एक कमेंट आली होती,शक्यतो अशा उत्तर देणा-या पोस्ट लिहित नाही पण 'इनर चाइल्ड हिलिंग' शिकवते,या नात्यानं,वाचकांसाठी आणि कोर्स केलेल्या विद्यार्थिनींसाठी रिविजन असं उत्तर लिहिते आहे.समुपदेशन आणि डॉक्टरांच्या मदतीला पर्याय म्हणून ही पोस्ट वाचू नये फक्त माहिती म्हणून वाचावी.
निमित्त आहे ही कमेंट!
व्यक्तीशः कोणाला मार्गदर्शन करण्यासाठी ही पोस्ट नाही,विषय पेजवर यावा म्हणून लिहिते आहे,युट्युब वर खरं तर त्यांनी हा प्रश्न सर्च केला असता तर त्यांना व्हिडिओ मिळाले असते,असो.
#कमेंट
(पोस्ट :आई म्हणजे)
नेहमी नियमित मी तुम्हाला वाचते... खुप आवडतात लेख तुमचे, पण सगळ्यांच्या नशिबी ही "mother healing energy" नसते... काहींच्या नशिबी फार फार टॉक्सिक आणि तिरस्कारयुक्त मातृत्व आलेलं असतं,आयुष्यभराचा ट्रॉमा देतात ... खुप खुप वाईट अनुभव सोबतीला राहतात,मनापासून inner child हील करावं वाटत पण जोडीला तेवढे पैसे नसतात, सांसारिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक ताण यातून जमत नाही..आई या शब्दावरचा विश्वास उठावा इतका वाईट अनुभव आयुष्याने दिल्यावर नात तोडण हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो. अशा लोकांनीं काय करण अपेक्षित आहे त्यावर सुद्धा mother's day la नक्की सांगा.
#उत्तर
हा मोठा विषय आहे जो मी चार तास शिकवते त्यामुळे पोस्टमध्ये किती लिहिता येईल माहिती नाही लिहिण्याचा प्रयत्न करते आहे.
कमेंट मधे गैरसमज दिसतो आहे आणि तो इंटरनेटवरील अपु-या माहितीतून आलेला आहे, हेच होतंय आज-काल!
टाॅक्सिक -ट्रॉमा- इनर चाइल्ड !!!
हे सगळे शब्द तर परिचित होतात पण अपूर्ण ज्ञान हे अज्ञानापेक्षा घातक असतं.
कोण म्हणतं इनर चाइल्ड हील करायला पैसे खर्च करावे लागतात?
तुम्ही श्रध्दा आणि समर्पणानं,देवाला,युनिवर्सला आई-बाबा म्हणून हाक मारायला सुरुवात करा तुमच्या आतलं लहान मूल हिल व्हायला सुरुवात होईल,
कुणाची तरी निस्वार्थ सेवा करणं,
कुणाला तरी मदत करणं,हे सुद्धा हिलिंग आहे,
आतलं इनर चाइल्ड यानं बरं होतं.
स्वतःचा स्विकार करा,स्वतःची काळजी घ्या, स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करा,बालपणी ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत,त्या मिळवण्यासाठी धडपड करून त्या स्वतःला मिळवून द्या हे सुद्धा हिलिंग आहे.
आयुष्याची जबाबदारी घ्या,स्वतः स्वतःची आई व्हा,असं समजा की,आपल्या आत एक छोटी मुलगी आहे,जिच्यावर खूप अन्याय झालाय,ती खूप दुःखी आहे आणि ती मदत मागते आहे, तिच्याकडे पैसे नाहीत,बालपणीचे ट्रॉमा आठवून ती रडते आहे,इतरांकडे मदत मागते आहे.
तुमच्या आतल्या या छोट्या मुलीला तुम्ही काय मदत कराल?
हा विचार करायला सुरुवात करा,तिची जबाबदारी घ्या!एकदा तिला म्हणा की,
मी आहे,मी बघते.
आता तुम्हाला काय करावसं वाटतंय तिच्यासाठी?
तुम्ही काय करणं अपेक्षित आहे?
जुनी गोष्ट जुनं रडगाणं सोडून स्वतःच्या मेंदूला वेगळे प्रश्न द्या आणि विचारा की,
मी काय करू शकते?
मी काय करू?
भूतकाळातून बाहेर पडून मी स्वतःचं चांगलं भविष्य कसं निर्माण करू?
रडण्याची सवय लागली असेल तर मन पुन्हा पुन्हा जुन्या वळणावर जाईल,पण त्याला चांगल्या गोष्टीत रमवा,मंत्र म्हणा,सकारात्मक विचार करा, आजूबाजूच्या लोकांनी स्वतःच्या दुःखावर कशी मात केली?ते शिका.स्वावलंबी व्हा,स्वतःचे पैसे कमवा,आरोग्याची काळजी घ्या,म्हातारपणाची व्यवस्था करा.
आज कुणीतरी तुमच्या कमेंटला उत्तर देईल,तुम्ही किती जणांना ही गोष्ट ऐकवणार?लोक ऐकतील काहींचं मनोरंजन होईल,काही सहानुभूती देतील, पुढे तुम्हाला टाळतील कारण प्रत्येकाला आपापले ट्राॅमा आहेत!
आपण सगळे एक समजून घेऊयात की,आपल्या पालकांना पालक कसे असतात?हे शिकवणारे पालक,त्यांचे पालक ...अशा साखळीत आपण जन्माला आलेलो असतो,
त्यामुळे आपले आई-वडील आपल्याशी कसं वागले,याला व्यक्तिशः फक्त ते एकटेच जबाबदार नसून त्यांचा इतिहास त्यांचं बालपण,त्यांचं आयुष्य यासारख्या अनेक गोष्टींचा तो एकत्रित परिणाम असतो.
साधारणपणे माणसाचं अर्धं आयुष्य जगण्याचं भान येण्यात जातं,स्वतःच्या पायावर उभं रहाण्यात किंवा साधारणपणे नोकरी आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यातच अर्ध आयुष्य निघून गेलेलं असतं.
या वळणावर जेव्हा माणूस थकून जातो तेव्हा वेदनेतून मुक्त होण्यासाठी त्याला एक कारण हवं असतं ज्या कारणाला तो दोष देईल आणि त्या कारणावर सगळी जबाबदारी टाकेल.
बऱ्याचदा हे कारण आई वडील असतात, 'आई-वडिलांच्या निमित्तानं मिळालेलं दुःख' असं मुद्दाम इथे लिहिते आहे,कारण प्रत्येक माणसाला दुःख आहे आणि हे दुःख जिथून मिळतं ती कारणं प्रत्येकाची वेगळी आहेत,या जगात काही दुःखं अशी असतात ज्यांची कारणंच काही माणसांना शेवटपर्यंत सापडत नाहीत म्हणजे एखाद्या व्यक्तीला जन्मतः एखादा आजार असेल किंवा काही उणिव असेल तर तिने कोणाला दोष द्यायचा?
त्यामुळे दुःखाचं कारण माहीत असणाऱ्यांपैकी काही नशीबवान लोकांना कारण,आई-वडील आहेत,असं कळतं,एवढंच.
हे म्हणजे असं आहे की,समजा कोणी दगड फेकून मारला,तर तो ज्याने मारला त्याच्याविषयी आपण तक्रार करतो पण ज्याच्या डोक्यावर डोंगरावरून गडगडत आपोआप दगड पडला तो गपचूप चालायला लागतो,स्वतःच्या जखमेला औषध लावतो.
आपल्या आजूबाजूला स्वतःच्या जखमेला औषध लावणारी आयुष्यात पुढे जाणारी माणसं बघून सुद्धा आपण मात्र अजूनही वीस/पंचवीस/तीस वर्षांपूर्वी ज्यांनी आपल्याला जखमी केलं त्यांना दोष देत अजूनही रडत बसलो असू तर आपण आजूबाजूला बघत नाहीये आणि स्वतःचं दुःख कुरवाळत बसलो आहोत,असा याचा अर्थ होतो कारण आजूबाजूला बघितलं तर कळेल की अनेक जखमी माणसं स्वतःच औषध शोधून स्वतःला बरं करून मार्गी लागलेली आहेत.
जुनी जखम औषध न लावता तशीच ठेवणाऱ्याला दुसऱ्या शत्रूची गरजच नाही तो स्वतः स्वतःचा शत्रू आहे,जखम होणं ही एक घटना/अपघात आहे, पण ती तशीच ठेवणं,रक्त वाहू देणं हा आपला बेजबाबदारपणा आहे,
यामागे जगण्याविषयी असलेली शून्य कृतज्ञता हेच कारण आहे,जे गमावलं त्या ऐवजी जे मिळालं याकडे जर लक्ष गेलं तरच ही कृतज्ञता निर्माण होईल.
जन्मतः आई वडिल देवाघरी गेलेली,अनाथ मुलं आई-वडिलांनी टाकून दिलेली मुलं,कुमारी मातेनं नाईलाजास्तव सोडून दिलेली मुलं,गुन्हेगारांची, तुरुंगात जन्म घेणारी मुलं,शरीराची विशेष समस्या असणा-यांची,मनोरुग्ण आई-वडिलांची मुलं ज्यांना मुलं म्हणजे काय तेच माहित नाही अशा आई-वडिलांची मुलं सुद्धा स्वतःला सावरतात, हेच जगण्याचं वास्तव आहे.
निसर्गात आजूबाजूचे प्राणी बघा,आपल्या पिल्लांना मोठं करण्यासाठी निसर्गानं दिलेला रोल ते करतात आणि अक्षरशः विसरून जातात. माणूस प्राणी थोडा प्रगत आहे म्हणून त्याच्या अपेक्षा जास्त आहेत.
आई वडिलांनी जन्म दिला सुरुवातीच्या काळात आपल्याला जिवंत ठेवलं आणि आज आपण स्वतःच्या पायावर उभे आहोत,कर्तव्य संपलं विषय संपला! एवढंच अपेक्षित होतं आणि ते त्यांनी केलं,यासाठी आयुष्यभर कृतज्ञ रहायला काही हरकत नाहीये!
इथे आई-वडिलांना देव करून आपण देवाकडून करायच्या त्या अपेक्षा करायला लागतो पण सगळी माणसंच आहेत कुणी आधी जन्माला आलेली कोणी नंतर जन्माला आलेली!
स्वतःच्या आई-वडिलांकडे माणूस म्हणून बघायला सुरुवात करा,जशी जगात इतर माणसं असतात तसेच ते आहेत,आता तुम्हाला थोडसं नॉर्मल होता येईल.
काही शब्द देते आहे त्यांच्या मदतीने आयुष्य बदला.
🎯निर्णय
🎯निश्चय
🎯सकारात्मक विचार
🎯सर्वांना क्षमा
🎯आयुष्याची जबाबदारी
🎯स्वावलंबन
🎯कृतज्ञता
या मार्गावर चालून पहा,फरक पडलाच तर टाईम मॅनेजमेंट पेजला अशीच कमेंट लिहून,सकारात्मक बदल कळवा.
©कांचन दीक्षित
Kanchan Dixit Time Management Training
लेखिका,ट्रेनर(Online Courses)
1)Time Management Course
2)Reparenting &Universe Course
https://amzn.eu/d/ipSdHmL
https://kanchandixit.com/
#ऑनलाईन कोर्स
#फक्त स्त्रियांसाठी
�आठवड्यातून दोन दिवस
*ध्येय कसं ठरवावं,कसं लिहावं?
*सवयींचं मानसशास्त्र आणि कायझेन
*नाती आणि वेळेचं नियोजन,
*घर आणि करिअर बॅलन्स
*स्वयंपाक आणि स्वच्छतेचं प्लॅनिंग
...या आणि अशा अनेक विषयांचा अभ्यास करण्याची सुरुवात करायची असेल तर हा एक छान कोर्स आहे
वेळेच्या नियोजनाच्या निमित्ताने आयुष्यात बदल घडवून आणायचा असेल तर हा कोर्स करुन कौशल्य शिकून घेता येई
12/05/2026
#वर्क फ्राॅम होम
©कांचन दीक्षित
ऑनलाईन सेशनमधे वर्क फ्राॅम होम करणा-या स्त्रियांची ओढाताण कायम जाणवते.मुळात हे म्हणजे घरी बसून निवांत काम!असा कोणाला भ्रम असेल त्यांनी ही पोस्ट जरूर वाचावी.
ऑफिस काम करण्यासाठी घर ही जागा प्रत्येकासाठी अनुकूल नसते,दुसरी गोष्ट घरात ऑफिसचं वातावरण निर्माण करणं प्रत्येकाला शक्य नसतं,त्यामुळे घर आणि ऑफिस एकाच वेळी सांभाळणं म्हणजे एका वेळी दोन तलवारी हातात घेऊन लढण्यासारखं असतं,यात स्त्रिया जास्त थकून जातात,
वेळेच्या नियोजनाचं आणि कामांच्या मॅनेजमेंटचं कौशल्य नसेल तर वर्क फ्रॉम होम ही अनेक स्त्रियांसाठी एक शिक्षाच आहे.
वर्क फ्राॅम होम सुरु असतं,लहान मुलं/मोठीपण मधेमधे येतात,पण त्यातल्या त्यात लहानांना दुखावता,रागावता येत नाही,कामाचं महत्व कळण्याचं त्यांचं वय नसतं,घरात राहून घराकडे दुर्लक्ष करता येत नाही.
पुरुष फोकस करु शकतात,बायकांची चिडचिड होते, त्यांच्या मेंदूचा हायपर व्हिजलन्स आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींनी सतत ट्रिगर होत असतो,सगळेच मधेमधे येतात एकाग्र होऊन नीट काम करता येत नाही आणि कसलंच समाधान मिळत नाही.
ही समस्या शिस्तीनं सोडवता येईल असं वाटलं म्हणून ही पोस्ट,स्त्री असो वा पुरुष 'वर्क फ्राॅम होम' परिस्थितीत टिकून रहाण्यासाठी नव्यानं जीवनशैलीत बदल करावे लागतील,नवं स्ट्रक्चर तयार करावं लागेल.
🎯1)*घरात काल्पनिक ऑफिस तयार करा*
एखाद्या वेगळया खोलीची सोय असेल तर तिथे ऑफिस तयार करा नसेल तर गॅलरी,बाल्कनीत टेबल खुर्ची ठेऊन एक शिस्तबध्द ऑफिस तयार करा,भिंतीकडे तोंड राहील आणि मनानं घर दिसणार नाही अशी व्यवस्था करा,तिथेच बसून काम करा,कधी सोफ्यावर कधी डायनिंग टेबलवर असं फिरु नका.कामाचं वातावरण तयार करा.
घर अगदीच लहान असेल तर एखादा कोपरा निवडा,पडदा लावून,कपाटांची रचना बदलून भिंत तयार करता येते का पहा.वर्कस्टेशन तयार करा.
🎯2) एक पाटी/ कागद/फळा तयार करा,त्यावर ऑफिसच्या वेळा लिहा.
दर तासानं किंवा दोन तासानं ब्रेक घ्या त्या पाच दहा मिनिटात बाहेर येण्याचं वेळापत्रक लिहून काढा आणि पाळा. मुलांना शिस्त खूप चांगली समजते कारण त्यांच्यामधे लबाडी नसते,समजा आई/ बाबा 10 ला कामाला सुरुवात करतात आणि 11 ला ब्रेक होतो हे कळलं तर ते वाट पहातात पण शिस्तच नसेल तर कन्फ्युज होतात आणि बोलणी खातात.
ऑनलाईन कामात कितीही अनिश्चितता असली तरी आपण बाहेर ऑफिसला जातो तसं समजून आधी स्वतः वेळा पाळा.
🎯3) दोघं नवरा बायको घरी वर्किंग असतील तर एकत्र बसून दोघांचं एकत्र प्लॅनर तयार करा त्यावर कामाच्या नोंदी लिहा,उदा. सोमवारी मिटिंग busy,गुरुवारी फ्री आहे...याप्रमाणे,यानं कामं अडजस्ट करता येतील.दोघांनी वेळापत्रक तयार करा.
बेल वाजणे,स्वयंपाक ई.कामाची वाटणी करा,रुटीन तयार करा.
मुलांना संभाळायचं प्लॅनिंग करा,त्यांना गुंतवून ठेवता येईल असे खेळ,वर्कशिटस् सुट्टीच्या दिवशी शोधून ठेवा आपण कामाला बसलो की ते उगाच टिव्ही फोन बघत न बसता आपल्यासारखंच काहीतरी productive करतील असं त्यांना द्या.अलार्म किंवा वेळा ठरवून आता मी एक तास काम करतोय/ करतेय असं आधी सांगा,संपल्यावर थोडा वेळ त्यांना जरुर द्या,तासभर डिस्टर्ब न केल्याचं कौतुक जरुर करा.
काही महत्वाचं बोलायचं असेल तर चिठ्ठी लिहायला शिकवा,हळूहळू मुलं सहकार्य करु लागतील.
संध्याकाळी किंवा काम संपल्यावर मात्र फॅमिली टाईम पाळा,आता ही शिस्त कामाला लावा,प्लॅन करा,नियम तयार करा.
🎯4)घरीच आहोत,मधेच कंटाळा आला तर काहीतरी खायला उठणं,फ्रेश होण्यासाठी ईतरांना डिस्टर्ब करत गप्पा मारणं,टिव्ही पहाणं असे ब्रेक घेऊ नका,ऑफिसमधे असतो तर हे केलं असतं का? असं समजून शिस्त कायम ठेवा,सवयी बिघडवू नका.
चहा,पाणी,खाण्याच्या वेळा कागदावर लिहा आणि तसेच ब्रेक घ्या.
थोडक्यात वर्क फ्राॅम होम जीवनशैलीत इतरांकडून शिस्तीची अपेक्षा करु नका,स्वतः पाळा,बाकीचे आपोआप अडजस्ट होतील आणि एक सिस्टिम तयार होईल,सगळयांना सोयीचं असं एक चांगलं वातावरण घरात तयार होईल.
©कांचन दीक्षित
https://whatsapp.com/channel/0029Vb82WMmBlHphJWHAIC11
#क्षमासाधना होओपोनोपोनो
(सर्वांसाठी वयोगट 18 ते 55)
*कोर्स Online Zoom वर असेल.*
#अभ्यास
क्षमा करणं म्हणजे काय?
क्षमा साधना कसे सुरु करावी?
होओपोनोपोनो समजून घेऊया.
#प्रेग्नन्सी असेल तर प्रवेश नाही.
ट्रेनर कोच असाल तर प्रवेश नाही.
#मे2026
#शनिरविबॅच
16,17
एकूण 2 सेशन्स
4 तास प्रशिक्षण
*Morning*
🎯वेळ:10:00 am To 12:15 pm
(15 मिनिटांचा ब्रेक असेल)
फी: 2,000 रु.
https://wa.me/919689124376
©कांचन दीक्षित
https://whatsapp.com/channel/0029Vb82WMmBlHphJWHAIC11
#खूप पसारा झालाय!
फ्रीज भरुन वहातोय!
कपाटाचं दार उघडलं की कपडे बाहेर कोसळताहेत!
घर आवरायला झालंय!
..
अधून मधून असे विचार मनात येत असतील आणि बॅटमिंटनच्या शटलसारखे दिवसातून सतरा वेळा ते लांब फेकण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे.
Organisation,Declutter असं सर्च करत तुम्ही व्हिडिओज बघत बसता का?
तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे.
आवराआवर स्वच्छता यावर कोर्समधे एक सेशन आहे पण तरीही कुठून सुरुवात करायची? यावर अनेकांची गाडी थांबलेली असते.
सणवार,घर शिफ्टिंग,रंगकाम,घरातली कार्यं...इ. अनेक कारणांनी आपण घर आवरत असतो.
सुरुवात कुठून कशी करायची?
तर,
*आधी नविन आणणं बंद करा* हा मंत्र देतेय.
उदा. फ्रीज आवरायचाय तर भाज्या चार दिवस आणायच्या नाहीत,आहे त्याच भाज्या संपवायच्या,शेवटी टाॅमेटो बटाटे भाजी,उसळी सुध्दा खाता येतील,यानं निम्मं काम आपोआप कमी होतं.
नविन आणणं बंद केल्यानं पसारा कंट्रोलमधे येतो.
घरात नविन पुस्तकं खूप झाली आहेत वाचणंच होत नाहीये,पडून आहेत असं वाटत असेल तर नियम तोच एकच,
एक मुदत ठरवा की तीन महिने मी नविन पुस्तकं आणणार नाही आणि आणली किंवा मिळाली तरी वेगळा बाॅक्स करुन त्यात ठेवेन,तशी साठवेन पण समोर मांडून ठेवणार नाही,स्ट्रेस वाढवणार नाही.
खेळणी,सजावटीच्या वस्तू,चप्पल,बूट ...अनेक गोष्टी आपण खरेदी करत सुटतो,बाहेर पडलं की काहीतरी घेऊनच घरात येतो,ऑनलाईन शाॅपिंगनं तर मोह टाळायचा मार्जिन टाईम सुध्दा मिळत नाही.
थोडक्यात ज्याचा पसारा झालाय तो आवरण्याआधी नविन आणणं थोपवा,घरात नळाचं पाणी वाहून फरशीवर साठलं असेल तर सगळ्यात आधी वाहता नळ शोधून तो बंद करतो तसं!
©कांचन दीक्षित
#वयोगट 18 ते 55 फक्त
#टाईममॅनेजमेंटकोर्स
टाईम मॅनेजमेंट कोर्स एका वयोगटासाठी आहे आणि जाहिरातीत वारंवार स्पष्ट लिहून सुद्धा विचारणा करण्यात येते किंवा कमेंट्स येतात.
आज एकदाच या विषयावर लिहायचं ठरवलं आहे आणि पुन्हा कुणीही प्रश्न विचारल्यास पुढे टाईप केलेलं कॉपी-पेस्ट करून पाठवेन पण चर्चा वाढवणार नाही.फक्त फी मिळू देत बाकी कोणी का येईना असा हा व्यवसाय नाही, माझं काम आणि माझा कोर्स हा मी संपुर्ण श्रद्धेने आणि अंतस्थ प्रेरणेला साक्षी मानून करते आहे.
माझ्याकडे या प्रश्नाचं याहून सविस्तर उत्तर नाही की टाईम मॅनेजमेंट कोर्स 55 पुढील स्त्रियांसाठी का नाही?
आज आलेली कमेंट.
कांचन ताई नमस्कार मला एक प्रश्न आहे आपण आपल्या कोर्सच्या मैत्रिणीसाठी वयाची अट 55 ठेवली आहे हे का तुम्हाला असं वाटत नाही का साठीच्या मैत्रिणी सुद्धा हे सगळ्या शिकवण्यासाठी उत्सुक असतात तेव्हा कृपया आपली वयाची अट बदलावी अशी माझी विनंती आहे.
या पेजवर आणि माझ्या कोर्स वर असंख्य वाचकांनी स्त्रियांनी प्रेम केलेलं आहे,करत आहेत,
फक्त या प्रेमामुळेच "माझी मर्जी!" असं उत्तर देत नाहीये,समजून घेत नातं टिकवण्याचा प्रयत्न करते आहे आणि समजून घ्यावं अशी अपेक्षा करते आहे.
हा प्रश्न विचारण्यामागे खरंच चांगली भावना,हेतू असेल.हे ही मान्य आहे.
माझं उत्तर हे आहे की,
मी एक शिक्षिका होते आणि आजही आहे एखादा विषय शिकवताना आपल्याला वयोगट ठरवावा लागतो पाचवीच्या शिक्षिका दहावीच्या मुलांना गणित शिकवू शकत नाही का?तर कदाचित "हो" पण एकाच वर्गात पाचवी आणि दहावी एकत्र बसवून गणित शिकवता येत नाही.
प्रत्येकाची एका विशिष्ट पद्धतीनं एका वयोगटाशी संवाद साधण्याची एक भाषा असते,एक शैली असते,
यात विस्तार करण्याच्या पण काही मर्यादा असतात.
पिढी बदलली की प्रत्येक पिढीची भाषा बदलते त्यांच्या विचारशैलीत फरक पडतो,आजच्या काळात 'एज इज जस्ट अ नंबर' ही ही संकल्पना मलाही मान्य आहे,शिकण्याला मर्यादा नाही माझ्या शिकवण्याला मर्यादा आहे,हे अतिशय नम्रतेनं मी सांगते आहे.
असा प्रश्न असणा-यांनी ऑनलाइन कोर्स पलिकडे जाऊन थोडीशी माहिती घेतली,तर लक्षात येईल की,
वेबसाईटवर माझे याच विषयावर 2 व्हिडिओ विक्रीसाठी उपलब्ध आहेत,नुकतंच एका 60 ते 65 वयोगटातल्या एका आईने,मुलीच्या मदतीने ते दोन्ही व्हिडिओ खरेदी केले आणि त्यांना ते आवडले असं त्यांनी मला कळवलं,
यातल्या बऱ्याच गोष्टी त्या आधीपासूनच करत आहेत हे ऐकल्यावर,मला ते माहीतच होतं.
ही माझी मर्यादा आहे,त्यांची नाही,
शिकण्याला वय नसतं पण त्यांच्यासाठी मी एकच पर्याय नाही,
इतरही कोर्सेस आहेत,युट्युब व्हिडिओ आहेत,पुस्तकं आहेत.
चक्क माझं पुस्तकही आहे!ॲमेझॉन वर सहज त्या खरेदी करू शकतात आणि वाचून काही बदल करु शकतात.
याच वर्षी माझा पन्नासावा वाढदिवस असेल,
माझ्यापेक्षा पाच दहा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या स्त्रियांकडून मलाच खूप काही शिकायचं आहे आणि मी शिकते ही आहे.
उलटी गंगा वाहू शकत नाही🙏
ज्यांच्याकडून आशिर्वाद घ्यायचे,अनुभवाचे धडे घ्यायचे त्यांच्याकडून फी घेऊन उलट त्यांनाच शिकवण्याचा आगाऊपणा करावा असं,मला तरी वाटत नाही,
रियली सॉरी,मला फार संकोच वाटतो, त्या शिकायला तयार असल्या तरी!!!
55+ सगळया वयानं मोठ्या असतात,त्यांना मी काय शिकवणार!
कसं दिसेल माझ्या आत्या,काकू,मावशीच्या वयाच्या बायकांना मी स्वयंपाक आणि संसाराच्या गोष्टी शिकवताना?
बरं दिसत नाही.
त्यांच्या आयुष्याच्या या वळणावर आणि वयाच्या या टप्प्यावर,
त्यांना मी घर कसं आवरायचं?
वेळेवर डबा कसा करायचा?
किचन कसं लावायचं हे शिकवू?
©कांचन दीक्षित
जगण्याच्या धावपळीत सगळंच वेचणं शक्य नसतं पण म्हणून आपण स्त्री म्हणून उण्या आहोत हे आतल्या आत वाटत रहाणं हेल्दी नक्कीच नसतं,गिटार वाजवता येत नाही म्हणून आपल्याला लाज वाटते का?वेळ पडली तर आपण शिकू शकतो,
तसं नाही येत पॅरेंटिग!नाही येत घराचं व्यवस्थापन!असं मान्य करुन शिकायला काय हरकत आहे?
गिल्ट आणि शेम या वृत्ती फक्त थांबवतात जड करतात,पुढे जाऊ देत नाहीत,काही गोष्टी शिकायच्या राहून गेल्या यानं आपलं मूल्य संपत नाही ही सुरुवात करणं,स्वतःला स्विकारणं आणि वाटेतला दगड दूर करणं मला महत्वाचं वाटतं.
©कांचन दीक्षित
सेशन
#स्वतःची काळजी कशी घ्यायची?
#मे 2026
#सुट्टीविशेष
सर्व स्त्रियांना स्वतःवर प्रेम करायला शिकवणारं एक सेशन घेते आहे.
वयोगटांनुसार तीन बॅचेस असतील.
अगदी प्रत्येकीसाठी ✅️
🌸नातं स्वतःशी:जवाबदारी
🌸रोल माॅडल.
🌸एनर्जी आणि वेळ नियोजन.
🌸कृतज्ञतेचा सराव कसा करावा?
थोडक्यात
स्वतःची काळजी कशी घ्यावी?
आणि
जगण्याकडे सकारात्मकतेनं कसं पहावं?
https://wa.me/919689124376
➡️(विशेष सूचना: हे सर्व टाईम मॅनेजमेंट कोर्समधे शिकवलेलं आहे,पुन्हा उजळणी करायची असेल तर स्वागत)
✅️सेशन ऑनलाईन Zoom वर असेल.
✅️कॅमेरा ऑन ठेवून सेशनला हजर रहावे लागेल.
🙏️व्हाट्सअप ग्रुप डिलीट केला जाईल नंतर कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जाणार नाही.पर्सनल कौन्सलिंग नसेल.वयाची अट नाही.
🎯 मंगळवार,बुधवार बॅच
*सकाळी*
🎯10:00 am To 12:00 pm
1️⃣ बॅच मे 12,13
(वयोगट 20 ते 30)
2️⃣ बॅच मे 19,20
(वयोगट 30 ते 40)
3️⃣ बॅच मे 26,27
वयोगट 40 ते 50/55
🎯फी 1500 रु.
https://wa.me/919689124376
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Website
Address
Pune