Tv7 marathi - टीव्ही सेव्हन मराठी

  • Home
  • India
  • Osmanabad
  • Tv7 marathi - टीव्ही सेव्हन मराठी

Tv7 marathi - टीव्ही सेव्हन मराठी सत्य , निर्भीड , निष्पक्ष , रोखठोक.!

तुळजापूरला अत्याधुनिक नवीन जिल्हा विश्रामगृह 16 कोटी 34 लाखांचा खर्च प्रस्तावित; सोलर पॅनेल, सेंट्रलाइज्ड एसीसह आधुनिक स...
20/08/2026

तुळजापूरला अत्याधुनिक नवीन जिल्हा विश्रामगृह

16 कोटी 34 लाखांचा खर्च प्रस्तावित; सोलर पॅनेल, सेंट्रलाइज्ड एसीसह आधुनिक सुविधा देण्याचे नियोजन :- आमदार राणाजगजीतसिंह पाटील

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर येथील प्रस्तावित नवीन जिल्हा विश्रामगृहाच्या बांधकामाला गती मिळाली आहे. अत्याधुनिक, दर्जेदार आणि सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज असे नवीन विश्रामगृह लवकरच साकारण्याचा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिल्या आहेत. याबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. तसेच मान्यवर, शासकीय अधिकारी आणि पर्यटकांचीही शहरात नियमित वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर निवासाची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन जिल्हा विश्रामगृह उभारण्यात येणार आहे.
प्रस्तावित विश्रामगृहाचे एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे ३ हजार ३६६ चौरस मीटर असून इमारत जी+२ स्वरूपाची असणार आहे. प्रत्येक मजल्यावर निवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यात चार व्ही.व्ही.आय.पी,चार व्ही.आय.पी व चार सेमी .व्ही.आय.पी असे एकूण १२ सूट असणार आहेत.चाळीस व्यक्तींची बैठक व भोजन व्यवस्था असलेला सुसज्ज डायनिंग हॉल तसेच स्वतंत्र कॉन्फरन्स रूमची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे १६ कोटी ३४ लाख २९ हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. प्रकल्पाचा अंदाज तांत्रिक मान्यतेसाठी मुख्य अभियंता कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून सध्या प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

नवीन विश्रामगृहाच्या बांधकामात गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. इमारतीमध्ये फर्निचरसह आवश्यक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. तसेच ऊर्जाबचतीच्या दृष्टीने सोलर पॅनेलची सुविधा उभारण्यात येणार असून संपूर्ण इमारतीसाठी सेंट्रलाइज्ड वातानुकूलित प्रणाली बसविण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रसिंह भोंसले यांनी दिल्या आहेत. मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या दालनात झालेल्या आढावा बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम) आबासाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

तुळजापूरचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन नवीन विश्रामगृह सुरक्षित, आकर्षक आणि दर्जेदार असावे, यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान, तुळजापूरला येणाऱ्या भाविक व पर्यटकांची वाढती संख्या, शासकीय व प्रशासकीय गरजा आणि शहराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता या नवीन जिल्हा विश्रामगृहामुळे निवासाच्या सुविधेत मोठी भर पडणार आहे.

आधुनिक सुविधांनी युक्त हे विश्रामगृह तुळजापूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच शहरातील पायाभूत सुविधांना बळकटी देणारे ठरणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटेंचा उबाठा सेनेत प्रवेश..!धाराशिव : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आज महत्त्वाची घडामोड घडली...
19/08/2026

संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटेंचा उबाठा सेनेत प्रवेश..!

धाराशिव :
जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आज महत्त्वाची घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासह भाजपलाही राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

संजय निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते म्हणून परिचित आहेत. तर रामेश्वर शेटे हे भाजपशी संबंधित नेते म्हणून राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. दोन्ही नेत्यांनी उद्धवसेनेची मशाल हाती घेतल्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात या प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

या पक्षप्रवेशावेळी आमदार कैलास पाटील, यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या काही काळापासून जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांच्या राजकीय वाटचालीत बदल होताना दिसत आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि भाजपच्या नेत्याने उद्धवसेनेत प्रवेश केल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

निंबाळकर आणि शेटे यांच्या प्रवेशामुळे उद्धवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

#धाराशिव

‘  is a  ? File-day..!’ सुट्टीच्या दिवशीही कामाचा धडाका ; देवेंद्र फडणवीसांच्या कार्यशैलीची पुन्हा चर्चामुंबई : रविवार म...
16/08/2026

‘ is a ? File-day..!’

सुट्टीच्या दिवशीही कामाचा धडाका ; देवेंद्र फडणवीसांच्या कार्यशैलीची पुन्हा चर्चा

मुंबई :
रविवार म्हटलं की सर्वसामान्यांपासून ते मोठ्या पदावरील व्यक्तींपर्यंत अनेकांसाठी विश्रांतीचा दिवस. मात्र, राज्याच्या कारभाराची धुरा सांभाळणाऱ्या व्यक्तीसाठी रविवारही कामाचा दिवस ठरू शकतो, याची झलक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

“Sunday is a holiday? File-day! Pendencies cleared!” अशी आशयपूर्ण पोस्ट सोशल मीडियावर करत फडणवीस यांनी सुट्टीच्या दिवशीही प्रलंबित कामांचा निपटारा केल्याचे अधोरेखित केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची काम करण्याची पद्धत, वेळेचे नियोजन आणि प्रशासनातील प्रलंबित विषयांना हात घालण्याची त्यांची कार्यशैली पुन्हा चर्चेत आली आहे.

रविवार म्हणजे ‘आराम’ अशी सर्वसामान्यांची मानसिकता असताना, मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने मात्र “सुट्टी म्हणजे कामाला अधिक वेळ” अशी भूमिका असल्याचे या पोस्टमधून दिसून येते. सरकारी कार्यालयांना सुट्टी असली, तरी फाईली थांबलेल्या असतात; निर्णयांची प्रतीक्षा असते आणि प्रशासनाकडून अपेक्षा कायम असतात. अशा वेळी त्या फाईलींचा निपटारा करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री सुट्टीच्या दिवशीही वेळ देत असतील, तर त्याकडे केवळ सोशल मीडिया पोस्ट म्हणून पाहण्यापेक्षा कामाच्या संस्कृतीचा एक संदेश म्हणून पाहावे लागेल.

“Pendency cleared” हा दोन शब्दांचा संदेश प्रशासनाच्या दृष्टीने मात्र मोठा #अर्थ घेऊन येतो. कारण कोणत्याही सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान असते ते केवळ निर्णय घेण्याचे नव्हे, तर निर्णयांची अंमलबजावणी आणि प्रलंबित विषयांचा वेगाने निपटारा करण्याचे. फाईल पुढे सरकली की एखाद्या विभागाचे काम सुरू होते, एखाद्या नागरिकाला दिलासा मिळतो आणि एखाद्या योजनेला गती मिळते.

मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची कार्यशैली आधीपासूनच ‘ #वर्किंग मोड’साठी ओळखली जाते, अशी त्यांच्या समर्थकांची धारणा आहे. बैठका, प्रशासकीय निर्णय, विकासकामांचा आढावा आणि विविध विषयांवर सातत्याने लक्ष ठेवण्याची त्यांची पद्धत पाहता रविवारही त्यांच्या कामाच्या वेळापत्रकातून सुटलेला नसल्याचे या पोस्टमधून पुन्हा अधोरेखित झाले.

राजकारणात आरोप-प्रत्यारोप, पक्षीय संघर्ष आणि श्रेयवाद नेहमीच सुरू असतो. मात्र, त्यापलीकडे सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीचा कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. मुख्यमंत्री सुट्टीच्या दिवशीही फाईलींचा निपटारा करत असतील, तर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही तो एक वेगळा संदेश ठरू शकतो ‘कामाला दिवस नसतो; जबाबदारीला सुट्टी नसते.!’

फडणवीस यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरही त्यांच्या कार्यशैलीची चर्चा होणे स्वाभाविक आहे. कारण मुख्यमंत्री पद हे केवळ राजकीय पद नसून राज्याच्या कोट्यवधी नागरिकांच्या अपेक्षांचे केंद्र आहे. त्यामुळे रविवार असो वा सोमवार, दिवस सुट्टीचा असो वा कामाचा राज्याच्या कामकाजातील प्रलंबित फाईलींना गती देण्याची गरज कायम असते.

म्हणूनच फडणवीस यांची ही पोस्ट केवळ दोन ओळींची सोशल मीडिया अपडेट नसून, “सुट्टीच्या दिवशीही काम थांबत नाही” असा प्रशासनाला आणि जनतेला दिलेला संदेश म्हणून पाहिली जात आहे.

आणि कदाचित म्हणूनच आजच्या डिजिटल युगातील प्रशासनाची नवी व्याख्या अशी करता येई...

“Sunday is not always a holiday…
कधी कधी तो ‘File-Day’ असतो ;
कारण जबाबदारीला कॅलेंडर नसते.!”


#धाराशिव

15/08/2026

टिंगल टवाळी करून प्रश्न सुटत नाही... पालकमंत्री यांना आमदार कैलास पाटील यांचे सडेतोड उत्तर

#कैलासपाटील

15/08/2026

स्वराज ध्वज लोकार्पण सोहळा,धाराशिव
खासदार ओमराजे निंबाळकर

15/08/2026

स्वराज्य ध्वज लोकार्पण सोहळा,धाराशिव
जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील

#धाराशिव

15/08/2026

स्वराज्य ध्वज लोकार्पण सोहळा
पालकमंत्री प्रताप सरनाईक
#धाराशिव

15/08/2026
15/08/2026

पत्रकार परिषद, पालकमंत्री प्रताप सरनाईक

15/08/2026

धाराशिव, पालकमंत्री प्रताप सरनाईक

Address

Osmanabad
413501

Telephone

+9595626210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tv7 marathi - टीव्ही सेव्हन मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share