02/02/2024
*गिफ़्ट तिलापियाची मत्स्यशेती : एकदिवसीय शेतकरी संवाद मेळावा*
दिनांक:- शनिवार, 03 फ़ेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वा.
स्थळ:- तांबोळी गिफ्ट (GIFT ) तिलापिया मत्स्यबीज उत्पादन केंद्र, पाटस, ता.दोंड, जि.पुणे
आयोजक:- RGCA-MPEDA व मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे
Rajiv Gandhi Centre for Aquaculture (RGCA-MPEDA),* Vijaywada, AP आणि मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागातील मत्स्यतळे, केज व बायोफ़्लोक मध्ये तिलापियाची मत्स्यशेती करीत असलेल्या व पुढे करू इच्छिणा-या शेतक-यांसाठी एकदिवसीय शेतकरी संवाद मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमात तिलापियाची मत्स्यशेती करणा-या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येईल व त्यांचे तिलापिया मत्स्यशेती बाबतचे अनुभव जाणून घेता येतील. तसेच उपस्थितांना RGCAच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल. सदर कार्यक्रम तिलापिया हॅचरी असलेल्या ठिकाणी आयोजीत करण्यात आल्यामुळे सर्वांना तिलापिया हॅचरी, कार्प हॅचरी, तिलापियाचा प्रजनक साठा, गिफ़्ट तिलापियाचे बीज, बायोफ़्लोक प्रकल्प, इत्यादी जवळून पाहता येईल. *सदर शेतकरी संवाद मेळावा अतिशय महत्वपूर्ण असून या कार्यक्रमातून शेतक-यांना गिफ़्ट तिलापिया मत्स्यशेतीतून हमखास उत्पन्न वाढविण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळेल.* याची फ़लनिष्पत्ती म्हणजे प्रति हेक्टरी उत्पादन तर वाढेलच शिवाय होणारे नुकसान देखिल टाळता येईल. या मेळाव्यात गिफ़्ट तिलापियाची सातत्यपूर्ण मत्स्यशेती करणारे प्रगतशील मत्स्यशेतकरी व मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी देखिल उपस्थित राहणार आहेत.
तरी याद्वारे आवाहन करण्यात येते कि, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील मत्स्यतळे, केज व बायोफ़्लोक मध्ये तिलापियाची मत्स्यशेती करीत असलेल्या व पुढे करणार असणा-या पुणे विभागातील सर्व प्रकल्प लाभार्थ्यांनी व शेतक-यांनी उपस्थित रहावे, हि विनंती. अधिक माहितीसाठी 8208413011, 9881600951 व 9764386363 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. या क्रमांकांवर संपर्क साधून आपण आपली उपस्थिती निश्चित करावी.
शेतकरी मित्रांनो, अचानक कार्यक्रम ठरल्यामुळे वेळ कमी आहे, परंतु RGCAचे अधिकारी व शास्त्रज्ञ केवळ आपल्या शेतक-यांच्या हितासाठी आंध्र प्रदेश वरून पुणे येथे आले आहेत, त्यामुळे आपण आवर्जून या मेळाव्याला उपस्थित रहावे, हि नम्र विनंती.
*विशेष सूचना:- प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील प्रकल्प लाभार्थ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे.*
आपला,
मत्स्यव्यवसाय विभाग पुणे
28/12/2020
15/12/2020
24/10/2020