Mountaineers Association Dombivli
Thinking of joining an Adventure club? Sure, Get yourself outside and active, get to learn new skills. Get good health and fitness. What are you waiting for?
Get to go on cool adventures and meet new, like-minded people. join up to our club now!
21/07/2026
माउंटेनियर्स असोसिएशन डोंबिवली संस्थेतर्फे पावसाळी ट्रेक वाघबीळ येथे श्री मनोज हरड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. या ट्रेक मध्ये २८ सभासद सहभागी झाले होते.
वाघबीळ धबधबा येथे जाण्यासाठी बदलापूर रेल्वे स्टेशन ला उतरून रिक्षा किंवा प्रायव्हेट गाडीने जाता येते.सावरोली गाव साधारण ८ किमी आहे. सावरोली गावात आपली जेवण, नाश्ता, गाईड याची सोय होऊ शकते. वाघबीळ धबधबा येथे पोहचण्यासाठी साधारण ०१.३० तास वेळ लागतो. जंगलात असंख्य पायवाटा असल्याने गावातून गाईड घेऊन जाणे. ट्रेक मध्ये दोन मोठे ओढे लागतात. भरपूर पाऊस असेल तर ओढा पार करताना काळजी घ्यावी.ट्रेक मध्ये ०५ वर्षाचा ईशान व ७५ वर्षाचे दत्तात्रय,पद्मनाभ सहभागी झाले होते. .
राजेश, शिवाजी, कविता, श्रावणी, पूनम,भूषण, सृष्टी, शुभांगी, सायली, ओंकार, मनिषा, मनोहर,क्षितिजा, मेघना,अमृता, उज्ज्वल, निहित, पूनम सोहनी, सुरभी, सुदिप्ती, अजय, शंकर,सुजय,रुद्र हे या ट्रेकमध्ये सहभागी झाले होते.
धबधबा मध्ये किंवा केव्ह मधे जाताना निसरडे ( slippery) आहे .पावसाळी ट्रेक करताना सर्वांनी काळजी घ्यावी.
डॅडी
सतीश गायकवाड
04/07/2026
*गोनिदा दुर्गवारी दिन उपक्रम*
ज्येष्ठ दुर्ग महर्षी लेखक गो नि दांडेकर उर्फ आप्पा यांचा दि. ८ जुलै हा जन्मदिवस आपण अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने " गो नि दां दुर्गवारी दिन" या स्वरूपात दरवर्षी साजरा करतो. ज्यांनी महाराष्ट्रातील आबालवृद्धांची पावले डोंगरांकडे, गडकिल्ल्यांकडे वळवली , पुण्यश्लोक श्री शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने ,मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमाने पावन झालेल्या गडकोटांची आवड महाराष्ट्राच्या तमाम जनतेला ज्यांनी लावली त्या आदरणीय गो नि दां ची आठवण म्हणून आपण त्यांचा जन्मदिन दुर्गवारी दिन म्हणून साजरा करत असतो. गेले काही वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण हा दिन साजरा करत आलो आहोत. त्यामध्ये गोनिदांच्या कादंबरीचे अभिवाचन, जवळच्या दुर्गांवर दुर्गभ्रमंती, गोनिदां वरील लघुपट "किल्ले पाहिलेला माणूस" याचे प्रदर्शन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण दुर्गवारी दिन साजरा करतो. यावर्षी पासून महासंघातर्फे आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत . ज्या संस्था गडकोटांवर सातत्याने दुर्ग स्वच्छता राबवतात त्या संस्थांना "गो नि दा स्वच्छता दूत " हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत . आपल्या परिसरातील ज्या संस्था या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांची माहिती आपण महासंघाला पाठवा. गेल्या आर्थिक वर्षात अर्थात १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधी केलेल्या दुर्ग स्वच्छता कार्याची माहिती महासंघाला पाठवावी.
त्याच प्रमाणे दरवर्षीप्रमाणे ८ जुलैला किंवा त्या आठवड्यामध्ये कधीही जवळपास किल्ला किंवा टेकडी यावर भ्रमंती आयोजित करून गो नि दांडेकराचे सह्याद्रीतील गडकोटाप्रती असलेले योगदान याची माहिती उपस्थित त्यांना द्यावी. आपण केलेल्या उपक्रमाचे फोटो तसेच व्हिडिओ महासंघाला पाठवावे त्याला योग्य ती प्रसिद्धी महासंघाकडून देण्यात येईल. महासंघाच्या संलग्न संस्था, गिर्यारोहण करणाऱ्या, दुर्ग संवर्धन करणाऱ्या, निसर्ग संवर्धन करणाऱ्या सर्व संस्थांनी या अनोख्या उपक्रमामध्ये सामील होऊन गो नि दां ना आदरांजली वाहूया!!
AMGM email id: [email protected]
9552522187
(for WhatsApp communication)
धन्यवाद,
उमेश झिरपे
अध्यक्ष, AMGM
ऋषिकेश यादव
कार्याध्यक्ष, AMGM
डॉ. राहुल वारंगे
सचिव, AMGM
01/07/2026
नायब सूबेदार (ऑन. कॅप्टन) बाणा सिंग PVC
जून १९८७ - सियाचेन, २१,००० फूट उंची.
नायब सुबेदार बाणा सिंग यांनी जवानांसह १,५०० फूट उंच वर्फाच्या भिंतीवर चढाई केली....
जवळ जवळ अभेद्य मानली जाणारी हिमशिखर चौकी मुक्त करण्यात त्यांनी यश मिळवले.
या मोहिमेत त्यांनी अद्वितीय नेतृत्व, असामान्य शौर्य आणि गिर्यारोहण कौशल्य दाखवले.
ही शौर्यगाथा ऐकुया...११-१२ जुलै २०२६
गिरिमित्र संमेलन, मुलुंड मुंबई.
त्वरित नोंदणी करा.
Online booking -
https://forms.easebuzz.in/register/MaharashtraZDDoU/23rdGirimitraSammelan2026
Offline Booking
Please contact -
Shrikar Pisolkar - 9869790146
Ameya Bole - 9869458462
01/07/2026
लेफ्टनंट जनरल रमेश कुलकर्णी PVSM, UYSM, AVSM
सन १९८७ ऑपरेशन राजीव
...उत्तर सीमाक्षेत्रातील लष्करी कारवाईची सर्वोच्च जबाबदारी त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
काय घडले ते ऐकुया...११-१२ जुलै २०२६
गिरिमित्र संमेलन, मुलुंड मुंबई.
त्वरित नोंदणी करा.
Online booking -
https://forms.easebuzz.in/register/MaharashtraZDDoU/23rdGirimitraSammelan2026
Offline Booking
Please contact -
Shrikar Pisolkar - 9869790146
Ameya Bole - 9869458462
01/07/2026
लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी PVSM, AVSM, SC,SM,VSM
१९८४, सियाचेन ग्लेशियर मध्ये १८,००० फूट उंचीच्या वर ऑपेरेशन मेघदूतची सुरुवात....
...या मोहिमेत कॅप्टन संजय कुलकर्णी यांनी उत्कृष्ट नेतृत्व, अदम्य शौर्य, अतिउंचीवरील गिर्यारोहण कौशल्य आणि कर्तव्यनिष्ठा दाखवून पराक्रम केला.
ही शौर्यगाथा ऐकुया...११-१२ जुलै २०२६
गिरिमित्र संमेलन, मुलुंड मुंबई.
त्वरित नोंदणी करा.
Online booking -
https://forms.easebuzz.in/register/MaharashtraZDDoU/23rdGirimitraSammelan2026
Offline Booking
Please contact -
Shrikar Pisolkar - 9869790146
Ameya Bole - 9869458462
26/06/2026
|| गिरिमित्र सन्मान २०२६ ||
- गिरिमित्र गिरिभ्रमण संस्थात्मक कार्य सन्मान -
* महेश केंदूरकर
* सचिन गायकवाड
* रमाकांत शिंदे
- गिरिमित्र संस्था सन्मान -
* प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम
* साद माऊंटेनियर्स
- गिरिमित्र शरद ओवळेकर सन्मान -
* अश्वमेध प्रतिष्ठान
23rd Girimitra Sammelan
11-12 July 2026
Maharashtra Seva Sangh, Mulund, Mumbai.
Online booking -
https://forms.easebuzz.in/register/MaharashtraZDDoU/23rdGirimitraSammelan2026
Offline Booking
Please contact -
Shrikar Pisolkar - 9869790146
Ameya Bole - 9869458462
26/06/2026
|| गिरिमित्र सन्मान २०२६ ||
गिरिमित्र जीवनगौरव सन्मान
* पद्माकर गायकवाड *
गिरिमित्र गिर्यारोहक सन्मान
* द्वारका डोखे
* भगवान चवले
* हितेंद्र मोरे
23rd Girimitra Sammelan
11-12 July 2026
Maharashtra Seva Sangh, Mulund, Mumbai.
Online booking -
https://forms.easebuzz.in/register/MaharashtraZDDoU/23rdGirimitraSammelan2026
Offline Booking
Please contact -
Shrikar Pisolkar - 9869790146
Ameya Bole - 9869458462
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
A201, Shreedhar Sudama SoC , RM 8, Sudama Nagar, MIDC Nivasi Vibhag, MIDC Dombivli East
Dombivli
421203