लावणी स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. शेवटी सर्व कलाकारांचे, पार्टी प्रमुख, थिएटर मालक उपस्थित रसिकांचे स्वागत केले.
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा, पार्टी प्रमुखांचा यथोचित सत्कार जयंती समितीच्या वतीने करण्यात आला.
यानंतर स्पर्धेतील लावण्यांच्या सादरीकरणास सुरुवात झाली.
आज अलंकार सांस्कृतिक कला केंद्र, सुपा, गीता अश्विनी, श्रुती वाईकर, रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, गोकुळ शिरगांव, अपर्णा, कीर्ती नगरकर, लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी वैशाली समसापूरकर, जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी व बेला, श्रद्धा नेतटूरकर सांस्कृतिक कला केंद्र, खोसपुरी फाटा (पांढरीचा पूल) या पार्ट्यांचे सादरीकरण झाले. यावेळी लावणी कलाकारांनी वेगवेगळ्या अदा, कला व नजाकतेचे प्रदर्शन करून रसिक प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यांनी लावणी कलाकारांना दाद देताना स्वतःही त्यांच्या सोबत ठेका धरत त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमास सहकार महर्षी लावणी कलावंत पुरस्कर्ते रेश्मा परितेकर, प्रमिला लोदगेकर, पांडुरंग घोटकर, थिएटर मालक सुरेखा पवार, कल्याणी घावरे, अनिता डवरी, डॉ. अशोकराव जाधव, किसनराव जाधव, सुरेश हरगुडे, भरत पालवे, संदीप चंदन, रूपा परभणीकर यांचे सह कलाकार,रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील, किरण सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समारंभ समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Akluj?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Akluj