शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर

  • Home
  • India
  • Kolhapur
  • शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर

शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर हिंदवी स्वराजाचे संस्थापक व मराठी सा?

02/09/2026
ऐतिहासिक शिवाजी पेठेचा वारसा घराण्याचा उज्वल इतिहास या स्फूर्ती आणि प्रेरणेतून निर्माण झालेल एक कार्यतत्पर नेतृत्व कोल्ह...
26/08/2026

ऐतिहासिक शिवाजी पेठेचा वारसा घराण्याचा उज्वल इतिहास या स्फूर्ती आणि प्रेरणेतून निर्माण झालेल एक कार्यतत्पर नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्याचे उपमहापौर श्री. अक्षय जरग साहेब यांनी आपला जन्मदिवस विधायक पद्धतीने साजरा व्हावा आणि समाजामध्ये एक ऐतिहासिक संदेश जावा व इतिहासातील रणमर्द मावळ्यांच्या स्मृतीना उजाळा मिळावा यासाठी नाना सावंत संग्रहित शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित केले संग्रह पाहून उपमहापौर श्री.अक्षय जरग साहेब व नगरसेवक श्री.अजय इंगवले साहेब यांनी शिवगर्जना आखाड्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला....🚩🚩

आजच आपला प्रवेश निश्चित करा....🚩🚩
16/07/2026

आजच आपला प्रवेश निश्चित करा....🚩🚩

🚩शिवगर्जना आखाड्याची उत्तुंग कामगिरी 🚩🚩सण दिवाळीचा ,अभिमान शिवरायांचा|🚩 या अंतर्गत भारतीय जनता पार्टी कोल्हापूर यांच्या ...
12/05/2026

🚩शिवगर्जना आखाड्याची उत्तुंग कामगिरी 🚩
🚩सण दिवाळीचा ,अभिमान शिवरायांचा|🚩
या अंतर्गत भारतीय जनता पार्टी कोल्हापूर यांच्या माध्यमातून युनेस्को अंतर्गत येणाऱ्या 12 किल्ल्यांचा समावेश असलेला किल्ल्यांच्या प्रतिकृती स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेमध्ये शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था यांनी सहभाग नोंदवत सिंधुदुर्ग या किल्ल्याची उबेहूब प्रतिकृती साकारली.
किल्ला बांधणीचे महत्त्व तटबंदी, मुख्य दरवाजे, जंग्या, चोर दरवाजे, बुरुज, मंदिर, विहिरी, पाण्याच्या टाक्या कशा असाव्यात या स्थापत्य शास्त्राचा अभिमान म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला .या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिवरायांचा हाताचा व पायाचा ठसा किल्ला बांधणीच्या वेळेस चुन्यामध्ये उमटवलेला आहे. मोरयाचा धोंडा येथे केलेले पाया पूजन सर्वकाही हुबेहूब शिवगर्जनाचा रणरागिनी आणि मावळ्याने साकारले.तसेच परीक्षकांना गडाची इथ्यभूत माहिती दिली आणि याचाच परिणाम म्हणजे आज या गड प्रतिकृतीस वेगवेगळ्या स्पर्धात तीन बक्षीस मिळाली.
त्यापैकी भाजपा कोल्हापूर यांनी तृतीय क्रमांकाचे सन्मान चिन्ह रोख 25,000 रुपये असे मानाचे बक्षीस देऊन शिवगर्जनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
सर्व रणरागिनी आणि मावळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन असेच शिवगर्जनाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना.
🚩 आपली शिवगर्जना, आपली जबाबदारी🚩

उन्हाळी शिबिर 2026 आजच नोंदणी करा
24/04/2026

उन्हाळी शिबिर 2026

आजच नोंदणी करा

10/04/2026

Send a message to learn more

⚔️🚩 छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे युवानेते मृत्युंजय संजय गा...
17/02/2026

⚔️🚩 छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन संपन्न 🚩⚔️

बुलढाणा, दि. १६/०२/२०२६ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने बुलढाणा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
कोल्हापूर येथील शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे संचालक श्री संदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या प्रदर्शनीत शिवकालीन विविध शस्त्रांचे आकर्षक व ऐतिहासिक दर्शन घडविण्यात आले. स्वराज्य स्थापनेच्या काळातील शौर्य, पराक्रम व रणनितीची साक्ष देणारी तलवारी, भाले, ढाली व अन्य शस्त्रे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
या प्रदर्शनीचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा बुलढाणा नगरपालिका गटनेते युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा व शौर्याचा गौरव करत युवकांनी इतिहासातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपरिषद सभापती, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवकालीन इतिहासाचे जतन व संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
जय शिवराय! 🚩

06/11/2025
🚩 🚩शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था आयोजित किल्ले सिंधुदुर्ग प्रतिकृती उदघाटन व दीपावली उत्सव पारंपारिक वेशात...
23/10/2025

🚩 🚩शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था आयोजित किल्ले सिंधुदुर्ग प्रतिकृती उदघाटन व दीपावली उत्सव पारंपारिक वेशात साजरा करण्याचा आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
श्री. सुजितभाऊ चव्हाण (अध्यक्ष श्री शिवाजी तरुण मंडळ, शिवसेना जिल्हाप्रमुख)
श्री. अजिंक्य चव्हाण (मा. नगरसेवक, मा.स्थायी समिती सभापती)
श्री. किरण पवार (अध्यक्ष वाघाची)
श्री. विजयसिंह खाडे पाटील
श्री. दिलीप कदम सर (मास्टर श्री)
श्री. बबनराव मुसळे
श्री. मनोज नलवडे
श्री. संजय पाटील
श्री. जयदीप सर्वदे
सौ ऐश्वर्या देसाई
यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

तसेच इंग्रजी विषयात पी.एच.डी मिळवल्याबद्दल सौ हेमलता मुसळे, खाटीक समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ .सुनिता ताई घोडके व श्री दिलीप कदम सर यांचा सत्कार करण्यात आला. ततप्रसंगी आखाड्याचे अध्यक्ष श्री.नाना सावंत यांनी प्रास्ताविक पर भाषणात सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास कथन केला. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी राजेश पाटील, सागर लोहार ,राहुल भोसले, अजय सांगडे, अतुल निंबाळकर, शुभम सनगर, युवराज टाक, मल्हार सावंत ,पूजा पाटील ,अवधूत लोहार ,पूर्वा भोसले ,ईश्वरी भोसले, जानवी लोहार, आर्यन कामते, दर्श सावंत ,अर्जुन वाडेकर, यश गवळी, प्रतीक दिवटे ,परी लोहार यांनी कष्ट घेतले.

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share