स्वामी समर्थ क्रीडा मंडळ, प्रभादेवी आयोजित निमंत्रित जिल्हा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आज उपउपांत्य फेरीचे सामने पार पडले.
पहिल्या सामन्यात अजिंक्य चाचणी विजेता रत्नागिरी संघाने सांगली संघाचा ३९ वि. २६ असा १३ गुणांनी पराभव केला. रत्नागिरी संघातून रोहित गमरेने चढाईत तर शुभम शिंदेने पकडीत उत्तम कामगिरी करत संघाला विजयश्री मिळवून दिली, पराभूत संघाच्या सोहम मुंगलची लढत अपयशी ठरली. सामन्यातील सामनावीर आदित्य शिंदे ठरला.
दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना रायगड वि. कोल्हापूर या दोन संघात झाला या सामन्यात रायगड संघाने ४१-१२ असा २९ गुणांनी विजय मिळवला. रायगड संघाच्या राहुल सिंगला रोखणे कोल्हापूरच्या क्षेत्ररक्षकांना अवघड झाल्याने कोल्हापूरची सामन्यांवरील पकड सुरुवातीपासून सैल झाली, सामना एकतर्फी झाला. कोल्हापूर संघ तर्फे ऋषिकेश गावडेने चढाई आपली छाप पाडत ८ गुण मिळवत प्रतिकार केला पण त्याला यश नाही आले. या सामन्यात रायगडचा मिथिल पाटील याची सामनावीर म्हणून निवड झाली.
तिसरा सामना यजमान मुंबई शहर वि. पालघर असा संपन्न झाला, या सामन्यात यजमान मुंबई शहरने ४५-२९ असा १६ गुणांनी विजय मिळवत उपांत्य फेरी प्रवेश केला. मुंबई शहरच्या अजिंक्य कापरे, सुशांत साईल, ओंकार जाधव चढाई त्रिकुटाने आपली कामगिरी चोक पार पाडली त्यांना संतोष वारकरीची पकडीची साथ मिळाल्याने मुंबई शहरने सामना एकतर्फी केला. पालघर तर्फे राहुल तवर व गौरव मर्देने संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. या सामन्यातील सामनावीर म्हणून मुंबई शहरच्या ओमकार जाधवची निवड करण्यात आली.
दिवसाचा अंतिम सामना मुंबई उपनगर वि. ठाणे असा झाला अपेक्षे प्रमाणे सामना रंगतदार झाला, ठाणे संघाने सामन्यावर सुरुवाती पासून आपली पकड कायम राखत सामना ४२-३२ असा १० गुणांनी जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ठाणे संघातर्फे कर्णधार उमेश म्हात्रेला चढाईत सुरज दुंदलेची साथ मिळाली तर पकडीमध्ये अभिजित भोईरने उत्तम कामगिरी करत तब्बल ९ गुण मिळवत विजयात हातभार लावला. मुंबई उपनगर तर्फे आकाश कदमची लढत एकाकी पडली. आकाश कदमला सामनावीर म्हणून पारितोषिक देण्यात आले.
उद्या स्पर्ध्येच्या अंतिम दिवशी दोन उपांत्य फेरीचे सामने त्या नंतर अंतिम विजयी राजाभाऊ देसाई स्मृती चषका करीता लढत होईल.
उपांत्य फेरीचा पहिला सामना रत्नागिरी वि. रायगड तर दुसरा सामना यजमान मुंबई शहर वि. ठाणे असा कै. जनार्दन राणे क्रीडा नगरी, प्रभादेवी येथे पार पडेल.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन
official page of Maharashtra State Kabaddi Association
24/12/2019
६७ व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात यजमान रत्नागिरी संघाने पटकावले विजेतेपद, तर मुंबई शहर संघाला उपविजेतेपद
24/12/2019
६७ व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महिला विभागात पुणे संघाने पटकावले विजेतेपद, तर मुंबई शहर संघाला उपविजेतेपद
02/12/2019
दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय पुरुष व महिला कबड्डी संघ. 🇮🇳😍
Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Shivaji Park, Dadar West
Mumbai