28/02/2026
आपल्या वार्षिक होळी महोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवी (५० व्या) वर्षाच्या तयारीला सुरुवात झाली आहे! या वर्षीचा उत्सव अधिक भव्य, रंगतदार आणि अविस्मरणीय करण्यासाठी आमची टीम जोमाने कामाला लागली आहे.
🙏 आम्ही कार्यसम्राट अमेय घोले यांचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी मैदान स्वच्छ करण्यासाठी मिनी JCB उपलब्ध करून दिली.
ते नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहतात आणि प्रत्येक वेळी साथ देतात.
आपल्या या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद! 🌸
28/02/2026
🌸🔥 ५०वा होळी महोत्सव – सुवर्णमहोत्सवी वर्ष 🔥🌸
आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आपल्या ५०व्या होळी महोत्सवा निमित्ताने
मुंबई महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
त्यांची उपस्थिती मिळाली तर हा सोहळा अधिकच गौरवशाली ठरेल.
विशेष म्हणजे, कार्यसम्राट, सरचिटणीस - युवा सेना श्री. अमेय घोले यांची उपस्थिती निश्चितच आहे. त्यांचा सक्रिय सहभाग हा नेहमीच प्रेरणादायी असतो.
तसेच कै. रामदास स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने हा सुवर्णमहोत्सव अविस्मरणीय ठरणार आहे.
28/02/2026
🌸🔥 होळी महोत्सव – सुवर्णमहोत्सवी वर्ष 🔥🌸
प्रिय मित्रांनो,
गेल्या ५० वर्षांपासून रंग, आनंद आणि एकतेचा उत्सव साजरा करताना आम्हाला अपार आनंद मिळाला आहे.
यंदा आमचा ५०वा होळी महोत्सव अधिक भव्य आणि संस्मरणीय होणार आहे.
📅 दिनांक: २ मार्च २०२६
⏰ वेळ: सायं ४
📍 स्थळ: कै. रामदास स्पो. क्लब पटांगण, वडाळा (प) ३१.
आपल्या उपस्थितीने हा सुवर्णमहोत्सव अधिक रंगतदार होईल.
चला, रंगांच्या उत्सवात पुन्हा एकदा एकत्र येऊया… 🌈💐
17/03/2024
नमस्कार मंडळी,
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि. २४ मार्च रोजी आपला होळी उत्सव मोठ्या उत्साहात करण्याचे योजिले आहे. होळीच्या पुर्वतयारीची सुरुवात काल दिनांक १६ मार्च पासून सुरू झाली असून आपला सहभाग अपेक्षित आहे.
सभासदांनी आपली वर्गणी लवकरात लवकर मंडळात जमा करावी जेणेकरून नियोजित केलेल्या कार्याची अंमलबजावणी सुरू करता येऊ शकेल. तसेच ज्यांना रोख / वस्तुरुपी देणगी द्यायची इच्छा असेल त्यांनी मंडळाशी संपर्क साधावा.
धन्यवाद !
कै रामदास स्पोर्ट्स क्लब,
वडाळा (प), मुंबई
06/03/2023
Year 2023!
Rangoli preparation started.
06/03/2023
Happy Holi !
Raangoli preparation started.
10/03/2020
Few moments while preparing Rangoli this year...