मराठमोळा आर्चरीपटू
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज
साहिल जाधव, सातारा मधीलजागतिक पदक विजेता आर्चरीपटू जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कसून सराव करीत आहे
आर्चरी कम्पाउंड प्रकारात साहिल जाधव भारतासाठी प्रथमच आशियाई स्पर्धेत खेळणार आहे.
साहिल जाधव हा पदकाचा दावेदार असून एकेरीसह सांघिक प्रकारात तो सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज झाला आहे.
Sports Maharashtra
Sport & Youth Welfare Department,Maharastra
22/08/2026
मनःपूर्वक अभिनंदन
अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार
महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त मानकरी :
बुद्धिबळपटू दिव्या देशमुख - अर्जुन पुरस्कार
बुद्धिबळपटू विदित गुजराती - अर्जुन पुरस्कार
नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण - द्रोणाचार्य पुरस्कार
आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे - राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार
महाराष्ट्रातील मानकऱ्यांसह सर्व पुरस्कारविजेत्या क्रीडापटूंचे मनःपूर्वक अभिनंदन !
16/08/2026
शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अत्याधुनिक जिमचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे हस्ते उद्घाटन
शिवछत्रपती संकुलात मिशन लक्ष्यवेध या योजनेंतर्गत सात क्रीडा प्रकारांचे हाथ परफॉर्मन्स सेंटर कार्यान्वित केलेले असून याच ठिकाणी राज्य शासनाची क्रीडा प्रबोधिनी व केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेंतर्गत स्टेट एक्सलन्स सेंटर देखील कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी या सर्व खेळाडूंना दैनंदिन सरावाकरीता अत्याधुनिक जिमची आवश्यकता होती. सदर आवश्यकता लक्षात घेऊन या जिमचे नुतनीकरण करण्यात आलेले आहे.
आधुनिक फिटनेस सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री मा.ना. श्रीमती सुनेत्राताई पवार,
यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा आयुक्त दीपक सिंगला, सहसं सुधीर मोरे, उपसंचालक, संजय सबनीस, उपसंचालक माणिक पाटील, क्रीडा अधिकारी चनबस स्वामी, क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
13/08/2026
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव
१५ जानेवारी १९२५ - १४ ऑगस्ट १९८४
05/08/2026
after Day 6 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ चा सहावा दिवस नाशिकच्या दिलीप गावितने गाजवला.. पॅरा धावपटू दिलीपने टी ४७ च्या १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आणि पदकतालिकेत भारताला आगेकूच करण्यास मदत केली.
पुन्हा एकदा महाराष्ट्र शालेय क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा स्थळाची निश्चिती
09/07/2026
दिल्लीत महाराष्ट्राचा डंका, शालेय स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक*
भारतीय शालेय स्पर्धा महासंघाच्या शालेय क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाची हॅटट्रिकचा पराक्रम महाराष्ट्राने केला आहे
दिल्लीत संपन्न झालेल्या भारतीय शालेय स्पर्धा महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्राला विजेतेपदाच्या करंडकाने गौरविण्यात आले. शालेय खेळ महासंघाचे अध्यक्ष दिपक कुमार यांच्या हस्ते उपसंचालक संजय सबनीस, उपसंचालक उदय जोशी, सहाय्यक संचालक चंद्रशेखर साखरे व क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी राज्याचा वतीने विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. याप्रसंगी देशभरातील राज्य प्रतिनिधी उपस्थित होते. याबरोबरच महाराष्ट्र राज्याने शालेय आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या निवड चाचणीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ही राज्याचा गौरव करण्यात आला
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Address
Directorate Of Sports And Youth Services State, Shiv Chhatrapati Sports Complex, Mahalunge Balewadi
Pune
411045