26/07/2026
डॉ मधुसूदन झंवर आणि डॉ सतीश देसाई,
आपणां दोघांचे हार्दीक अभिनंदन.
🌹☘️🍁🍀🌹
श्रीरंग इनामदार.
Nav Maharashtra Sangh and Kho-Kho are synonymous with each other. The association of Kho-Kho and Nav He took immense efforts in building his team. Late Shri.
Nutan Marathi Vidyalaya(NMV) was a highly acclaimed school in the Mumbai Region before Maharashtra was declared an Independent State. Late Shri Shankarrao Patankar Sir, a geography teacher from NMV handpicked a few students and imbibed into them the love and intricacies of Kho-Kho. His love and dedication for the game made him a face to reckon with in the Kho-Kho arena. Shankarrao Patankar Sir’s t
26/07/2026
डॉ मधुसूदन झंवर आणि डॉ सतीश देसाई,
आपणां दोघांचे हार्दीक अभिनंदन.
🌹☘️🍁🍀🌹
श्रीरंग इनामदार.
21/12/2025
61 व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो खो स्पर्धा-2025 बीड या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याच्या पुरुष संघाने राज्य अजिंक्यपद मिळवले तर पुणे जिल्ह्याच्या महिला संघाने उपविजेतेपद पटकाविले. दोन्ही संघातील सर्व खेळाडू, तसेच पुणे जिल्हा निवड समितीचे सदस्य तसेच प्रशिक्षक सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉
या पुणे जिल्हा खो खो संघात आपल्या संघाचे १० खेळाडू होते. सुयश गरगटे ह्याने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ आक्रमक खेळाडूचे पारितोषिक मिळवले.
या संघाचे मार्गदर्शक आपल्या संस्थेचे श्री शिरीन गोडबोले तर व्यस्थापक श्री महेश ऐनापुरे
सर्व खेळाडूंचे हार्दीक अभिनंदन.
श्रीरंग इनामदार.
29/10/2025
दि २२. १०. २०२५ बुधवार, रोजी आपल्या नव महाराष्ट्र संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे दीपावली पाडव्याच्या निमित्त क्रिडांगण पूजा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेचे कोषध्यक्ष, पुणे जिल्ह्याचे आणि पुणे विद्यापीठाचे खो खो खेळाडू श्री अरुण बोडस ह्यांचे हस्ते पूजा करण्यात आली.
संस्थेचे कार्यवाह श्रीरंग इनामदार ह्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन आगामी स्पर्धासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष
श्री अरविंद पटवर्धन ह्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीरंग इनामदार ह्यांनी आभार मानले.
या प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ खेळाडू, सभासद, नवोदित खेळाडू आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीरंग इनामदार
10/10/2025
विजयादशमीच्या निमित्ताने आपल्या संस्थेच्या क्रिडांगणाची पूजा आपले राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्राचे कर्णधार, एकलव्य पारितोषिक विजेते, श्री शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित श्री अभय जोशी ह्यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी खेळाडू, सदस्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यवाह श्रीरंग इनामदार ह्यांनी संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेऊन संपूर्ण वर्षासाठीचा स्पर्धा कार्यक्रमाची माहिती सांगितली. श्री अभय जोशी, सचिन गोडबोले, डॉ सतीश देसाई संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद पटवर्धन ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आगामी स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. श्रीरंग इनामदार ह्यांनी सर्वांचे आभार मानले.
श्रीरंग इनामदार
04/06/2025
Shri Shridhar Joshi,
Heartiest congratulations for your grand achivements. We are proud of you!
रासायनिक उद्योग क्षेत्रात काम करताना पर्यवारणासारख्या ज्वलंत प्रश्नाचा सखोल विचार करून त्याचा तोल सांभाळण्यासाठी विशेष कार्य आपण करता आहात याबद्दल आपले विशेष अभिनंदन.
श्रीधर जोशी हे आपल्या संस्थेचे राष्ट्रीय खो खो खेळाडू आहेत.
🌹☘️🍁🍀🌹
श्रीरंग इनामदार.
04/05/2025
ठाणे येथे दि १ ते ४ मे, २०२५ या कालावधीत झालेल्या विहंग क्रीडा मंडळाच्या राज्य खो खो स्पर्धेत आपल्या संस्थेने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात विहंग क्रीडा मंडळ, ठाणे संघाचा १६ - १३ ( ८-७ ) अशा ३ गुणांनी पराभव केला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडूचे पारितोषिक आपल्या संस्थेच्या राहुल मंडळ ह्याला तर रुद्र थोपटे ह्याला सर्वोत्कृष्ठ आक्रमक खेळाडूचे पारितोषिक मिळाले.
सर्व खेळाडू, मार्गदर्शक आणि व्यवस्थापक ह्यांचे हार्दीक अभिनंदन.
👍👍👌👌✌️✌️
श्रीरंग इनामदार.
09/02/2025
दि २६ जानेवारी २०२५ रोजी
नव महाराष्ट्र संघाच्या ६६ व्या स्थापनादिनानिमित्त आपल्या क्रिडांगणावर आयोजित केलेल्या पुजा समारंभास संस्थेचे ज्येष्ठ - श्रेष्ठ सदस्य, सर्व खेळाडू, त्यांचे पालक, हीतचिंतक उपस्थित होते.
क्रिडांगणाची पूजा संस्थेचा माजी राष्ट्रीय खो-खो खेळाडू,
वीर अभिमन्यू परितोषिक विजेता, दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या पहिल्या विश्वचषक
खो-खो स्पर्धेत ज्याने ऑस्ट्रेलीयचा संघ उभा करून सहभाग घेतला अशा श्री. राजेंद्र सुरा ह्याचे हस्ते करण्यात आली. श्री सुरा ह्याने या स्पर्धेत सर्वात ज्येष्ठ सहभागी खेळाडूचा विक्रम प्रस्थापित केला. श्री सुरा हे ५८ व्या वर्षी या स्पर्धेत खेळाडू म्हणून सहभागी झाले होते. त्यांनी आपल्याच संस्थेच्या गुरुवर्य कै शंकरराव पाटणकर ह्यांचा विक्रम मोडला. गुरुवर्य पाटणकर हे वयाच्या ४२ वर्षापर्यंत स्पर्धात्मक खो खो खेळले. श्री सुरा हे ऑस्ट्रेलिया
खो-खो फेडेरेशनचे खजिनदार आहेत.
संस्थेचे प्रमुख सचिव श्रीरंग इनामदार ह्यांनी वर्षभरातील संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत विश्वविजयी भारतीय संघाचे आपल्या संघाच्या सर्वश्री प्रतीक वाईकर (कर्णधार), सुयश गरगटे, आदित्य गणपुले, पुरुष संघाचे मार्गदर्शक शिरीन गोडबोले,
तांत्रिक तज्ञ् सचिन गोडबोले ह्यांनी प्रतिनिधित्व केले तर श्री राजेंद्र सुरा आणि सुबोध बापट ह्यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले. ह्या सर्वांचा गुरुवर्य श्री सुरेश दिनकर ह्यांचे हस्ते कौतुकपर सत्कार करण्यात आला. या पहिल्या विश्व चषक खो-खो स्पर्धेत खेळाडू, मार्गदर्शक आणि संघटनात्मक क्षेत्रात आपल्या संस्थेच्या सर्वात जास्त सदस्यांनी प्रतिनिधित्व केले याचा अभिमान वाटतो.
सर्वश्री प्रतीक, सुयश, आदित्य आणि राहुल मंडळ हे उत्तराखंड येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना झाल्यामुळे या समारंभास उपस्थित नव्हते. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचा ध्वज धारक म्हणून श्री प्रतीक वाईकर ह्यास मान मिळाला आहे.
वरील सर्वांचा आपल्या क्रिडांगणावर येणाऱ्या पालकांच्या वतीने देखील संस्थेचे एक संस्थापक सदस्य श्री चंद्रकांत कवठेकर ह्यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वरील सत्कारार्थिंशिवाय गुरुवर्य सुरेश दिनकर, श्री नरहरी जोग आणि श्री श्रीरंग इनामदार ह्यांचा या प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद पटवर्धन हे परदेशी गेले असून त्यांनी तेथून आपले मनोगत या प्रसंगी पाठविले, ते श्री श्रीरंग इनामदार ह्यांनी उपास्थीतांना वाचून दाखविले.
पालक सौ कस्तुरी आणि
श्री श्रीप्रसाद आपटे ह्यांनी या प्रसंगी मिठाई वाटून संस्थेचे कौतुक केले.
उपस्थितांचे आणि वर्षभर संस्थेला विविध मार्गांनी मदत करणाऱ्या सर्व पालकांचे, देणगीदारांचे, अशा सर्वांचे श्री श्रीरंग इनामदार ह्यांनी आभार मानले. त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला. सोबत कार्यक्रमाची क्षणचित्रे पाठवीत आहे.
श्रीरंग इनामदार.
20/01/2025
दि १३-१९ जाने.२०२५ या कालावधीत नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या पहिल्या विश्व चषक
खो-खो स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी विजेतेपद मिळाविले त्याबद्दल सर्व खेळाडू, मार्गदर्शक, व्यस्थापक आणि सपोर्ट स्टाफ चे अभिनंदन.
ह्या स्पर्धेत आपल्या नव महाराष्ट्र संघाच्या सर्वश्री प्रतीक वाईकर (कर्णधार ), सुयश गरगटे आणि आदित्य गणपुले ह्यांनी विजयी भारतीय पुरुष संघाचे प्रतिनिधित्व केले तर श्री शिरीन गोडबोले हे या संघाचे मार्गदर्शक होते. श्री सचिन गोडबोले ह्यांची स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.
या स्पर्धेत प्रतीक वाईकर आणि आदित्य गणपुले ह्यांनी दि १३ आणि दि १४ जाने, २०२५ रोजी झालेल्या सामन्यात सर्वोत्कृष्ठ खेळाडूचे पारितोषिक मिळविले तर कर्णधार प्रतीक वाईकर ह्याने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू आणि श्री सुयश गरगटे ह्याने सर्वोत्कृष्ठ आक्रमक खेळाडूचे पारितोषिक मिळाविले.
आपल्या संघाच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत सर्व स्तरांवर सर्वात जास्त प्रतिनिधित्व मिळवून आपले खो खो तील श्रेष्ठत्व सिद्ध केले.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
🌹☘️🍁🍀🌹
श्रीरंग इनामदार.
11/11/2024
आपल्या संघाचा राष्ट्रीय खो खो खेळाडू, भारतीय वायुदलातील निवृत्त अधिकारी अजित सप्रे ह्याचे आज सकाळी बॅडमिंगटन खेळतांना बाणेर येथे हृदयवीकराच्या अतितीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
स्व अजितने महाराष्ट्राच्या विजयी किशोर संघाचे बांगलूरू येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते.
एक हुशार आणि अभ्यासू खेळाडू, वायुदल अधिकारी म्हणून आजित प्रसिद्ध होता.
कै अजितच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, त्याच्या आत्म्यास चिरशांती आणि सदगती प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
अंतिम संस्कार बुधवार दि १३ रोजी कै अजितचा मुलगा अमेरिकेहून पुण्यात आल्यावर करण्यात येणार आहेत. त्याचा तपशील मागाहून कळविण्यात येईल.
भावपूर्ण श्रद्धांजली!
🙏🙏🙏
श्रीरंग इनामदार.
04/11/2024
दरवर्षीप्रमाणे दीपावलीच्या उत्सवात शनिवार दि ०२.११.२०२४ रोजी पाडव्याचे दिवशी सायंकाळी ७.०० वाजता आपल्या क्रिडांगणाची ( स प महाविद्यालय खो खो क्रिडांगण) पूजा आयोजित केली होती. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य, कार्यकारी समितीचे सदस्य डॉ गिरीश धडफळे आणि संस्थेचा राष्ट्रीय आणि विद्यापिठीय खेळाडू श्री आशुतोष नाडगौडा ह्यांचे हस्ते पूजा करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे सभासद खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची काही क्षणचित्रे सोबत पाठवित आहे.
सर्वाना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा.
🌹☘️🍁🍀🌹
श्रीरंग इनामदार