महात्मा फुले व्यायामशाळा अंजनी बु।।

  • Home
  • India
  • Mehkar
  • महात्मा फुले व्यायामशाळा अंजनी बु।।

महात्मा फुले व्यायामशाळा अंजनी बु।। श्री. गजानन बहुउद्देशीय शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक संस्था अंजनी बु।।

अंजनी बुद्रुक येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात संपन्नमेहकर: तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील ...
11/04/2026

अंजनी बुद्रुक येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात संपन्न

मेहकर: तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील महात्मा फुले व्यायामशाळेत 11 एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना भास्करराव पाटील यांनी प्रतिपादन केले की, शिक्षणानेच मनुष्याला सत्य-असत्य आणि अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होते; हाच उद्देश समोर ठेवून महात्मा फुलेंनी शिक्षण चळवळ गतिमान केली. स्त्री शिक्षणासह सामाजिक सुधारणेची मुहूर्तमेढ रोवणारे फुले हे अज्ञानरुपी अंधकार दूर करणाऱ्या 'शिक्षण' या अस्त्राचे पुरस्कर्ते आणि आधुनिक समता-स्वाभिमान चळवळीचे जनक होते, त्यामुळे त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, महात्मा फुले हे समाजक्रांतीचे खरे जनक, शिक्षणतज्ञ आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे सखोल अभ्यासक होते; सध्याच्या काळात धर्मांमधील वाद थांबवण्यासाठी त्यांच्या तत्वज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भास्करराव पाटील, व्यायामशाळेचे अध्यक्ष गजानन पायघन, डॉ. अभिषेक अवचार, विनायक नागोलकर, करण पारिस्कर, प्रतिक पायघन व अन्य मान्यवरांनी महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विशाल पायघन यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन पायघन यांनी मानले असून, यावेळी व्यायामशाळेचे सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेहकर :-अंजनी बु. येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जन्मदिनानिमित्त महात्मा फुले व्यायामशाळेत आज दिना...
24/01/2026

मेहकर :-अंजनी बु. येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जन्मदिनानिमित्त महात्मा फुले व्यायामशाळेत आज दिनांक 23 जानेवारी रोजी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यायामशाळेचे अध्यक्ष गजानन पायघन यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संतोष लाड, भागवत पुंड, सतीश खडसे, विशाल पायघन, प्रतिक पायघन, अजय भोने, तन्मय तडस, बालाजी नागोलकर, आर्यन नागोलकर, प्रफुल खरात यांच्यासह अनेक मान्यवर तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मेहकर तालुक्यातील अंजनी बु।। येथील श्री. गजानन बहु. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक संस्था व स्व. दत्तात्रय सखाराम पायघन स...
03/01/2026

मेहकर तालुक्यातील अंजनी बु।। येथील श्री. गजानन बहु. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक संस्था व स्व. दत्तात्रय सखाराम पायघन सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व्यायामशाळेत 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शिवनेरी बहुउद्देशीय संस्था मेहकरचे अध्यक्ष संदिप गारोळे आपल्या भाषणात म्हणाले की, इतिहासात पती-पत्नी क्रांतीकारी असण्याची उदाहरणे फारच अभावाने सापडतात. त्यापैकी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले हे क्रांतीकारी दाम्पत्य होय. या दाम्पत्याने समाज उभारणीसाठी उभी हयात व्यतित केली. सर्व साधारणपणे १८२७ ते इ.स.१८९७ या कार्यकालापैकी जन्मा नंतरची दहा पंधरा वर्ष सोडली तर उर्वरीत ४०-४५ वर्षे समाज उभारणीसाठी घालवली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम देशामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्यामुळेच आपल्या समाजात स्त्रियांना मानाचे स्थान प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यायामशाळेचे सचिव दशरथ चनखोरे हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पायघन, माजी सरपंच अरुण लाड, उमेश चनखोरे, शुभम वानखेडे, गोविंद गायकवाड, प्रथमेश पायघन, अभिषेक इरतकर, रुपेश आल्हाट, प्रतिक पायघन, आर्यन नागोलकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पायघन यांनी करून विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी संदिप गारोळे, दशरथ चनखोरे, अरुण लाड, गजानन पायघन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पायघन यांनी केले तर आभार वाचनालयाचे उपाध्यक्ष विशाल पायघन यांनी मानले.

Address

At Po. Anjani Bk. Tq. Mehkar Dist. Buldana
Mehkar
443301

Opening Hours

Monday 5am - 8am
5:30pm - 8:30pm
Tuesday 5am - 8am
5:30pm - 8:30pm
Wednesday 5am - 8am
5:30pm - 8:30pm
Thursday 5am - 8am
5:30pm - 8:30pm
Friday 5am - 8am
5:30pm - 8:30pm
Saturday 5am - 8am
5:30pm - 8:30pm
Sunday 5am - 8am
5:30pm - 8:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महात्मा फुले व्यायामशाळा अंजनी बु।। posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share