संभाजी क्रीडा मंडळ -"रजि"

संभाजी क्रीडा मंडळ -"रजि"

Share

कला,क्रीडा,शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक !

23/12/2025

संभाजी क्रीडा मंडळ आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन २०२५

#भजन

Photos from संभाजी क्रीडा मंडळ -"रजि"'s post 14/12/2025

आदरणीय पदाधिकारी, सन्माननीय सदस्य, खेळाडू, कार्यकर्ते, आजी-माजी अधिकारी आणि मित्रपरिवार,

नमस्कार!

आज दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एसकेएम प्रीमियर लीगच्या (SKM Premier League) भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी आपणा सर्वांना कळविण्यात येते की, आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे.

प्रमुख अतिथी आणि वेळेची नोंद:

प्रमुख पाहुणे (Opening Ceremony): माननीय सोनाली ताई साळुंखे

उपस्थितीची वेळ: आज, दुपारी ठीक २:०० वाजता (14:00)

सर्वांना नम्र विनंती:
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने, मंडळाच्या वतीने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि सदस्यांना विनंती आहे की, कृपया दुपारी २ वाजण्यापूर्वीच कार्यक्रमस्थळी हजर राहून उपस्थिती (तयार) राहावे.

आपली बहुमूल्य उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवेल.

धन्यवाद! आयोजक, एसकेएम प्रीमियर लीग (SKM Premier League) -

Photos from संभाजी क्रीडा मंडळ -"रजि"'s post 14/12/2025

संभाजी क्रीडा मंडळ आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन २०२४/२५

27/07/2025

संभाजी क्रीडा मंडळा चे २०२५ चे दूसरे ८ थर 💪🚩
कांदिवली मधले पहिले ८ थर 💪🚩
कांदिवलीचा अभिमान 🚩💪

05/07/2025

Congratulations Mr. Siddhesh Kadam and Mr. Pranav Ghule from Shreem Hyundai who own Shoor Mumbaikar for acquiring
🔥

will now represent Shoor Mumbaikar in the Pro Govinda Season 3. Wishing them an inspiring and action packed tournament.

05/07/2025

कांदिवलीत जिगरबाज खेळाडूनी सहाभागी वा 💪
कांदिवली चा अभिमान 💪

02/07/2025

Qualification Round

01/07/2025

प्रो गोविंदा पर्व ३ मध्ये गोल्डन तिकिट प्राप्त करून घवघवित कामगिरी करत अंतिम १६ संघात स्थान मिळवले आहे !

प्रो गोविंदा संग २०२५

कांदिवलीतील जिगरबाज खेळाडूनी सहभाग वा 💪

सहभाग सर्वांचा अभिमान कांदिवलींचा

15/06/2025

एकच नाव.
एकच आवाज.
संभाजी क्रीडा मंडळ 🚩🚩
सहभाग सर्वांचा
अभिमान कांदिवली चा

Photos from संभाजी क्रीडा मंडळ -"रजि"'s post 25/02/2025

*!!सस्नेह जाहीर आभार!!*

*संभाजी क्रीडा मंडळाच्या वतीने अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्ताने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यताप्राप्त छत्रपती संभाजी राजे चषक भव्य कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदरची कबड्डी स्पर्धा ही संभाजीनगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री रामेश हरसोरा, नागेश बसूदे, विजय काळे व इतर सर्व पदाधिकारी तसेच संभाजी क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू श्री राजेंद्र जाधव श्री आनंद मिस्त्री श्री सुधाकर महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री श्याम दळवी सचिव अक्षय हरमळकर पदाधिकारी रोहित कांबळे अंकित अहिर गणेश सगर प्रशिक्षक श्री अंकुश जाधव सल्लागार अविनाश आवळे, मंडळाची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी सदैव धावपळ करणारे ज्येष्ठ पदाधिकारी श्री श्याम प्रसाद, संभाजी क्रीडा मंडळला मॅट उपलब्ध करून देणारे श्री किरण मुळे तसेच संभाजी क्रीडा मंडळ किशोर गट कुमार गट आणि प्रथम श्रेणी पुरुष गट कबड्डी संघातील तसेच गोविंदा पथकातील सर्व आजी-माजी खेळाडू व सर्वानी केलेल्या मेहनतीमुळे निर्विवाद व शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या दिमाखात पार पडली याबद्दल संभाजी क्रीडा मंडळाच्या वतीने आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद व सस्नेह जाहीर आभार 🙏🏻🙏🏻*

*आपला*
*संभाजी क्रीडा मंडळ*
*कांदिवली पूर्व*

Photos from संभाजी क्रीडा मंडळ -"रजि"'s post 19/02/2025

संभाजी क्रीडा मंडळाच्या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत संपूर्ण भारतासह अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्ताने मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आपल्या कांदिवली विभागात प्रथमताच मॅटवरील भव्य कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेकरिता शिवसेना सचिव, संपर्क नेते, मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सिद्धेश भाई रामदास भाई कदम यांनी कांदिवली पूर्व विभागातील युवा व होतकरू कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अंदाजे 1 लाख रुपये किमतीचे सुमारे 300 कबड्डी मॅट संभाजी क्रीडा मंडळ पुरस्कृत केले त्याबद्दल शिवसेना सचिव संपर्क नेते मुंबई शहर माननीय श्री सिद्धेश भाई रामदास भाई कदम यांचे संभाजी क्रीडा मंडळाच्या वतीने मनःपूर्वक जाहीर आभार व त्यांना भविष्यातील राजकीय क्षेत्रातील उज्वल व यशस्वी वाटचालीकरिता मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Mumbai
400101