06/05/2026
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची कार्यकारिणी सभा व विशेष सर्वसाधारण सभा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मुख्य स्टेडियम सभागृह, महाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे असोसिएशनचे उपाध्यक्ष मा. आमदार श्री. संदीपजी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मा. ना. श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
मा. श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
28/01/2026
महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वाटचालीत मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. दूरदृष्टी असलेले नेतृत्व, कठोर शिस्त, स्पष्ट निर्णयक्षमता आणि शब्दाला जागणारी कार्यशैली यामुळे त्यांनी जनमानसात अढळ विश्वास निर्माण केला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विकास, क्रीडा आणि प्रशासन या क्षेत्रांना नवी दिशा दिली. शेतकरी, युवक, क्रीडापटू आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या हितासाठी त्यांनी सातत्याने काम केले. अजित दादांचं अपघाती निधन मनाला चटका लावणारे आहे. विकासाचा ध्यास आणि कामाचा अफाट उरक असलेल्या या लोकनेत्याच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वाहिलेल्या त्यांच्या अथक कार्याला आणि प्रेरणादायी नेतृत्वाला मनापासून आदरांजली. त्यांच्या विचारांनी व कार्याने महाराष्ट्र कायम प्रेरित राहील.
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन... भावपूर्ण श्रद्धांजली!
23/01/2026
‘पुणे ग्रँड टूर‘ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा समारोप दिवस
पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रँड टूर‘ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा आज अंतिम दिवस ठरला. स्पर्धेची सुरुवात बालेवाडी येथून झाली असून तिचा समारोप बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री, युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत असोसिएशनचे महासचिव श्री. संजयजी शेटे, उपाध्यक्ष स्मिता यादव, श्री. मनोज भोरे तसेच कार्यकारिणी सदस्य श्री. राकेश तिवारी उपस्थित होते.
.khadse
23/01/2026
"पुणे ग्रँड टूर्स" या आंतरराष्ट्रीय स्पर्धेस MOA पदाधिकारी यांची सदिच्छा भेट
पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी होत असलेल्या "पुणे ग्रँड टूर्स" या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सासवड या मार्गावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन अध्यक्ष मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांचे समवेत असोसिएशनचे महासचिव - श्री संजयजी शेटे, सहसचिव - निलेश जगताप यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष - श्री विक्रम रोठे व सचिव - श्री. संजय साठे हे ही उपस्थित होते.
12/12/2025
क्रीडा आयुक्तालयात महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा बैठक ✨
राज्य ऑलिंपिक स्पर्धा, 2029 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तसेच 2030 कॉमनवेल्थ आणि 2036 ऑलिंपिक स्पर्धांच्या तयारीवर सविस्तर चर्चा झाली. राज्याचे मा. मुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे मुख्य आश्रयदाते मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री व असोसिएशनचे अध्यक्ष मा.ना.श्री अजितदादा पवार आणि मा. केंद्रीय राज्यमंत्री व असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा.ना.श्री मुरलीधरजी मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा, तयारी, आणि क्रीडा संघटनांच्या आर्थिक बळकटीसाठी सीएसआर निधी वाढवण्याबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे चर्चिले गेले.
या बैठकीस आयुक्त सौ. शीतल तेली-उगले यांच्यासह महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे माननीय मा. खासदार आणि उपाध्यक्ष मनोज कोटक, उपाध्यक्ष मनोज भोरे, महासचिव संजय शेटे, सहसचिव शैलेश टिळक, प्रदीप खांडरे आणि निलेश जगताप यांसह प्रकाश तुळपुळे, दत्ता आफळे, योगेश दोडके उपस्थित होते. सहाय्यक संचालक सुधीर मोरे यांची शासन प्रतिनिधी म्हणून उपस्थिती होती.
बैठकीत शासन आणि ऑलिंपिक संघटना यांच्यातील कार्यपद्धती अधिक पारदर्शक, सुसूत्र आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने एस.ओ.पी. तयार करण्यावरही चर्चा झाली. तसेच राज्य प्रतिनिधींना राष्ट्रीय फेडरेशनमध्ये अधिक सहभाग मिळावा यावर भर देण्यात आला.
बैठकीनंतर बालेवाडीतील प्रस्तावित ऑलिंपिक भवनाच्या बांधकाम प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मा. खासदार मनोज कोटक यांनी बांधकाम नियोजित वेळापत्रकानुसार गतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
22/07/2025
💐महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
#देवेंद्रफडणवीस
22/07/2025
💐महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष
मा.श्री. अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
24/06/2025
Thank you for your overwhelming Response!
24/06/2025
🥋 Kicks of Strength, Spirit of the Olympics!
Yesterday, On International Olympic Day, we celebrate the power of sports to inspire, unite, and transform.
Here’s a glimpse of the Taekwondo warriors showcasing agility, discipline, and Olympic spirit in every move! 🌍🔥
Let’s keep moving, dreaming, and breaking limits together. 💪