चौधरी स्टील फर्निचर , भिगवण.

  • Home
  • India
  • Bhigvan
  • चौधरी स्टील फर्निचर , भिगवण.

चौधरी स्टील फर्निचर , भिगवण. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from चौधरी स्टील फर्निचर , भिगवण., Sports, Bhigvan.

Cool water jar,,,,,,
17/03/2024

Cool water jar,,,,,,

09/03/2024

*भिगवणचे बदलते रूप*

इंदापूर तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाणारे भिगवण हे अत्यंत महत्त्वाचे शहर!
भिगवण हे ३० ते ३५ खेडेगावांची मुख्य बाजारपेठ असून नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्याचे ते मध्यवर्ती ठिकाण आहे, म्हणूनच येथे नगर जिल्ह्यातील खेड,राशीन, आखोनी वायसेवाडी या गावांबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील पोमलवाडी, खातगाव,कोंढारचिंचोली, जिंती त्याचबरोबर दौंड तालुक्यातील राजेगाव, वाटलुज,खानोटा यांसारख्या ३५ ते ४० गावांतील लोक भिगवण गावामध्ये व्यापार व अनुषंगिक कामासाठी येत जात असतात.त्यांची नेहमीच याठिकाणी वर्दळ असते, भिगवण मधूनच राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे अत्यंत वेगाने या भागात दळणवळण सुविधा निर्माण झालेल्या आहेत . नैसर्गिक दृष्ट्या हा भाग निसर्ग संपन्न आहे. भैरवनाथ हे भिगवणचे ग्रामदैवत असून अष्टमीच्या दिवशी भव्य यात्रा भरते. बारामती-राशीन व पुणे सोलापूर या महामार्गामुळे हे गाव अधिक विकसित होत आहे.

*भिगवण म्हणजे मत्स्य हब*
भिगवणला उजनी जलाशयाचा फुगवटा असल्याने येथे मासेमारी व मत्यव्यापार फार मोठ्या प्रमाणात चालतो.येथील मत्स्य व्यवसायाची उलाढाल दिवसभरात करोडो रुपयांची होत असते. भिगवण हे मत्स्य खवय्यांचे आवडते ठिकाण आहे. तमाम महाराष्ट्रात भिगवणची मच्छी प्रसिद्ध आहे. येथे गणेश थोरात यांची जगदंबा खानावळ,दादा थोरात यांची वैष्णवी खानावळ, वचकला अण्णांची तुळजाभवानी खानावळ ,
नारायण बंडगर यांची मार्तंड मच्छी खानावळ, भोई गुरुजी यांची लक्ष्मी खानावळ,
रामभाऊ कोळी यांची जय मल्हार खानावळ,
प्रसिद्ध आहेत.दररोज दीड ते दोन हजार किलो मासे या खानावळीमधून मत्स्य खवय्ये फस्त करत असतात हे विशेष.

*भिगवण येथील बिल्ट कंपनी*
भिगवण पासून जवळच पोंधवडी भादलवाडी गावच्या हद्दीमध्ये एमआयडीसीचे क्षेत्र असून बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी, एम्ब्रीज कंपनी,बिल्टेक कंपनी, टॉवेल कंपनी हे उद्योगसमूह येथे कार्यरत आहेत. यातील बिल्ट ग्राफिक ही कागद कंपनी आशिया खंडात नामांकित असून पाच ते सहा हजार लोक येथे काम करीत आहेत.या कंपनीमुळे लोकांची जीवनशैली,राहणीमान व दरडोई उत्पन्नात चांगलीच भर पडली आहे.

*भिगवण मधील प्रसिद्ध शैक्षणिक संकुले*
इंदापूर तालुक्यातील अजित क्षीरसागर यांच्या भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे एकमेव बीएड कॉलेज आहे.क्षीरसागर यांच्या शैक्षणिक संकुलात ' केजी टू पीजी' गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळत आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे वृत्तपत्र विद्या, शाळा व्यवस्थापन पदविका व ज्यांना बाह्य शिक्षण घ्यावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठातून क्षीरसागर शैक्षणिक संकुलात संधी मिळत आहेत.याचबरोबर विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम देखील खूप गुणवत्तापूर्ण व कौशल्याधिष्ठीत उपक्रम राबवत असते. दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंजिनिअरिंग, फार्मसी कॉलेज सुरू आहे.आतापर्यंत दत्त्तकला मधून शिक्षण घेऊन हजारो गोरगरीब विद्यार्थी अभियंता व मेडिकल क्षेत्रात उत्तम काम करीत आहेत.अनेक मुलींना व्यावसायिक शिक्षणाची संधी दत्तकला मुळे मिळाली आहे. रयत शिक्षण संस्थेचे भैरवनाथ विद्यालय,डॉ चंद्रकांत खानावरे यांचे आदर्श विद्यामंदिर, नानासाहेब बंडगर यांचे माध्यमिक विद्यालय, विद्या प्रतिष्ठानचे अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूल अशी विविध शैक्षणिक संकुले गुणवत्ता जोपासण्याचे कार्य करताना दिसत आहेत.

*जे ई ई व नीट अकॅडमी भिगवण*
प्रा.सागर देवकाते, प्रा.अजिंक्य ननवरे , प्रा.संकेत वायसे यांचे ज्ञानसागर लर्निंग सेंटर तसेच प्रा.विवेक कोकरे यांची विद्यानिकेतन सायन्स अकॅडमी तर थोरात स्कूल ने ही याकरिता स्वतंत्र मार्गदशन केंद्र सुरु केले आहे. या माध्यमातून जे ई ई व नीट परीक्षांची विद्यार्थ्यांची उत्तम तयारी या परिसरामध्ये करून घेतली जात आहे.

*भिगवणची हॉटेलाई*
भिगवण येथे चंद्रशेखर पवार यांची मिसळ प्रसिद्ध असून हॉटेल सागर,हॉटेल विहान, हॉटेल श्री व्हेज, हॉटेल ज्योती व्हेज,हॉटेल आनंद, हॉटेल राजयोग आणि अलीकडेच भिगवण- मदनवाडी चौफुला येथे सुरु झालेले विकास बंडगर यांचे पंचतारांकित लॉजींग बोर्डिंग 'हॉटेल रॉयल इन' रोहन जाधव यांचे हॉटेल सूर्या तसेच मानकर डोसा, जोगेश्वरी मिसळ, संजय सकुंडे यांची ऑस्करवाडी मिसळ या शाखा देखील अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या आहेत.

*टायर्स संबधीत सर्व सर्व्हिस फक्त एका कॉल वर*
भिगवण बस स्थानकासमोर असणारे
बॉबी टायर्स अँड रिमोल्डिंग वर्क्स हे भिगवण मध्ये
टायर संबधीत सर्व सर्व्हिस फक्त एका कॉल वर देत आहेत. गेल्या ४० वर्षापासून ते या क्षेत्रात काम करीत आहेत.थॉमस मथाई, बिबिन थॉमस, बॉबी थॉमस हे प्रोप्रायटर असून अपोलो, योकोहोमो ,जेके टायर्स या कंपनीचे ते अधिकृत विक्रेते आहेत. रिमोल्डिंग वर्क्स मध्ये देखील ते खूप चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत.

*भिगवणचा सराफ व्यवसाय*
भिगवण हे अनेक गावांचे केंद्र असल्याने येथे सोने खरेदीची प्रचंड उलाढाल चालू असते.सराफ व्यवसायामध्ये अत्यंत नामांकित व विश्वासार्ह दुकान म्हणजे सुनिल उदावंत व मनोज उदावंत या बंधूंचे हरी ओम ज्वेलर्स, उजनी ज्वेलर्स,वैष्णवी ज्वेलर्स नुकतेच जे बी एस सराफ यांचे सुवर्णपेढीचे दालन देखील या ठिकाणी सुरू झाले आहे.या दुकानांमधून करोडो रुपयांचा व्यवसाय होत असतो. ग्राहक बारामतीच्या ऐवजी येथे पसंती देताना दिसत आहेत.

*भिगवण येथे अत्याधुनिक हॉस्पिटलस*
भिगवण मधूनच राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने अपघाताचे प्रमाण जास्त आहे. तसेच अनेक खेड्यांच्या संपर्काचे ते ठिकाण असल्याने अत्याधुनिक हॉस्पिटलची गरज होती. डॉ. महेश गाढवे, डॉ. ज्ञानेश्वर रेणुकर यांचे यशोधरा हॉस्पिटल, तक्रारवाडी येथील डॉ विनोद कुटे, डॉ संजय भोसले, डॉ योगिता भोसले यांचे लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, डॉ मिथुन यादव यांच्यासह चार डॉक्टर मित्रांनी सुरु केलेले भिगवण मेडिकेअर हॉस्पिटल, डॉ नितीन काळे यांचे स्वामी समर्थ हॉस्पीटल यांनी ही गरज भरून काढली असून सर्व सोयींयुक्त अत्याधुनिक हॉस्पिटल मधून ही रुग्णसेवा सुरू आहे.

*फिटनेस करीता जिम*
भिगवण मध्ये अमोल गायकवाड यांची डायमंड जिम,मंगेश निंबाळकर यांचे अल्टिमेटम,प्रसाद बोगावत यांची पी बी फिटनेस य जिम असून या जिमच्या माध्यमातून उत्तम बरोबर केली जात आहे तसेच दत्ता गायकवाड यांचे कुस्ती केंद्र भिगवण मध्ये आहे.

*भिगवण मध्ये नामांकित मॉल्स*
भिगवण शहरामध्ये संजय चौधरी यांचे चौधरी स्टील आणि फर्निचर, सचिन बोगावत यांचा बोगावत बिग बझार,रणजीत भोंगळे यांचा रणजीत बिग बझार, मदनवाडी चौफुला येथील मातोश्री बझार या आधुनिक मॉल्समधून ग्राहकांना तत्पर सेवा दिली जात आहे.

*कापड व्यवसायिकांचे भिगवण*
भिगवण हे स्वस्त व दर्जेदार कापड व्यवसायासाठी प्रसिद्ध असून प्रियांका गुंदेचा व संदीप गुंदेचा यांचे ओम क्रिएशन,रायसोनी रेडीमेड, वैभव क्लॉथ सेंटर ,गायकवाड साडी सेंटर ,एस के कलेक्शन,धैर्यशील मारकड यांचे पैलवान मेन्स वेअर अशी नामांकित दुकाने भिगवण मध्ये असून या माध्यमातून व्यवसायाची लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. गुंदेचा यांच्या ओम क्रिएशन दुकानात खादी कपडे घेण्यासाठी विविध ठिकाणाहून लोक ओम क्रिएशनला भेट देत
असतात

*पक्षी प्रेमींना भुरळ घालणारे पर्यटन केंद्र*
भिगवण परिसरात उजनी जलाशय मधील या रंगीबेरंगी परदेशी पक्षांची विहंगम दृष्य पाहायला मिळतात.
उजनीच्या बॅक वॉटर मुळे फ्लेमिंगो,
पेंटेड स्टोर्क, ओपन बिल स्टोर्क, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, सीगल, स्पून बील, लार्ज इग्रेट, नाईट हेरॉन आणि अशाच आकर्षक पक्षांची जत्राच या शांत वातावरणात भरलेली असते हे सर्व परदेशी पाहुणे पक्षी पावसाळा सुरू होईपर्यंत या परिसरात मुक्काम करतात.
संदीप नगरे यांचे अग्निपंख फ्लेमिंगो पॉईंट कुंभारगाव, दत्ता नगरे यांचा क्रांती फ्लेमिंगो पॉईंट कुंभारगाव ,उमेश सल्ले यांचा बर्ड नेक्स्ट फ्लेमिंगो पॉईंट,कुमार नगरे यांचा नगरे फ्लेमिंगो पॉईंट, , कुंडलिक धुमाळ यांचे उजनी पार्क, कुंडलीक बंडगर यांचे समृद्धी बर्ड वॉचिंग पॉईंट अशी अधिकृत पक्षी निरीक्षण केंद्रे भिगवण मध्ये असून पुणे व इतर ठिकाणाहून अनेक लोक पक्षी निरीक्षणासाठी या भागात भेट देत असतात

*भिगवण मधील मंगल कार्यालये*
पुणे सोलापूर महामार्गावरील नानासाहेब बंडगर यांचे व्यंकटेश लॉन्स, मनीष शर्मा यांचे श्याम गार्डन,माऊली वणवे यांचे विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय,चंद्रशेखर पवार यांचे ताराही लॉन्स ही मंगल कार्यालये भिगवण परिसरात उत्तम रीतीने लोकांना सेवा देत आहेत. तर शेजारीच असणाऱ्या मल्लिनाथ मठामध्ये देखील अत्यंत अल्प दरामध्ये विवाह व मंगल कार्यक्रमासाठी सेवा दिली जात आहे.

*भिगवण रिअल इस्टेट*
भिगवण शहरामधील जमिनीचे खरेदी विक्रीचे दर हे बेंगलोर शहराच्या दराप्रमाणे असून येथे नामवंत ठिकाण असल्याने येथील मेन पेठेतील जागेचे भावही गगनाला भिडले आहेत तर शेतकऱ्याच्या जमिनीला चांगलेच महत्व आले आहे.
भिगवणचा बाजार हा रविवारच्या दिवशी भरत असून येथे वीस पंचवीस गावातील लोक बाजारला येत असतात. कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या,जनावरांची सुद्धा विक्री या दिवशी होत असल्याने लोकांची मोठी वर्दळ दिसून येते.

*धर्मनिरपेक्ष भिगवण*
भिगवण गावात सर्व जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने राहताना दिसतात हे गावचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे.हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारी तक्रारवाडी गावची पिराची यात्रा याच भागात भरत असते, कोणत्याही एका जातीला जाती धर्माला भिगवण चिकटलेले नाही हे गावचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच परप्रांतय बांधवांना देखील भिगवण आपलेसे वाटते.

*भिगवणची नगरपंचायतीकडे वाटचाल*
नगरपंचायत होणेकरिता मोठ्या नगरपालिकेपासून २० किलोमीटर पेक्षा कमी अंतर, तसेच दहा ते पंचवीस हजार लोकसंख्या असल्यास व २५ टक्के लोक शेती व्यवसाय व्यतिरिक्त इतर व्यवसायावर अवलंबून असल्यास नगरपंचायत अस्तित्वात येते. भिगवण,मदनवाडी, तक्रारवाडी या सलग गावांची लोकसंख्या २५ हजारापेक्षा अधिक असून भविष्यात भिगवणची वाटचाल नगरपंचायत दिशेने सुरू आहे हे निश्चित!
*डॉ काशिनाथ सोलनकर*
संपर्क -८६६९१८१९२०
(सदर लेख दै. पुण्यनगरी वर्धापन दिनानिमित्त लिहिलेला आहे.)

12/10/2023
  Day,  day,   Day,   ,,,, साठी आता नवीन गिफ्ट ॲटम - चॉकलेट बुके उपलब्ध.
31/01/2023

Day,
day,
Day,
,,,, साठी आता नवीन गिफ्ट ॲटम - चॉकलेट बुके उपलब्ध.

उपलब्ध,,,,,
08/01/2023

उपलब्ध,,,,,

26/04/2022

Address

Bhigvan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चौधरी स्टील फर्निचर , भिगवण. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category