sports.news.mh20

sports.news.mh20

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from sports.news.mh20, Sports, Station Road, Aurangabad.

30/09/2022

*क्रीडा प्रेमी व खेळाडूंची मागणी पाहता विभागीय क्रिडा संकुल रविवारी सुध्दा सुरू ठेवण्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे आदेश*
https://youtu.be/K1PnE5aeKeA

औरंगाबाद, दि.29 (जिमाका) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार विभागीय क्रीडा संकुल समिती मार्फत सुतगिरणी परिसरातील 26 एकरांवर विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात आलेले आहे. संकुलामध्ये विविध क्रीडा सुविधांचा वापर नियमित सुरू असतो. या संकुलाच्या देखभाल दुरूस्ती कारणाने संकुल रविवारी बंद ठेवण्यात येत असे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीमध्ये सर्व क्रीडा प्रेमी व खेळाडू यांच्या मागणीनुसार विभागीय संकुलामधील सर्व सुविधा रविवारी सुध्दा उपलब्ध करुन देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे 2 ऑक्टोबर पासून विभागीय क्रीडा संकुलातील सर्व सुविधा रविवारी सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने सर्व क्रीडा प्रेमी व खेळाडूंनी रविवारी देखील संकुलातील सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांनी केले आहे.
Sports.News.MH.20

24/04/2022

खुल्या बुध्दीबळ स्पर्धेत औरंगाबादचा इंद्रजीत महिंदरकर ठरला चॅम्पियन

अहमदनगर(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना अत्यंत क्रीयाशील संघटना असून, खेळाडूंच्या विकासासाठी व बुध्दीबळ खेळाला चालना देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित असते. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडू शार्दुल गागरे यांच्या रूपाने ग्रँडमास्टर घडविण्यात आला आहे. तो जिल्ह्यातील खेळाडूंचे बलस्थान आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्रातून जास्तीत जास्त ग्रँडमास्टर घडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. लवकरच शहरात राष्ट्रीय पातळीवर बुध्दीबळ स्पर्धा घेण्याचा निश्‍चय अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला.
शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या समारोपप्रसंगी फिरोदिया बोलत होते. बडी साजन मंगल कार्यालयात तीन दिवस आंतरराष्ट्रीय मानांकित खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील 232 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचा समारोप रविवारी (24 एप्रिल) फिरोदिया यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षिस वितरणाने झाले. यावेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्‍वस्त पारूनाथ ढोकळे, कार्तिक आदींसह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे फिरोदिया म्हणाले की, कोरोनाच्या दोन वर्षानंतर शहरात पहिल्यांदा खुली बुद्धिबळ स्पर्धा यशस्वी पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेत खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत सर्वात लहान साडेचार वर्षाच्या खेळाडूपासून ज्येष्ठ नागरिक व महिलांनीही सहभाग नोंदवला. खेळाडूंना प्रोत्साहन देऊन बुध्दीबळाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात यशवंत बापट म्हणाले की, कोरोना काळात खेळाडूंसाठी ऑनलाईन बुध्दीबळ स्पर्धा व प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आली. स्पर्धेत कोणत्याही प्रकारे खंड पडू दिला नाही. प्रत्यक्ष पटलावर विविध वयोगटाच्या स्पर्धा घेतल्या. याचा फायदा नगरच्या खेळाडूंना या स्पर्धेत निश्‍चित झाला. नरेंद्र फिरोदिया यांचे बुद्धिबळ खेळाडूंना नेहमीच पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या तीन दिवसात ज्या खेळाडूंचे वाढदिवस त्यांना घरी साजरे करता आले नाही, त्यांचे वाढदिवस स्पर्धेच्या ठिकाणी संघटनेच्या वतीने करण्यात आले. कोहिनूरच्या नीता प्रदीप गांधी यांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

19/11/2021

मालिका जिंकण्याच्या तयारीने उतरेल भारतीय संघ

28/08/2021

सर्व सत्कार मूर्ती सदस्यांनी उद्या *सकाळी ९:३० वा*. स्थळ:-
भानुदास चव्हाण सभागृह
गोरमेंट इंजिनिअरिंग कॉलेज शेजारी उस्मानपुरा रेल्वे स्टेशन रोड इथे उपस्थित रहावे असे आव्हान औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे सचिव गोविंद शर्मा व सर्व ऑलिम्पिक संघटना सदस्य यांनी केले आहे कार्यक्रम वेळेवर सुरू होईल

15/08/2021

🇮🇳🇮🇳15 ऑगस्ट 2021🇮🇳🇮🇳

08/06/2021

*सोळा वर्षांखालील राज्य निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या दिवसा अखेर मुलांच्या गटात हृदय शेठ व जीत शाह संयुक्तपणे आघाडीवर तर मुलींच्या गटात संस्कृती वानखेडेने घेतली एका पूर्ण गुणाची बढत*

ऑनलाइन चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेत १६ वर्षांखालील गटात विक्रमी २६४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
मुलांच्या गटात १८६ तर मुलींच्या गटात ७८ खेळाडूंमध्ये बक्षिसांसाठी चढाओढ असेल.
या गटांमधील विजेत्या खेळाडूंना उद्याचे महाराष्ट्राचे भविष्य मानले जाते. या गटांमधील अजिंक्य पदासाठी खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंमध्ये चुरस असेल, मुलांच्या गटात आदित्य सामंत, कशीश जैन, जीत शाह या तुल्लबळ खेळाडूंसह ११० मानांकित खेळाडू असल्याने इथे नक्कीच कडवी लढत पहावयास मिळेल.

मुलींच्या गटात देखील यावेळी लढती रंगणार असून जळगावची भाग्यश्री पाटील, औरंगाबादची तनिषा बोरमाणीकर, संस्कृती वानखेडे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुले व मुली दोन्ही गटांत तीन फेऱ्या खेळवल्या गेल्या. काही मोजके अपवाद सोडले तर बाकी सर्व मानांकित खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना लीलया पराभूत करत दुसऱ्या दिवसाच्या कडव्या लढतींचे संकेत दिले.

दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या, सहाव्या फेरीमध्ये, मुलांच्या पहिल्या पटावर, हृदय शेठ ने कशिश जैन ला पराभूत करत विजेतेपदा कडे आपली वाटचाल सुरू केली आहे. कशिश च्या 'पर्क' या बचाव पद्धतीला भेदत पांढऱ्या प्यादाची 'ड ५' चाल खेळली आणि नंतर काळ्याच्या पटाचा मध्य खिळखिळा केला, आपल्या उंटाला थेट 'सी ५' घरावर बळकट केल्यावर एकापेक्षा एक चाली रचत त्याने कशिश ला पुरते बेजार केले, शेवटी वेळे अभावी काळयाला डाव सोडावा लागला.

मुलींच्या गटात पहिल्या पटावर संस्कृती व भाग्यश्री मधील लढत 'क्वीन्स गॅम्बिट डीक्लाईन' या लोकप्रिय बचाव पद्धतीने झाली,
पांढऱ्या सोंगट्या नी खेळणाऱ्या संस्कृतीने डावाच्या सुरवातीस प्यादाची मारामारी करीत लढाईचे मैदान मोकळे केले, तीस चाली पर्यंत पटावरची परिस्थिती एकसमान होती पण मोकळ्या झालेल्या काळया राजाकडील बाजूने घात केला. संस्कृतीने मोकळ्या 'सी' पट्टीवरून वजीर व हत्ती फिरवीत,शेवटच्या आडव्या फळीतून व उघड्या पडलेल्या एच पट्टीतून काळ्या राजावर घणाघाती हल्ला चढवला व ५७ व्या चालीत भाग्यश्रीला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.

सहाव्या फेरीचे अखेरचे निकाल हाती आले तेंव्हा हृदय व जीत सहा गुणांसह आघाडीवर होते तर आदित्य सामंत साडेपाच गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर होता, मुलींच्या गटात देखील संस्कृती सहा पैकी सहा गुणांसह आघाडीव

03/05/2021

क्रीडा भरती तर्फे हनुमान जयंती निमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाइन Ludo स्पर्धेतील विजयी खेळाडू..

03/05/2021

क्रीडा भरती तर्फे घेण्यात आलेल्या ludo स्पर्धेतील विजेते खेळाडू.

Photos from sports.news.mh20's post 26/02/2021

Athlete Hima Das appointed deputy superintendent in Assam Police congratulations

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Station Road
Aurangabad
431005