Kishor Navkar

Kishor Navkar

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kishor Navkar, Sports Event, Aurangabad.

01/01/2026
22/12/2025

इंडियन कॅडेट फोर्स (ICF): राष्ट्रनिष्ठा, शिस्त आणि साहसाची प्रेरणादायी वाटचाल

छत्रपती संभाजीनगरातील एन.सी.सी.च्या माजी विद्यार्थ्यांनी १९९१ साली स्थापन केलेली इंडियन कॅडेट फोर्स (ICF) ही तरुणांना राष्ट्रसेवा, शिस्त आणि साहसी जीवनाकडे वळवणारी संस्था आहे. ‘सत्य, संकल्प, सिद्धी’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांतून प्रेरणा घेत कमांडर विनोद नरवडे यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेची पायाभरणी झाली.

१५ ऑगस्ट १९९७ रोजी भव्य महासंचलनातून ICF ने सार्वजनिक कार्याची सुरुवात केली. राष्ट्रीय एकात्मता रॅली, युवक प्रशिक्षण शिबिरे, प्री-सोल्जर ट्रेनिंग कॅम्प, एमपीएससी मार्गदर्शन, रक्तदान शिबिरे, गणेशोत्सवात विशेष पोलीस अधिकारी म्हणून सेवा, तसेच ओडिशा चक्रीवादळ व गुजरात भूकंपातील मदतकार्य यात संस्थेचा उल्लेखनीय सहभाग राहिला आहे.

साहसी उपक्रम हे ICF चे विशेष बलस्थान आहे. सह्याद्रीतील सिंहगड, रायगड, तोरणा, लिंगाणा, अंकाई यांसह अनेक किल्ले, तसेच हिमालयातील एव्हरेस्ट बेस कॅम्प, गंगोत्री, जोगीण-३, सुदर्शन पर्वत, अशा अनेक हिमालयातील गिर्यारोहण मोहिमा आयोजित केल्या आहेत. आयसीएफशी संबंधित शेख रफीक (महाराष्ट्र पोलिस दलातील पहिले एव्हरेस्टवीर) आणि डॉ. मनिषा वाघमारे (मराठवाड्यातील पहिल्या महिला एव्हरेस्टवीर) आणि अलीकडे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एलिब्रूस आणि आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो हे दोन्ही शिखर आयसीएफच्या किशोर नावकर, सुरज सुलाने, विनोद विभुते, डॉ. प्रशांत काळे, दत्ता सरोदे यांनी या आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहे. ही या परंपरेची ठळक उदाहरणे आहेत.

संस्थेचे संस्थापक कमांडर विनोद नरवडे हे उत्कृष्ट संघटक, क्रीडाप्रेमी आणि समाजसेवक आहेत. विविध पुरस्कारांनी सन्मानित नरवडे यांचे स्वप्न ५० एकरांत सैनिकी शाळा उभारण्याचे आहे. आज त्यांच्या मार्गदर्शनातून प्रेरित सहकारी आयसीएफची राष्ट्रनिष्ठ परंपरा पुढे नेत आहेत.

ICF म्हणजे केवळ संस्था नाही,
तर राष्ट्रासाठी घडणारी एक शिस्तबद्ध, साहसी आणि समर्पित पिढी.
—————————————————
सह्याद्री मित्र संमेलन नाशिक

Photos from Kishor Navkar's post 10/09/2025

" क्रीडा शिक्षक किशोर नावकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित "

सृजन शैक्षणिक प्रतिष्‍ठान बिडकीन तर्फे आयोजित “उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार” या वर्षी श्री.किशोर बाबुराव नावकर (क्रीडा शिक्षक व प्रसिद्ध गिर्यारोहक, स. भु. प्रशाला, जालना) यांना प्रदान करण्यात आला.

सदर पुरस्काराचे वितरण मा. न्यायमूर्ती अंबादासराव जोशी (मा. लोकायुक्त, गोवा) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. श्रीमती सईदा फिरासत (रिटायर्ड मेजर, चेअर पर्सन जिल्हा सैनिक बोर्ड) व मा. श्री. सुधीर देशपांडे (प्रसिद्ध उद्योगपती) यांच्या प्रमुख उपस्थितीत खास समारंभात करण्यात आले.

या यशाबद्दल सरस्वती भवन शिक्षण संस्थेचे मा . सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, स्थानिक शालेय समिती अध्यक्षा प्रा. डॉ. ज्योती धर्माधिकारी- (कुलकर्णी, ) सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी किशोर नावकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढलेली असून हा पुरस्कार मी माझी शाळा ,माझी संस्था आणि माझ्या विद्यार्थ्यांना समर्पित करून भविष्यामध्ये मी नक्कीच आदर्श विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करणार , अशी प्रतिक्रिया आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री किशोर नावकर यांनी दिली .

29/08/2025

🏑🏏🤾‍♀️⛹️‍♂️🤼‍♂️🏊‍♀️

चला प्रत्येक खेळाला संस्मरणीय बनवूया आणि प्रत्येक हृदय अभिमानाने भरून जाऊ दे!

या राष्ट्रीय क्रीडा दिनी, ट्रॅकवर धावणारा प्रत्येक धावपटू, मैदानावरील प्रत्येक खेळाडू आणि अंतिम रेषेचा पाठलाग करणाऱ्या प्रत्येक स्वप्नासाठी जयघोष करूया. खेळ आपल्याला एकजुटीने उभे राहण्यास, अधिक जोमाने लढण्यास आणि आपण कुठूनही आलो किंवा कसेही खेळलो तरीही आनंदी राहण्यास शिकवतात!

प्रत्येक आनंदाच्या क्षणी भारताला एकत्र आणूया. एक तास खेळाच्या मैदानात, कारण जेव्हा आपण एकत्र खेळतो तेव्हा चमत्कार होतो!

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Aurangabad
431001