Navchaitanya Hasyayog Pariwar, Pune - नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे
नवचैतन्य हास्ययोग परिवार हा 220 हास्यक्लब 25000 शाखा सदस्यांनी शारीरिक व मानसिक फायदे घेतलेली संस्था
Operating as usual
नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विश्वस्त, उत्तम शिस्तबद्ध खजिनदार, राजा मंत्री शाखेचे शाखा प्रमुख कै. रामनुजदास मिणीयार सर यांचे दु:खद निधन झाले आहे.
नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विश्वस्त, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, सभासद यांचे तर्फ़े भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🏻🙏🏻🙏🏻
नवचैतन्य हास्ययोग परिवाच्या ' हसायदान' या ऑनलाईन शाखेचा तिसरा वर्धापनदिन बालगंधर्व रंगमंदिर येथे झाला. 9 देशातून 5600 हून लोकांनी शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी लाभ घेतला आहे. यावेळी रौप्यमहोत्सवी गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
वाढत्या ताणतणावाच्या जीवनात हास्यक्लब जे योगदान अधोरेखित केल्याबद्दल मा. पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना धन्यवाद ! यावेळी डॉ. सागर देशपांडे यांचे उत्तम व्याख्यान झाले. ' बाईपण भारी देवा' चे गीतकार श्री. वलय मुलगुंद यांना ' नवचैतन्य कला, युवा सन्मान ' देण्यात आला. उत्साही व्यक्तिमत्त्व श्री. संदीप खर्डेकर उपस्थित होते.
सकाळी 8 वाजता हाऊसफुल्ल गर्दी करणाऱ्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद !
वार्तांकन करणाऱ्या सर्व माध्यमांचे मन:पूर्वक आभार !
- मकरंद टिल्लू
आळंदीला *माऊलींच्या* चरणी हास्ययोग सेवा !
आजपर्यंत 12 लाखाहून अधिक लोकांपर्यंत 'हसण्यासाठी जगा' हा विचार पोहचविणारे , हजारो ठिकाणी कार्यक्रम करणारे *हास्ययोग प्रबोधनकार मकरंद टिल्लू हे कीर्तन सोहळ्यात प्रथमच
'हास्ययोगातून आनंदसाधना'* हा विषय मांडणार आहेत.
- नवचैतन्य हास्ययोग परिवार
Happy Marriage Anniversary🌹🌹
Shri Kate sir & Sau. Kate vahini❤️❤️
नवचैतन्थोय हास्राययोग परिवार , थोरात उद्यान शाखा वर्धापन दिन. श्री. बाळासाहेब पाटील, श्री. घाटे व सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या 218 व्या शाखेचे उद्घाटन रामबाग कॉलनी, कोथरूड येथे करण्यात आले.
संस्थेचे विभाग प्रमुख जयंत दशपुत्रे यांच्या पुढाकाराने व ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने ही शाखा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.
यावेळी ओमप्रकाश कासट, विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू, रामानुजदास मिणियार, जयंत दशपुत्रे , श्रीकांत कुलकर्णी, सुनंदा पाटील उपस्थित होते.
- मकरंद टिल्लू
बारामती येथे विद्या प्रतिष्ठान च्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये ' हास्याचे धडे'..
खदाखदा हसणाऱ्या शाळेतील मुलांचा प्रचंड प्रतिसाद म्हणजे आनंदाचा सुगंध असतो!
25 जिल्हे आणि 61 गावात ही हास्ययात्रा निघाली आहे... आयोजनासाठी जरूर संपर्क साधा.
Thanks Sakal Nie, Vishal Saraph
- मकरंद टिल्लू
25 जिल्हे आणि 61 गावाच्या नव्या उपक्रमात आयोजन झालेली ठिकाणे:-
पुणे, निगडी, नगर, भिगवण, बारामती, अमरावती, नागपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, वाई, राजगुरूनगर
यशवंत रत्न - विशेष कार्य पुरस्काराने आज श्री. विठ्ठल काटे सर यांचा सन्मान करण्यात आला. मा. कुलगुरू श्री. नितीन करमळकर व माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृहात हा सन्मान करण्यात आला.
नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन!💐💐💐
- मकरंद टिल्लू व सर्व विश्वस्त परिवार
'हास्ययोग सत्संग'...नववर्षात सुरुवात!
आयोजक :- खेड तालुका एज्युकेशन सोसायटी, राजगुरूनगर.
शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी, सकारात्मक समाजासाठी ... पहिल्या टप्प्यात 25 जिल्हे व 61 गावात जाणार आहे. एक कोटी लोकांपर्यंत हा आनंद उत्सव घेऊन जाण्याचे उद्दिष्ट आहे!!!
आनंददायी संयोजनसाठी जरूर संपर्क साधा!
Thanks Dr. Pandurang , Dr. Shailaja Burute, Dr. Manik Bichkar.
- मकरंद टिल्लू (9766334277)
(लाफ्टरयोगा ट्रेनर, मोटिव्हशनल स्पीकर)
नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे पुणे पूर्व विभागीय मेळाव्याचे निमित्ताने
स्मरणिका प्रकाशन सोहळा कार्यक्रम महात्मा फुले सा॑स्कृतिक भवन वानवडी येथे आयोजित केला होता.
मा.आमदार श्री.सुनील का॑बळे या॑नी प्रकाशन केले, पर्यावरण क्षेत्रात भरीव कार्य केलेले,कर्नल सुरेश पाटील या॑नी पर्यावरणाचे महत्व,डाॅ.मिली॑द भोई याऺनी सुदृढ आरोग्याविषयक व गुरुवर्य श्री.काटे सर या॑नी हास्याची या काळातील निता॑त गरज या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले.
पुणे पूर्व विभाग प्रमुख श्री.प्रकाश अरगडे व उपप्रमुख श्री.श्रीका॑त बुरांडे या॑ऩी सूत्रसंचालन केले.
सुमारे २५०जणा॑चे उपस्थितीत आनंदात कार्यक्रम संपन्न झाला.
या विभागातील १८शाखा॑चे शाखाप्रमुख व उपशाखा प्रमुख या॑नी ही भरपूर योगदान यासाठी दिले.
एक, दोन, तीन, चार ...नो हॉर्न बार बार!
ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी घेऊया पुढाकार, नाहीतर करायला लागेल औषधोपचार !!!
लाईफ सेव्हिंग फाउंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे वाहतूक पोलीस, 95 बिग एफ एम आयोजित कार्यक्रम.
- मकरंद टिल्लू
(नवचैतन्य हास्ययोग परिवार)
माध्यमांना मन:पूर्वक धन्यवाद !
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे चतु:शृंगी देवस्थान येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
चतु:शृंगी देवस्थानचे पवित्र वातावरण, हजारो पणत्या, समोर उगवलेला पूर्णाकृती चंद्र मोठी रांगोळी, मंद वाऱ्याची झुळूक आणि हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते शेखर मुंदडा, साहित्यिक बबन पोतदार, नाट्य निर्मात्या भाग्यश्री देसाई, प्रेरणादायी वक्ते धनंजय देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल काटे, विजय भोसले, मकरंद टिल्लू, सौ. सुमन काटे, देवस्थानचे अध्यक्ष नंदकुमार अनगळ यांच्या हस्ते यावेळी दीपप्रज्वलन करण्यात आले.
नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे दरवर्षी चतुशृंगी देवस्थान येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. संस्थेतर्फे दीपोत्सवाचे हे आठवे वर्ष आहे.
विजय भोसले यांनी कलाकृतीचे डिझाईन केले. जयंत दशपुत्रे, दिलीप साळुंखे, कैलास काठे, संतोष महाडिक, साक्षी महाडिक, धस पोपटलाल शिंगवी, हरिषभाई पाठक , प्रमोद ढेपे यांनी उत्तमप्रकारे मदत केली .
- मकरंद टिल्लू
(नवचैतन्य हास्ययोग परिवार)
*🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏*
श्री रामचंद्र देखणे यांचे दुःखद निधन 🙏
ही बातमी ऐकून आपणा सर्वांना फार मोठा धक्का बसला आहे. चार दिवसांपूर्वी आपल्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या आनंद मेळ्यात आपल्या सुंदर व प्रभावी व्याख्याना ने नेहमीप्रमाणेच सर्वांचे मने जिंकणारे असे देवत्व असलेले व्यक्तिमत्व आज आपल्यापासून हिरावले आहे. आपल्या नवचैतन्य हास्य परिवारासाठी व श्री काटे सर ज्येष्ठांसाठी करीत असलेल्या कार्याबद्दल विशेष ममत्व प्रेम व माया त्यांच्या शब्दातून वाणीतून सतत जाणवत होती. आपल्या परिवाराच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती नक्की असे.
असे हे दिलखुलास हसतमुख व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही, पण परमेश्वराला सुद्धा ते हवे हवेसे वाटत असावेत म्हणूनच त्यांना आपल्यात सामावून घेतले !
असो, ईश्वरच्छा पुढे आपण हतबल होतो.
आपल्या नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली👏
त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगी ईश्वर शक्ती देवो , हीच प्रार्थना 🙏
श्री काटे सर, विश्वस्त व सर्व सभासद.
नवचैतन्य हास्य योग परिवार.
नवचैतन्य हास्य योग परिवारच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात पाषाण खिंड शाखेने सादर केलेला आदिवासी नृत्याचा सुंदर कला अविष्कार 🌹
नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या काल गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या कार्यक्रमाचे विविध वर्तमानपत्रात आलेले वार्तांकन...जास्तीतजास्त लोकांना पाठवूया.
काल अतीशय उत्तम कार्यक्रम करण्यासाठी सर्वांनी आयोजन आणि उपस्थितीने सहकार्य केले त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद ! 🙏🏼🙂👍🏻
हास्ययोगाची ही पताका गावोगावी घेऊन जाऊया! समाजात आनंद आणि हास्य निर्माण करूया!!!🤝🏻
- मकरंद टिल्लू
Navchaitnya Live Show Navchaitnya Live Show
आज सायंकाळी 5 वा. सस्नेह निमंत्रण
नवचैतन्य हास्ययोग परिवार:
हास्यक्लब चळवळीचा रौप्य महोत्सव !
*नवचैतन्य हास्ययोग परिवार वर्धापनदिनी गुरुवारी (ता. २२) व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम*
Click to watch video
हास्ययोग चळवळीच्या नवचैतन्याचा, रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनी - maharashtradarpantvnews पुणे : 'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे' हसरे करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्थे
आपल्या नवचैतन्य हास्ययोग परिवार दिल्लीहून ऑनलाईन जॉईन होत असलेल्या सौ रागिणीआगाशे यांचा आज 75 वा वाढदिवस 🎂🌹💐
अण्णा वाढदिवसाच्या आपल्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा 🌹
आज वाढदिवसानिमित्त त्यांनी ऑनलाइन व्यक्त केलेले आपले मनोगत..... 🙏
आजची टिल्लू गोष्ट.....
श्री मकरंद जी टिल्लू 😀
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*🙏तेथे कर माझे जुळती 🙏*
*आपल्या पाषाणखिंड शाखेचे जेष्ठ व श्रेष्ठ सभासद श्री यशवंतराव चोपडे यांच्या भगिनी श्रीमती उषाताई महाजन यांनी आपल्या नवचैतन्य हास्ययोग परिवाराला रोप्य महोत्सवा निमित्त रुपये 51000 (51 हजार) कृतज्ञता निधी गुरुवर्य श्री काटे सरांना चेक द्वारे सुपूर्द केला.*
श्री यशवंतराव चोपडे यांच्या घरी झालेल्या छोटेखानी समारंभात हा आनंदोत्सव पार पडला. याप्रसंगी आपले अध्यक्ष श्री काटे सर, उपाध्यक्ष सौ सुमन ताई काटे व श्री विजयराव भोसले, समन्वयक श्री मकरंद टिल्लू, सचिव श्री पोपटलालजी शिंगवी विश्वस्त श्री प्रमोद ढेपे, श्री हरीश भाई पाठक, सौ विनिता टिल्लू तसेच पाषाणखिंड शाखाप्रमुख श्री नाना कदम, उपप्रमुख सौ किरण ठुसे, शाखेचे सदस्य श्री बोखारे सर श्री राजदेरकर सर, सौ स्वाती राजदेरकर उपस्थित होते.
श्रीमती उषाताई महाजन त्यांचे बंधू श्री यशवंतराव चोपडे, त्यांच्या पत्नी सौ विजयालक्ष्मी, सूपुत्र श्री मनीष, स्नुषा सौ रुपाली तसेच परिवारातील इतर सर्व सदस्य हजर होते.
श्रीमती उषाताई महाजन वय वर्षे 84. या मूळ शहापूर जिल्हा बऱ्हाणपूर या महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमेवरील एका लहानशा गावात त्यांचा जन्म झाला.
त्यांचे वडील एक आदर्श शिक्षक होते आणि विशेष म्हणजे ते त्या काळात साने गुरुजींच्या सानिध्यात व त्यांच्या बरोबरीने कार्य करीत असल्याने अत्यंत उच्च विचारसरणी, समाजासाठी काही करण्याची तळमळ, व आदर्श शिक्षक होते. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी ते शाळे व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग चालवीत असत. त्यांनी असंख्य गरीब विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांचं भविष्य घडविले आहे.
आपल्या वडिलांचा हाच आदर्श त्यांची कन्या उषाताई तसेच यशवंतराव या भावंडात पुरेपूर वसला आहे. सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या उषाताई यांचे आयुष्य बऱ्याच कठीण प्रसंगातून गेलेले आहे. त्यांचे पती इन्कम टॅक्स विभागात स्टेनोग्राफर क्लर्क म्हणून मुंबई येथे नोकरीला होते, पुढे स्वकर्तुत्वाने ते कमिशनर या पदापर्यंत पोहोचले होते. परंतु दुर्दैवाने वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांचे वाहन अपघातात निधन झाले. या कठीण प्रसंगात सुद्धा त्यांनी आपल्या मुलांना, (तीन मुली व दोन मुले ) योग्य ते शिक्षण देऊन त्यांचा सांभाळ केला व त्यांचे जीवन मार्गी लावले. आज वयाच्या 84 व्या वर्षी त्या आनंदी व समाधानी जीवन जगत आहे.
श्रीमती उषाताई महाजन व आपला नवचैतन्य हास्ययोग परिवार यांना जोडण्यात विशेष कारणीभूत म्हणजे *कोरोना* वर्षातून दोन वेळा उषाताई आपले बंधू श्री यशवंतराव यांना भेटण्यासाठी मुंबईहून पुण्यात येत. त्यावेळी त्या जवळपास एक महिना त्यांच्या घरी राहात असत. त्यावेळी ते आपले बंधू व वहिनी यांना रोज सकाळी हास्यक्लबला जाताना पहात. व आपल्या बंधू व वहिनी यांच्या स्वभावात व शारीरिक आरोग्यात झालेला सकारात्मक बदल पाहून त्यांना फार आनंद झाला व त्यांनी आपल्या नवचैतन्य हास्ययोग परिवाराबद्दल बरीचशी माहिती जाणून घेतली. काही वेळा त्या आपल्या पाषाणखिंड शाखेत सुद्धा येऊन गेल्या.
परंतु जेव्हा कोरोना संकट आले व हास्य क्लब बंद झाला त्यावेळेस त्या पुण्यात आलेल्या होत्या. आपला ऑनलाईन हास्य क्लब सुरू झाला होता व श्री यशवंतराव व त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मीताई हे ऑनलाइन व्यायामात रोज सकाळी सामील होत ते पाहून त्यांनी पण त्यांच्याबरोबरच ऑनलाईन व्यायामाला सुरुवात केली. त्या काळात आपल्या सर्वांना ऑनलाइन व्यायामाचे महत्त्व कळलं होतं, कारण आपण कुठे जाऊ शकत नव्हतो व सर्वत्र भयाचे नकारात्मक गोष्टीचे वातावरण पसरले होते. त्या काळात फक्त एकाच ठिकाणी हास्य, आनंद व सकारात्मक गोष्टी होत होत्या ते ठिकाण म्हणजे ऑनलाईन हास्य क्लब. श्रीमती उषाताई यांनी या ऑनलाइनचा भरपूर आनंद घेतला व आज पण त्या मुंबईला राहात असल्याने तिथून ऑनलाईन व्यायामात सामील होतात.
श्री काटे सर व काटे वहिनी यांची ऑनलाइन कार्यक्रमात व्यायाम घेण्याची पद्धत त्यांना अतिशय आवडली आहे. प्रत्येक व्यायामामुळे होणारे शारीरिक फायदे व निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम तसेच निरोगी मन व आनंदासाठी हवा हवासा वाटणारा हास्ययोग या सर्वांनी त्या प्रभावित झाल्या आहेत.
श्रीमती उषाताई या वेळी रक्षाबंधनासाठी आपल्या बंधू कडे आल्या तेव्हा त्यांना आपल्या संस्थेच्या रौप्य महोत्सवाची बातमी मिळाली व त्यांनी आपले बंधू श्री यशवंतराव यांच्याकडे आपल्या संस्थेला कृतज्ञता निधी देण्याची इच्छा व्यक्त केली. व आज तो आनंदाचा क्षण आपण साजरा करीत आहोत.
आपल्या संस्थेला श्रीमती उषाताई महाजन यांनी दिलेली रुपये 51 हजार ही देणगी छोटी नाही, फार फार मोठी आहे. कारण त्या गर्भ श्रीमंत नाहीत पण त्यांना मिळालेले आदर्श संस्कार, एका आदर्श शिक्षकाची सुकन्या त्यांचे मन हे फार मोठं आहे येथे मनाची श्रीमंती दिसून येते. आपल्या आसपास हजारो करोडपती आहेत पण समाजाप्रती प्रेम आदर व समाजाचे ऋण, दान करून त्यातून उतराई होण्याची भावना फार कमी लोकात आढळते.
श्रीमती उषाताई महाजन यांनी आपल्या संस्थेला दिलेल्या कृतज्ञता निधीबद्दल नवचैतन्य हास्ययोग परिवार त्यांचा शतशः आभारी आहे🌹
त्यांच्या शतकपूर्तीचा महोत्सव नवचैतन्याच्या व्यासपीठावर जोरात साजरा होवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना🙏
श्री चोपडे व महाजन परिवाराचे पुनश्च धन्यवाद 🙏
*श्री हरीश भाई पाठक 😀*
*विश्वस्त, नवचैतन्य हास्ययोग परिवार*
😀👏😀👏😀👏😀👏😀
आजची टिल्लू गोष्ट 😀
नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा विभागीय मेळावा. पुण्यातील हास्यक्लब चळवळीचा रौप्यमहोत्सव विविध भागात साजरा करण्यात येत आहे.
वृत्त सहकार्य : किरण गुलुंबे
आपल्या नवचैतन्य हास्य योग परिवाराच्या पिंपळे गुरव शाखेच्या अत्यंत कार्यशील सभासद श्रीमती सुनंदा रायते यांचा आज वाढदिवस आहे🎂. त्यानिमित्त त्यांनी ऑनलाइन कार्यक्रमात व्यक्त केलेले मनोगत 🌹
आज आपल्या संस्थेचे विश्वस्त व डी एस के विश्व शाखेचे शाखा प्रमुख श्री जयंत शेटे यांच्या पत्नी सौ. ज्योती ताई जयंत शेटे यांचा 70 वा वाढदिवस साजरा झाला 🎂. त्यानिमित्त त्यांनी व्यक्त केलेले आपले मनोगत 🌹
आजची टिल्लू गोष्ट 😀
श्री मकरंदजी टिल्लू
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Location
Category
Telephone
Address
Gautam, 569/b6, Shivajinagar
Pune
411005
Eisha Zenith, Near Akshara International School, Wakad
Pune, 411033
Welcome to Dr.Kirti's Fitness World. Here you will get rejuvenated by physically & mentally as well. We have Online & Offline Yoga Batches....
Baner
Pune, 411045
Influenced by teachers, environment I aim to bring a sense of spiritual upliftment to each of my cla
03 Vijaya Bunglow Shramik Society Near Png Jewellery Paud Road Kothrud
Pune, 411038
Dance your way to a better body and better health! Zumba | Yoga | Folk fitness | Contemporary | Boll
C501, 24k Stargaze, Near Windmill Village, Bavdhan
Pune, 411021
Discover inner peace & wellness at Vedas Yogalay. Immerse in authentic yogic practices, sattvic meals & serene surroundings. Nourish your mind, body & soul with ancient Vedic wisdom. Join us on a journey towards holistic health.
411006
Pune, 411006
Finally Minds have started unlocking after a long lock down. But has our body unlocked itself? It's time to unlock our body. Looking for a solution? I am here again with most innovative Yoga Solutions.
Dhanori
Pune, 411015
Art Of Living is where we serve society by strengthening the individual; this page is dedicated to Art Of Living Dhanori, Pune area.
Surekha Pendharkar, FLAT NO. 8 In Shivangan Puva Co Op. Hsg. Sty . Near Kailash Jeevan Factory. Dhayari. Pune
Pune, 411041