शिवराजे मित्र मंडळ गोविंदा पथक संतोष नगर , गोरेगाव
आला रे आला संतोष नगरचा राजा आला - एकच आव
23/08/2016
Shivaraje Mitr Mandal - Welcomes you all
27/10/2015
शिवराजे मित्र मंडळाचे सल्लागार श्री. कल्पेश शिर्के यांची युवासेना दिंडोशी विधानसभा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल मंडळा तर्फे हार्दिक अभिनंदन
अध्यक्ष - सतीश तलगे
07/09/2015
07/09/2015
Photos With Adhyaksha - Talge
07/09/2015
3 idiots
07/09/2015
Brothers
महाराष्ट्र राज्याचं क्रीडा धोरण 2012 अंतर्गत गोविंदाला सहासी खळाचा दर्जा देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं या संदर्भात निर्णय घेतल्याची माहिती युवक आणि क्रीडा मंत्री विनोद तावडेंनी जाहीर केलं आहे.
गोविंदांच्या पालकांचं हमीपत्र अनिवार्य
गोविंदाच्या मुद्द्यावरुन सरकार आयोजकांसमोर झुकल्याचं दिसतं आहे. कारण 15 वर्षांरखालील मुलांना गोविंदा पथकात सहभागी करु नये, अशी मागणी होती. मात्र, सरकारनं 12 ते 15 वर्षे वयाच्या मुलांना गोविंदा पथकात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी पालकांचं हमीपत्र द्यावं लागणार आहे.
लहान गोविंदाच्या सहभागावरुन हायकोर्टानं सरकारला नियमावली बनवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्यानंतर आता दहीहंडीला सहासी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे.
14/08/2014
कोणत्याही थराला जाऊन हंडीतील लोणी लुटणाऱ्या तमाम गोविंदा मंडळांसाठी खूषखबर आहे. हंडीची उंची आणि बालगोविंदांच्या सहभागावर बंधने घालण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षासाठी स्थगीती दिली आहे. त्यामुळे गोविंदा पुन्हा एकदा मुक्त झाला आहे.
दहीहंडीच्या उत्सवाला आलेले बाजारू स्वरूप आणि त्यामुळे गोविंदांच्या जिवाला होणारा धोका लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीतील स्पर्धेवर निर्बंध घातले होते. दहीहंडी २० फुटांपेक्षा उंच नसावी व थरांच्या खेळात १८ वर्षांखालील गोविंदांना सहभागी करून घेऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशाला गोविंदा मंडळांनी तीव्र विरोध केला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 'दहीहंडी'फेम नेते जितेंद्र आव्हाड यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आव्हाड यांच्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने दहीहंडीवरील निर्बंधांना स्थगीती दिली. त्यामुळे हा उत्सव पूर्वीप्रमाणेच साजरा करता येणार आहे.
१२ वर्षांखालील गोविंदांवर मात्र बंदी
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगीती देतानाच सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टींबाबत दहीहंडी आयोजकांनाही बजावले आहे. १२ वर्षांखालील गोविंदांना थरांमध्ये सहभागी करून घेऊ नये, असे न्यायालयाने निक्षून सांगतिले आहे. तसेच, 'उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषणाची ६५ डेसिबल आवाजाची मर्यादा पाळावी व बालहक्क आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असेही स्पष्ट केले आहे.
12/08/2014
शिवराजे मित्र मंडळ - गोविंदा पथक - अनुभव
४ वर्षापूर्वी जेव्हा आमच पहिल गोविंदा पथक (श्री समर्थ व्यायाम शाळा ) काही कारणास्तव बंद करण्यात आलं. तेव्हा विचार हि नव्हता केला कि आम्ही जे कुठे शिडीत आणि थरात प्रशिक्षकाने दिलेल्या सूचनेनुसार उभे राहायचो ते स्वताच एक गोविंदा पथक उभा करू शकतो. पण जिद्दीने आणि उत्साहाने काही जुने तर काही नवे मित्र मिळून सुरवात केली ते शिवराजे मित्र मंडळ आणि गोविंदा पथकाची. हाताशी कसलाच अनुभव नव्हता पैसा कसा उभा करायचा, प्रशिक्षण आणि मुल कशी जमा करायची सगळ काही नवीन होत.
पण विभागातील काही बड्या लोकांनी आमच्या जिद्दीला आणि उत्साहाला पाहून आम्हाला मदत करायची ठरवली . पैशाचा प्रश्न मिटला होता सोबत प्रशिक्षणाला विकास मांडवकर सर आणि विनोद आराख सर याचं उत्तम कोचिंग होत आणि त्याच जोरावर पहिल्याच वर्षी ७ थर रचले. आणि तोः आनंद शब्दात सांगण्यासारखा नव्हता. दुसर्या वर्षी हि सगळ चांगल चालल होत पण काही वयक्तिक करणा मुळे विकास सर शिवराजे मित्र मंडळ सोडून गेले. त्यानंतर सगळी जबाबदारी विनोद आराख सरांनी चोख पणे पार पाडली जी आज पर्यंत चालू आहे.
शिवराजे मित्र मंडळ गोविंदा पथकाकडून विनोद आराख सरांना धन्यवाद
कल्पेश शिर्के
(सल्लागार - शिवराजे मित्र मंडळ )
दहीहंडी उत्सव २०१४
शिवराजे मित्र मंडळ गोविंदा पथक आमच हे तिसर वर्ष . गोरेगावच्या संतोष नगर विभागातील एक नावजलेल गोविंदा पथक. पहिल्याच वर्षी ७ थराचा मानवी मनोरा रचून सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. सलग २ वर्ष आम्ही ७ थरांचा मानवी मनोरा रचण्यात यशस्वी होतो . यावर्षी सुधा मोठ्या उत्साहाने आम्ही सगळे एकत्र आलो पण यावर्षी मुलांची गर्दी फार कमी होती, कारण होत गेल्यावर्षी आमच्याच विभागातील दुसर्या गोविंदा पथकातील मुलांचा अपघात झाला आणि ३ मुलांना आपले पाय गमवावे लागले.
त्यामुळे मुलांच्या पालकांनी गोविंदास जाण्यास बंदी केली आहे . तरी उत्साहाने येणारी मुल ती आलीच चांगल्या प्रकरे सराव चालू होता कि अचानक आलेले हायकोर्टाचे आदेश १२ वर्षाखालील मुलांना बंदी आणि नंतर कालच आलेला आदेश १८ वर्षाखालील मुलांना बंदी यामुळे पुन्हा एकदा धक्का बसला. एक प्रकारे आलेल्या चांगल्या निर्णयाचे स्वागत करायचे होते पण आता पुन्हा नव्या पद्धतीने मुलांची आणि थरांची रचना करायची आहे. आपली संस्कृती आम्हाला जपायची आहेच परंतु कोणाच्या जीवावर बेतेल अस काही आम्ही करणार नाही आहोत.
मग ७ थरांचे आम्ही ५ किवा ६ थरावर आलो तरी चालेल. आम्हाला अभिमान असेल कि भले एक थर कमी लावला पण जर त्याने कोणाचा जीवाचा धोका टळत असेल तर आम्हाला त्यापेक्षा जास्त आनंद कुठलाच नसेल. बस आम्हाला आमची संस्कृती जपायची आहे आणि एकोपा कायम ठेवायचा आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू
धन्यवाद
कल्पेश शिर्के - शिवराजे मित्र मंडळ
( सल्लागार )
शिवराजे मित्रमंडळ कडक ७ थर - २०१३
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Mumbai