27/08/2020
संघर्ष मित्र मंडळ
सार्वजनिक गणेशोत्सव
पुठ्या पासून बनवलेले पर्यावरण पुरक सजावट
Sangharsh mitra mandal
27/08/2020
संघर्ष मित्र मंडळ
सार्वजनिक गणेशोत्सव
पुठ्या पासून बनवलेले पर्यावरण पुरक सजावट
14/08/2020
आतुरता आगमनाची २०२०
12/08/2020
*हा सण असा ही साजरा करावा लागला....*
दरवर्षी ज्या सणाची आम्ही अतुरतेने वाट पाहत असतो. एक-दीड महीना सराव करुन याच दिवशी थर रचायचो...मनात एक आनंद, उत्साह आणि जोश असायचा .... पण या वर्षी आमच्या आनंदावर विर्जन आले. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे उत्सव रद्द झाला असला तरी आम्ही हा दहीकाला हा सण आरोग्य शिबीर ठेवून साजरा केला.. सर्व देवतांनकडे एकच प्रार्थना लवकर हे कोरोनाच संकट दुर कर आणि येणारे सर्व सण आनंदाने व उत्साहने साजरे होउदे.
होय महाराजा........
आपले नम्र
*संघर्ष गोविंदा पथक*
अॅन्टाॅपहिल , मुंबई - ३७
05/07/2020
ह्या कोरोना महामारीमुळे या वर्षी दहीहंडी रद्द झाली असली तरी आम्ही आज गुरुपौर्णिमेनिमित्त सरावाचा जागेवाल्याला नारळ देऊन परंपरा कायम ठेवली..
पुढल्या वर्षी तोच जोश आणि तोच उत्साह घेऊन गोपाळकाला साजरा करू...
बोल बजरंग बळी की जय...
गणपती बाप्पा मोरया...
जागेवाले की जय...
05/07/2020
अख्या मुंबई सह उपनगरात आज गुरुपौर्णिमा साजरी केली जाते पण ह्याच दिवशी दहीहंडी चा सरावाचा नारळ फोडला जातो पण यंदा दहीहंडी रद्द झाली असली तरी आपण आपली परंपरा कायम ठेऊन आज सर्व बाळ गोपाळांनी आपल्या सरावाच्या ठिकाणी ठीक रात्री ०८:०० वा. उपस्थित राहून जागेवाल्याला नारळ देऊन आपली परंपरा कायम ठेऊया...
आपला
#संघर्ष_गोविंदा_पथक
25/06/2020
समन्वय समितीच्या पदाधिका-यांच्या बैठकीत दहिहंडी उत्सव २०२० संदर्भात केलेले ठराव पुढीलप्रमाणे :
१) २०२० हे वर्ष वैश्विक अर्थारोग्य, मानसिकारोग्य आणि शारीरीकारोग्य यादृष्टीने जरा अवघडच जात आहे.
२) गेल्या दहा वर्षाचा इतिहास पाहिला तर दहिहंडी ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतेच मग ते संकट निसर्गनिर्मित असो की मानवनिर्मित, सामाजिक असो की राजकीय ते या सणाच्या पाचवीला पुजलेले अाहेच असे आढळून येईल. परंतु महाराष्ट्राच्या तरुणाईचा आणि आबालवृध्दांचा, मुली-महिलांचा आवडता, रांगडा सण नेहमीच त्या अडचणींवर मात करुन बाहेर पडलेला आहे. आपण सगळ्यांनी मिळून तो बाहेर काढलेला आहे हे ही तितकेच सर्वश्रुत सत्य आहे.
३) २०२० च्या या कोरोना संकटाने, या महामारीनेमात्र दहिहंडीला सामाजिक बांधिलकीच्या, वैयक्तिक स्वास्थाच्या, आर्थिक बाबींच्या यक्ष प्रश्नाच्या तोंडी दिले आहे. यावर्षीचा प्रत्येक सण तसा रद्दच झालेला आहे.
कोरोनामुळे प्रत्येकाची वैयक्तिक, राज्याची, पर्यायाने देशाची स्वास्थ्यसुरक्षा ही टांगणीला लागलेली आहे. मृत्यु आणि जगणं यामधली रेष फारच पुसट झाली आहे. सामाजिक अंतर (Social Distancing ) हा एकमेव पर्याय आपणापुढे असताना दहिहंडी खेळ आपण खेळणार तरी कसे ? सरकारने तर तसा आदेशच दिलेला आहे जो प्रत्येकाच्या भल्याचाच आहे. कोणतीही लस आणि ठोस औषध उपाय नसताना आपण एकत्र येण्याची जबाबदारी घेणार तरी कसे.?
४) या अशा एक ना अनेक प्रश्नांचा सारासार विचार करुन समितीने असा निर्णय घेतला आहे की यावर्षी "श्रीकृष्णजन्म" (अष्टमी) हा अत्यंत साध्या पध्दतीने ( अर्थातच , सामाजिक अंतराचे भान ठेऊनच ) साजरा करायचा. विभागीय पोलीस अधिकारी त्याबद्दल सूचना करतीलच परंतु आपणच आपल्यावर ते बंधन घालून घेऊ जेणेकरुन पोलीस बांधवांवरचा त्याविषयीचा ताण थोडा कमी होईल.
मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता दुस-यादिवशीचा गोपाळकाला हा उत्सव अर्थातच होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये असे समितीचे प्रामाणिक मत तर आहेच पण महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहिहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे.
वरील निर्णय हा यावर्षीसाठी ठाम आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
"सर सलामत तो पगडी पचास" किंवा बचेंगे तो औरभी लडेंगे /खेलेंगे या म्हणींचा आधार घेत हा सण/उत्सव पुढीलवर्षी जोमाने आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी सकलांना निरोगी आयुष्य लाभो ही महामारी लवकरात लवकर दूर होवो हि समितीच्या वतीने श्रीकृष्ण परमात्म्याचरणी मनापासून प्रार्थना.
बोल बजरंग बली की जय !
आपली कृपाभिलाषी,
दहिहंडी समन्वय समिती - महाराष्ट्र
28/07/2019
31/07/2018
आतुरता आगमनाची...२०१८
01/09/2017
मा.आमदार श्री कालिदास कोलंबकर साहेब यांनी आज संघर्ष मित्र मंडळास भेट दिली व लाडक्या बाप्पाचे आशिर्वाद घेतले🙏🏻
27/08/2017
संघर्ष मित्र मंडळ
#संघर्षचा_राजा...२०१७
02/08/2017
आतुरता तुझे नवीन रूप पाहण्याचे....
29/10/2016