12/04/2026
लोक म्हणतात आरसा फक्त चेहरा दाखवतो, पण गरोदरपणात आरसा तुमचं 'मानसिक आरोग्य' दाखवतो. तुम्ही स्वतःला दिलेली एक छोटीशी 'Compliment' बाळासाठी जगातील सर्वात मोठं प्रोत्साहन ठरू शकते. कारण आई जेव्हा स्वतःवर प्रेम करते, तेव्हाच बाळ स्वतःचा स्वीकार करायला शिकतं.
#गर्भसंस्कार
11/04/2026
ज्यांनी स्त्रीला स्वाभिमान आणि शिक्षणाचं बळ दिलं, त्या महापुरुषाची आज जयंती.
स्त्री ही केवळ जन्मदात्री नाही, तर ती समाजाची शिल्पकार आहे, हा संदेश त्यांनी आयुष्यभर जपला.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना कोटी कोटी प्रणाम!
10/04/2026
छत्रपती संभाजीनगरची छोटी परी श्रीजा चेतनसिंग माहेर हिने अवघ्या ७ महिने १३ दिवसांच्या वयात 'Influencer Book of World Records' मध्ये स्वतःचं नाव नोंदवून इतिहास घडवला आहे!
GSC (Garbh Sanskar Challenge) च्या माध्यमातून आम्ही नेहमीच सांगतो की, प्रत्येक बाळ हे 'जीनियस' जन्माला येतं, गरज असते ती फक्त त्याला योग्य वेळी योग्य दिशा देण्याची. श्रीजाने हे सिद्ध करून दाखवलंय!
#गर्भसंस्कार
10/04/2026
दिवसभर काम करून दमलात? अंपायरचा इशारा समजून घ्या आणि थोडी झोप घ्या. नऊ महिन्यांची ही इनिंग खेळताना तुमची एनर्जी टिकवून ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे.
तुम्ही फ्रेश, तर बाळही फ्रेश!
#गर्भसंस्कार
09/04/2026
मॅचमध्ये एका 'नो-बॉल'मुळे जशी पूर्ण गेम बदलू शकते, तसंच रात्रीचं जागरण तुमच्या आणि बाळाच्या आरोग्याची 'लाइन आणि लेंथ' बिघडवू शकतं. रात्री १० ते २ ही वेळ बाळाच्या पेशींच्या दुरुस्तीसाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे मोबाईलला करा 'पॅव्हेलियन'मध्ये परत आणि वेळेवर झोपून बाळाची शांत वाढ होऊ द्या !
#गर्भसंस्कार
08/04/2026
क्रिकेटच्या मैदानात जसा रन्सचा स्कोअरबोर्ड महत्त्वाचा असतो, तसाच तुमच्या शरीरातील पाण्याचा 'हायड्रेशन स्कोअर' महत्त्वाचा आहे! पुरेसं पाणी पिणं म्हणजे तुमच्या बाळासाठी एक भक्कम 'ओपनिंग पार्टनरशिप' तयार करणं. पाणी कमी पडू देऊ नका, कारण हीच तुमच्या इनिंगची सर्वात 'Safe Strategy' आहे.
#गर्भसंस्कार
07/04/2026
आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक सुदृढता नव्हे, तर आत्मिक शांती सुद्धा! या जागतिक आरोग्य दिनी, स्वतःला थोडा वेळ द्या. गरोदरपणातील तुम्ही केलेले Meditation बाळाच्या भविष्यातील एका स्थिर आणि हुशार व्यक्तिमत्त्वाचा पाया रचतं. आरोग्य हे तुमचं सर्वात मोठं 'धन' आहे आणि हे सुसंस्कृत मातृत्व तुमचं सर्वात मोठं 'पुण्य'!
#गर्भसंस्कार
06/04/2026
रक्तातील हिमोग्लोबिन (Hb) शरीराला ऑक्सिजन देतं, पण मनातील 'आनंद' बाळाला जगण्याची नवी उमेद आणि सकारात्मकता देतो. गरोदरपणात जितकी काळजी आपण आहाराची घेतो, तितकीच काळजी आपल्या विचारांची आणि आनंदाचीही घ्यायला हवी. कारण तुमचं हसणं हे बाळासाठी जगातील सर्वात मोठं 'आरोग्य टॉनिक' आहे!
#गर्भसंस्कार #आरोग्यविचार
04/04/2026
एकाच बागेतली सगळी फुलं सारखी नसतात, पण प्रत्येक फूल आपल्या सुबकतेने बागेची शोभा वाढवतं. ऑटिझम असलेल्या मुलांची दुसऱ्या कोणाशीही 'तुलना' नको, तर त्यांच्यातील विशेष गुणांचा 'स्वीकार' हवा. जेव्हा तुम्ही त्यांना आहे तसं स्वीकारता, तेव्हाच त्यांच्या प्रगतीचा खरा मार्ग मोकळा होतो.
#गर्भसंस्कार
03/04/2026
ऑटिझम असलेल्या मुलांकडे बघताना आपल्या नजरेतला 'दोष' बदला, तरच आपल्याला त्यांच्यातील 'विशेष गुण' दिसतील. चला, त्यांच्या या अनोख्या रंगांचा आणि जगाचा मनापासून स्वीकार करूया!
#गर्भसंस्कार
02/04/2026
आईसाठी तिचं बाळ नेहमीच 'विशेष' असतं... मग ते जगाच्या चौकटीत बसो किंवा नसो!
काही मुलं शब्दांत व्यक्त होत नाहीत, पण त्यांच्या एका हास्यात हजारो गोष्टी दडलेल्या असतात. त्यांच्या या 'वेगळ्या दुनियेत' डोकावून बघा, तिथे फक्त निखळ प्रेम आणि सत्य दिसेल.
#गर्भसंस्कार