01/05/2021
*कोरोनामुळे चिंता वाटतेय, नैराश्य आलेय? मग बोला आमच्याशी. समुपदेशनासाठी खुले व्यासपीठ*
सध्याची परिस्थिती आपल्या कोणालाच नवीन नाही. अशा परिस्थिती मध्ये शारीरिक आरोग्य जितक महत्वाचं आहे तितकंच मानसिक आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे. सध्याच्या काळात अनेक नकारात्मक विचार येत असतात. आपल्याला कोविड होईल का म्हणून भीती , जवळच्या व्यक्तींना झाला तर त्यांची काळजी, बरे होतील का, बेड मिळेल का , ऑक्सिजन मिळेल का याची चिंता, लॉकडाउन मुळे सगळं आयुष्य कोंडल्या सारखं वाटणं, त्यातून नैराश्य येणं अशा सगळ्या नकारात्मक भावना दिसतायेत. कोविड मधून बरे झाल्यानंतरही बऱ्याच जणांना मानसिक त्रास होताना दिसतात. कोविड मधून जाणं हे एक दिव्यच. त्यामुळे या ओढवलेल्या परिस्थितीचा धक्का बसणं, चिडचिड होणं, उदास वाटणं हे होऊ शकत.
मोठ्या माणसांबरोबरच मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं आत्ता महत्वाचं आहे. विशेषतः किशोरवयीन ( teenager ) मुलांची. त्यांचासाठी घरी बसून राहणं, त्यामुळे स्क्रीन चा वाढलेला वापर, पालकांबरोबरचा तणाव, परीक्षांची अनिश्चितता या सगळ्या गोष्टी ताण वाढवणाऱ्या आहेत. गेल्या काही दिवसात बरीच मुलं आली ज्यांचा मध्ये अती चिंता, भीती, उदासीनता, एकटेपणा अशा भावना प्रामुख्याने दिसून आल्या.
जेव्हा अशा प्रकारच्या नकारात्मक भावना सतत येत असतील, तेव्हा समुपदेशकांची मदत घ्यायला हवी. त्याचबरोबर प्रयत्नपूर्वक स्वतःला कोणत्यातरी कामामध्ये किवा आवडत्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवायला हवं.
अशा समस्यांबाबत समुपदेशन करण्यासाठी या क्षेत्रात गेली दहा वर्षे काम करणारी *स्टेप अप फाउंडेशन* व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
आपण आमच्याशी तुमच्या समस्यांबाबत मनमोकळे बोलू शकता, त्यासाठी 9823723451 या क्रमांकावर संपर्क साधावा.
आनंदी जगण्यासाठी मनमोकळा संवाद. धन्यवाद 🙏
28/09/2020
23/09/2020
21/09/2020
23/07/2020
09/07/2020
08/07/2020
02/07/2020