04/05/2026
नागपूरात शिवशक्ती गुरुकुलम् चा गौरव : वस्ताद हितेश वसंतराव डफ यांना “Unsung Everyday Heroes” अंतर्गत Youth Leadership Award प्रदान
भारतीय संस्कृती, गुरुकुल शिक्षणपद्धती, युद्धकला प्रशिक्षण आणि युवा नेतृत्व घडविण्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिवशक्ती गुरुकुलम् चे संस्थापक वस्ताद हितेश वसंतराव डफ यांना प्रतिष्ठेचा “Unsung Everyday Heroes” अंतर्गत Youth Leadership Award प्रदान करण्यात आला.
हा भव्य सन्मान सोहळा नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल हॉल, सिव्हिल लाईन्स येथे The Art of Living संस्थेच्या वतीने, Sri Sri Ravishankar Vidya Mandir Trust यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. गुरुदेव श्री श्री रविशंकर महाराज यांच्या 70 व्या जयंतीनिमित्त तसेच The Art of Living संस्थेच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त हा विशेष पुरस्कार समारंभ पार पडला.
समाजात निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना व्यापार व परोपकार, खेळ आणि युवा नेतृत्व अशा तीन गटांतून गौरविण्यात आले. त्यामध्ये भारतीय युद्धकला शिक्षणपद्धती, संस्कारक्षम युवा घडविणे, शिस्त, सेवा आणि राष्ट्रनिष्ठा जोपासणे या कार्यासाठी युवा नेतृत्व गटातून वस्ताद हितेश वसंतराव डफ यांची निवड करण्यात आली.
या पुरस्कारासाठी नागपूर शहरासह विविध भागांतून अनेक व्यक्ती व संस्थांनी नोंदणी केली होती.
त्यामधून निवडक व्यक्तींना हा मानाचा सन्मान देण्यात आला.
या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून श्री राहुल पांडे (राज्य मुख्य माहिती आयुक्त, नागपूर), डॉ. वेदप्रकाश मिश्रा (मुख्य सल्लागार तथा प्र-कुलपती, DMIHER अभिमत विद्यापीठ) तसेच श्रीमती शिवानी दानी (स्थायी समिती अध्यक्षा, नागपूर महानगरपालिका) उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी संकेत वरले आणि चेतना सहारे हे शिवशक्ती आखाड्याचे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. सोबतच संपूर्ण शिवशक्ती गुरुकुलमच्या टीमचे सुद्धा खूप खूप आभार त्यांच्या शिवाय हा अवॉर्ड अशक्य असता असं वाचतात श्री हितेश वसंतराव डफ यांनी सांगितला.
तसेच नामांकनासाठी नाव सुचविण्यासाठी हितेश्री लाकूडकर ताई आणि अनिता ताई यांनी अथक प्रयत्न केले.
शिवशक्ती गुरुकुलम् मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय परंपरेतील दंड-बैठक, मर्दानी खेळ, लाठी-काठी, तलवारबाजी, स्वसंरक्षण, संस्कारवर्ग आणि युवा घडविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. त्यामुळे हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून भारतीय गुरुकुल शिक्षणपद्धतीचा, भारतीय ऋषी परंपरेचा आणि संस्कारमय राष्ट्रनिर्मितीचा गौरव असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
“सेवा, साधना आणि संस्कार यांचा संगम म्हणजेच वस्ताद हितेश वसंतराव डफ यांच्या नेतृत्वाखालील शिवशक्ती गुरुकुलम् ची खरी ओळख आहे,”
15/12/2025
🔱 गोंदिया | अभिमानाचा क्षण 🔱
काल गोंदिया येथे
श्री टी. राजा सिंह जी यांच्या शुभहस्ते
मारुति व्यायाम मंडल – शिवशक्ती आखाडा
यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित जनसमुदायाला
🔸 शारीरिक सक्षमता
🔸 आत्मसंरक्षण व शस्त्र प्रशिक्षण
🔸 धर्म, राष्ट्र आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सज्ज राहण्याचे
ओजस्वी आवाहन करण्यात आले.
हा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी असून
युवा शक्तीला संघटित करून
सशक्त, सक्षम आणि स्वाभिमानी समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
🚩 जय श्री राम 🚩
🔥 हर हर महादेव 🔥
🚩
25/09/2025
✨🚩 नारी शक्ती – स्वसंरक्षण शस्त्र प्रशिक्षण शिबिर 🚩✨
🙏 हनुमान सेवा सांस्कृतिक मंडळ, उज्वलनगर नागपूर
🙏 चरैवेति फाउंडेशन
🙏 शिवशक्ती आखाडा
यांच्या सौजन्याने आयोजित
🔥 “नारी शक्ती शिबिराचा पहिला दिवस उत्साहात संपन्न! १०० पेक्षा अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग!” 🔥
📅 दिनांक : 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2025
⏰ वेळ : सायंकाळी 5 ते 6:30 वा.
📍 स्थळ : उज्वलनगर हनुमान मंदिर पटांगण
🌸 स्त्रीशक्ती जागृत करण्यासाठी स्वसंरक्षण व शस्त्र प्रशिक्षण ही काळाची गरज आहे! 🌸
📖 श्लोक :
"या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥"
🚩 चला, एकत्र येऊया, स्वतःला सक्षम बनवूया!
19/05/2025
श्री हनुमान मंदिर सेवा समिति मारुति व्यायाम मंडल #शिवशक्ति आखाड़ा गोंदिया द्वारा आयोजित 9 वे भारतीय प्राचीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर गोंदिया
Rohit Shribhatre
Shivshakti Indian Martial Arts Academy -शिवशक्ती आखाडा
21/12/2024
पैलवानांना राज्यस्तरीय स्पर्धेला जिल्हाबंदी असंविधानाक आणि व्यवहारात न बसणारी
आजच राज्य कुस्तीगीर संघाने एक लेख जारी केला ज्यामध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला त्यांनी स्वतः बनवलेला नियम ज्यात मल्लाना जिल्हाबंदी का केली यावर विस्तृत विवरण दिले आहे.त्याबद्धल मला विचार विशद करणे योग्य वाटले.
कुस्ती हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि प्रतिष्ठित खेळ आहे, ज्याची परंपरा आणि वारसा दीर्घकाळापासून चालत आलेली आहे. मात्र, अलीकडेच राज्य कुस्तीगीर संघटनेने लागू केलेल्या 'जिल्हा बंदी' निर्णयामुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. या निर्णयानुसार, प्रत्येक खेळाडूने आपल्या मूळ जिल्ह्यातूनच स्पर्धेत भाग घ्यावा, इतर जिल्ह्यांतून खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. हा निर्णय अनेक दृष्टिकोनातून अन्यायकारक आणि कायद्याच्या दृष्टीने अयोग्य ठरतो.
१. व्यक्तिस्वातंत्र्य आणि संविधानिक अधिकारांचे उल्लंघन
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९(१)(डी) नुसार, प्रत्येक नागरिकाला भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचा आणि राहण्याचा अधिकार आहे. तसेच, अनुच्छेद १९(१)(जी) नुसार, कोणतीही व्यवसाय, व्यापार किंवा उपजीविका करण्याचा अधिकार दिला आहे. जिल्हा बंदीचा निर्णय या अधिकारांचे उल्लंघन करतो, कारण तो खेळाडूंच्या मुक्त हालचालीवर आणि त्यांच्या व्यावसायिक संधींवर मर्यादा घालतो. सर्वोच्च न्यायालयानेही अशा प्रकरणांत व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.मागील लेखातच कुस्ती हा मल्लांचा "व्यवसाय" आहे असे कायद्याने स्पष्ट होते व व्यवसायात आपली प्रगती करण्यासाठी भौगोलिक स्थानानुसार प्रतिबंध करणे कायद्यात न बसणारे आहे.
२. भ्रष्टाचार आणि अपारदर्शक प्रक्रियांना प्रोत्साहन
काही जिल्हा कुस्ती संघटनांमध्ये भ्रष्टाचार आणि अपारदर्शकता आढळून येते असे लेखात नमूद केले आहे, जिथे पदाधिकारी पैसे घेऊन खेळाडूंना जिल्ह्याच्या वतीने पाठवतात. या समस्येचे निराकरण करण्याऐवजी, जिल्हा बंदी लागू करणे हे खेळाडूंना शिक्षा करण्यासारखे आहे. याऐवजी, निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी लाइव्ह स्ट्रीमिंग, अनिवार्य छायाचित्रण आणि विभागप्रमुखांची नेमणूक यांसारख्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि पात्र खेळाडूंना संधी मिळेल.कोणताही जिल्हा कुस्तीगीर संघ हा आपल्याच राज्य पदाधिकारी मंडळाचा घटक आहे,मग तो पैसे घेऊन खेळाडूंना आपल्या जिल्ह्याकडून खेळवत असेल तर आपण त्यांच्याविरुद्ध कारवाईचा बगडा उचलणार का ? का केवळ पैलवान काही बोलत नाहीत म्हणून सगळे नियम त्यांनाच लावणार आहात?
३. जिल्ह्यांमधील असमानता आणि खेळाडूंच्या संधींवर परिणाम
कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये कुस्तीची परंपरा अधिक मजबूत आहे, ज्यामुळे तिथे अधिक खेळाडू आहेत असे आपण नमूद केले.तसेच या जिल्ह्यांना दोन संघ देण्याचा निर्णय घेतला जातो, परंतु इतर 33 जिल्ह्यांचे काय? जिल्हा बंदीमुळे इतर जिल्ह्यांतील खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता कमी होते, ज्यामुळे त्या भागांमध्ये कुस्तीचा विकास खुंटू शकतो. एखादा कुस्तीगीर इतर जिल्ह्यातून खेळून जिंकला, तर त्या जिल्ह्यातील कुस्तीला प्रोत्साहन मिळेल आणि खेळाचा प्रसार होईल.कुस्तीगीर संघ राज्याच्या कुस्तीच्या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने बनवला आहे का फक्त ठराविक जिल्ह्यांच्या ? आपला दृष्टिकोन राज्यव्यापी असणे आवश्यक आहे.
उदा.एकेकाळी महाराष्ट्र केसरी निवड चाचणी 8 दिवस चालत असे इतके पैलवान त्या जिल्ह्यातून खेळायचे.कोल्हापूर कडून अनेक सोलापूर, सांगलीकर मल्ल सुद्धा लढायचे.थोडक्यात काय तर कोणत्याही जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणे हा त्या मल्लाच्या परिपूर्णतेची व्याख्या ठरवू शकत नव्हता,तर तो खेळणे हे महत्वाचे होते.जर संधीच नसेल तर मेहनत करणे व्यर्थ नाही का ? आज बोटावर मोजण्या इतके पैलवान आपल्याकडे आहेत,तरीही जिल्हा बंदी सारखे बालिश विचार मांडणे चुकीचे आहे.ज्याला ज्या जिल्ह्याकडून खेळायचे त्याला खेळू दिले तर त्याची लढाऊ वृत्ती अजून वाढेल.जास्त मल्लांच्या जिल्ह्यावर येणारा ताण कमी होईल.वादविवाद टळतील.
उदाहरण म्हणून द्यायचे झाले तर आपण चांगले जाणता की पुणे शहर कडून पै.अभिजित कटके व पै.महेश मोहोळ यांच्या एकत्रित सहभागाने काही काळ तणावाची स्थिती झाली.दोन्ही मल्ल तुल्यबळ व दोघेही जेते पदाचे हक्कदार असल्याचे बोलले जात होते,त्यावेळी प्रस्थापित पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी नियम बनवला की यजमान शहराला दोन संघ खेळवायचा हक्क दिला जाईल.त्या नियमानुसार दोन्ही मल्ल आपल्या शहराचे प्रतिनिधित्व करू शकले होते.हा निर्णय पटला कारण दोन्ही मल्लाना कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली,वाद टळला आणि स्पर्धा व्यवस्थित झाली.पण ऐनवेळी बवनला गेला हे विसरुन चालणार नाही.आपला नियम जर असाच राहिला तर येणाऱ्या काळात आपणास ऐनवेळी असे नियम बनवावे लागतील जे व्यावहारिक असणार नाही.
४. राजकीय उदाहरणे आणि व्यक्तिस्वातंत्र्य
राजकारणात अनेक नेते आपल्या मूळ मतदारसंघाबाहेरून निवडणुका लढवतात आणि जिंकतात. जर अशा प्रकरणांवर न्यायालयीन निर्णय आले असतील, ज्यात नेत्यांना इतरत्र उभे राहण्यास मनाई केली गेली असेल, तर ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात ठरेल. भौगोलिक स्थितीच्या आधारावर व्यक्तिस्वातंत्र्य दडपणे हे संविधानाच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात आहे. उदाहरणार्थ,आदरणीय इंदिरा गांधी यांनी 1980 साली मेडक (तेलंगणा) आणि रायबरेली (उत्तर प्रदेश) या दोन वेगवेगळ्या राज्यांतील मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. न्यायालयांनी अशा प्रकरणांत नेत्यांच्या भौगोलिक मर्यादांवर बंधने घालण्यास नकार दिला आहे, कारण ते व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे.
५. कायदेशीर दृष्टिकोन आणि न्यायालयीन निर्णय
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९(१)(डी) आणि अनुच्छेद २१ नुसार, प्रत्येक नागरिकाला मुक्तपणे फिरण्याचा आणि राहण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या अधिकारांचे संरक्षण केले आहे. उदाहरणार्थ, न्यायमूर्ती के. एस. पुत्तस्वामी (निवृत्त) विरुद्ध भारत संघ या प्रकरणात, न्यायालयाने अनुच्छेद १९(१)(डी) अंतर्गत नागरिकांच्या अधिकारांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
जिल्हा बंदीचा निर्णय हा खेळाडूंच्या व्यक्तिस्वातंत्र्याचे उल्लंघन करणारा, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा आणि कुस्तीच्या विकासाला अडथळा निर्माण करणारा आहे. या निर्णयाऐवजी, पारदर्शक आणि न्याय्य निवड प्रक्रियांवर भर देणे आवश्यक आहे, ज्यामुळे सर्व जिल्ह्यांतील खेळाडूंना समान संधी मिळतील आणि महाराष्ट्रातील कुस्तीचा विकास होईल.
इराण देशात 3 दशलक्ष पैलवान आहेत.जे आपल्या पारंपरिक कुस्तीत दिग्गज असून आंतरराष्ट्रीय फ्रीस्टाईल ग्रीकोरोमन कुस्तीतही बलाढ्य आहेत.31 प्रांतात विभागलेला हा देश आपल्या खेळाडूंना कोणत्याही विभागातून निवड चाचणीसाठी सामोरे जाण्याची मुभा देतो.हसन याझदानी सारखा ऑलिम्पियन मल्ल जुयबार ,मजंदरन चा रहिवासी असून दक्षिण खोरसन प्रांतातून लढतो.आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीच्या वैभवसाठी अनेक नियम बनवले जातात,पण इथे फक्त मल्लांच्यावर मर्यादा व नियम घालण्यात येतात हे अतिशय चूक वाटते.
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
21/09/2024
#कार्याची_पावती
मा. हितेश वसंतराव डफ यांना
#युवा_कलारत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला.
माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशन मलकापूर जि. बुलडाणा
साथ माणुसकीची आयोजीत
राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार 2024
सम्मान कर्तुत्वाचा.... सामाजिक जानिवेचा....
#सत्कारमूर्ती
मा. हितेश वसंतराव डफ नागपुर
शिवशक्ती आखाडा - शिवशक्ती ढोल ताशा व ध्वज पथक नागपूर
हिंदवी परिवार - स्पार्क फाउंडेशन अमळनेर
#युवा_कलारत्न सत्कार म्हणून गौरविण्यात आला.
आयुष्यात जगतांना जगाला हेवा वाटावा, असं काहीतरी करून दाखवावं आणि आयुष्य फुलवून टाकाव या विचाराने प्रेरित होऊन आपण आपल्या क्षेत्रात नाविन्याचा ठसा उमटवावा.
#छत्रपती शिवाजी महाराज यांच्या #महाराष्ट्रामध्ये भारतीय युद्ध कलेचा वारसा जपून नवीन पिढीला #चारित्र्यसंपन्न करण्याचा आपल संकल्प कौतुकास्पद आहे. महिनाभर परीक्षणानंतर पंचांनी निर्णय दिला.
समाजाच्या #उन्नतीसाठी आपल्या हातुन अविरतपणे असे समाजकार्य होत राहो, आपलं कार्य, आपलं नेतृत्व, फुलवत असतं अर्थातच आपले नेतृत्व समाजास #नवसंजीवनी देणारं आहे.
निस्वार्थी भावनेने आजपर्यंत आपण आपल्या क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेऊन माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशन आपणास मान्यवरांच्या हस्ते समारंभपुर्वक गौरव करून #राष्ट्रभक्ती_सेवा_गौरव_पुरस्कार_2024
या #राज्यस्तरीय पुरस्काराणे आपणास सन्मानित करित आहोत. आपले निस्वार्थ सेवा कार्य जनसामान्यांना दिपस्तंभासारखे ठरावे हिच सदिच्छा..... आपल्या कार्याला, कर्तुत्वाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा....
विवेक सुभाष राजापुरे
संस्थापक अध्यक्ष :
माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशन, मलकापूर जि. बुलडाणा
दिनांक : 21 सप्टेंबर 2024
स्थळ : मलकापूर
#सामाजिक #जाणीव
26/07/2024
#गुरूपौर्णिमा_उत्सव_2024
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• #गुरूपौर्णिमा* प्रत्येक शिष्याचा गुरूंच्या प्रति
#कृतज्ञता* व्यक्त करण्याचा महत्वाचा दिवस.
आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या #श्री हितेश वसंतराव डफ गुरुजी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवशक्ती परिवारातील विद्यार्थी एकत्र जमले...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कृतज्ञना व्यक्त करण्याचा दिवस #गुरुपौर्णिमा
#गुरुपौर्णिमेचा - आपल्या गुरुंप्रती प्रती कृतज्ञना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच 'गुरुपौर्णिमा.' व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते.
त्यामुळे या पौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात.
#गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.
#आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण जीवनात काही तरी करतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत कायम आहे. त्यामुळे व्यासमुनींना आठवले पाहिजे.
ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. शास्त्रात त्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे कथन आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला.
व्यासांच्या कार्यामुळे त्यांना 'वेदव्यास' असे देखील म्हणतात. तसेच व्यासमुनी उच्चासनावर बसून वेदांचे अर्थ सांगत त्यामुळे आजही सभेत वक्ता बोलतो त्या जागेला 'व्यासपीठ' असे म्हणतात.
#स्मरण_करूया : आपली सर्वांची सर्वात पहिली गुरु म्हणजे आई. त्यानंतर वेळोवेळी योग्य ती शिकवण देणारे वडील, शिक्षक हे देखील आपले गुरु आहेत. मग आयुष्यात विविध टप्प्यांवर गुरुंची गाठ पडत जाते.
#गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने याचे चिंतन करायला हवे की, “ हे ज्ञान मिळायच्या आधी आपण कुठे होतो? आता कुठे आहे? पूर्वी या ज्ञानाशिवाय आपण कुठे होता? यातला फरक लक्षात आला की कृतज्ञता भाव येतो.
🤝 यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंना काहीही भेटवस्तू दिली तरी खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जी शिकवण दिली आहे, त्याचे प्रत्यक्षात आचरणात आणणे ही आहे.
🚩🚩🚩🚩🚩🚩
25/07/2024
🌼 #गणपती_बाप्पा_मोरया🌼
शिवशक्ती ढोल ताशा व ध्वज पथक नागपुर 🥁🚩
आपल्या #गणरायाच्या भक्तीचा #थाट धरून,
#छत्रपती_शिवरायांना_स्मरून,
#जल्लोषात शिवशक्तीचा #नाद धरूया...
आणि आपली #हिंदु_सस्कृती व #महाराष्ट्राच्या_परंपरे चा #मान_राखुया...
चला मग #शिवशक्ती _सोबत चलुया...🚩💪🏻
📝सभासद नोंदणी सुरू 📝
अधिक माहितीसाठी संपर्क
👇👇👇👇👇👇👇
9175659227,9975072480
Instagram Handle :-
Official
https://www.instagram.com/shivshaktiakhada.official?igsh=MTllMnVxa3g4MmI2Zw==
https://www.instagram.com/shivshaktiakhada.official?igsh=MTllMnVxa3g4MmI2Zw==
https://www.instagram.com/hiteshdaf?igsh=cmRjeGNxaXZtcWlh
ShivShakti Indian Martial Arts Academy - शिवशक्ती आखाडा (@shivshaktiakhada.official) • Instagram photos and videos
1,503 Followers, 135 Following, 346 Posts - See Instagram photos and videos from ShivShakti Indian Martial Arts Academy - शिवशक्ती आखाडा (.official)
31/05/2024
*शिवशक्ती आखाडा*
🤩 *उन्हाळी शिबीर 2024*🤩
नवीन वर्ग सुरू होत आहे.
रिगुलर आणि अडवान्स बॅच.
2 जुन 2024 ते 15 जुन 2024.
🚩🚩🚩🚩🚩🚩
नागपूर शहरात प्रथमच
शिवराय घरा घरात...
*तलवार*🤺, *दांडपट्टा,*
*भाला,* *निशस्त्र युद्ध*🥋🤼♂️,
*योगासन*🤸🏻 ,*धनुर्विद्या*🏹🎯,
*रायफल शूटिंग*🔫,*बौद्धिक*
👇👇👇👇👇👇👇
*शिकण्याची उत्तम संधी आणि एकमेव ठिकाण*.........
आत्ताच रजिस्ट्रेशन करा...
https://forms.gle/9cej5RMQLYvveyDL9
101₹ रजिस्ट्रेशन आणि 999₹ फी.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
-----9115731552-----
*पत्ता* : दिघोरी, पार्डी,नंदनवण, जामदार वाडी-शांती नगर, भगवान नगर जयप्रकाश नगर, नागपूर.
*वस्ताद* : हितेश वसंतराव डफ
9175659227
*टीप* : रजिस्ट्रेशन करण्यासाठी हा नं शिवशक्ती आखाड्याच्या नावाने सेव्ह करा..
#तलवार #भाला #उन्हाळी_शिबीर_2024 #समर
15/05/2024
#महाराष्ट्र_कामगार_कल्याण_मंडळ
#महाराष्ट्र_सरकार
गट कार्यालय १, नागपूर गटस्तरीय कार्यक्रमांअंतर्गत
#वसंत_व्याख्यानमाला
#व्याख्याते : मा.श्री. हितेश वसंतराव डफ
संचालक, शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण केंद्र, नागपूर
#विषय : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासन आणि व्यवस्थापन.
16 मे 2024 सायं. #संध्याकाळी 5.00 ते 6.00 वा. पर्यंत
: #आयोजक :
कांचन वाणी
कल्याण निरीक्षक इंदोरा