21/09/2026
🥊 #पुणे_फेस्टिवल_बॉक्सिंग_स्पर्धा_उत्साहात_संपन्न
पुणे फेस्टिवल २०२६ अंतर्गत क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र, जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मुलींच्या गटात काव्या जाधव हिने तर मुलांच्या गटात विप्लव मिश्रा याने बेस्ट बॉक्सर हा मानाचा पुरस्कार फटकावला.
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व पुणे शहर ॲमेच्युअर बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे फेस्टिवल जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा २०२६ रविवार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे उत्साहात पार पडली.
या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर येथील तब्बल ३१७ बॉक्सरनी विविध वजन व वयोगटांमध्ये सहभाग नोंदविला. अतिशय चुरशीने झालेल्या सर्व लढतींना खेळाडू, पालक, प्रशिक्षक तसेच क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते व सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. मनोज भोरे आणि पुणे फेस्टिवलचे समन्वयक श्री. प्रसन्न गोखले, ॲड. राजश्री खैरे व ॲड. अंबादास बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा पुणे शहर ॲमेच्युअर बॉक्सिंग असोसिएशनचे आजीव अध्यक्ष श्री. रमेशदादा बागवे यांच्या शुभहस्ते पार पडला.
याप्रसंगी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव श्री. भरतकुमार व्हावळ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. विजय यादव, श्री. सलमान शेख व श्री. रेनॉल्ड जोसेफ, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष श्री सुरेशकुमार गायकवाड, श्री. अशोक मेमजादे,
पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव श्री. अभिमन्यू सूर्यवंशी, पिंपरी-चिंचवड बॉक्सिंग संघटनेचे सचिव श्री. मनोज यादव, तसेच पुणे शहर ॲमेच्युअर बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव श्री. विजय गुजर प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष श्री. जीवनलाल निंदाने, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील, श्री. असिफ रु. शेख, श्री. प्रदीप वाघे, श्री. कुणाल पालकर, श्री आसिफ अ. शेख, श्री. रवी गायकवाड, सौ, चेतना वारे, सौ. स्नेहल पवार, श्री. केतन जामदार, श्री. अमोल धनावडे, श्री. रुपेश दसगुडे, श्री राकेश भानू, सनी लोखंडे ,यांच्यासह सर्व रिंग ऑफिशियल्स व के. एल. व्ही. एस. पी. क्लबचे स्वयंसेवक यांनी मोलाची कामगिरी बजावली.
*विशेष पुरस्कार:-*
▪️बेस्ट बॉक्सर – मुली: काव्या जाधव – KLVSP Boxing Club
▪️ बेस्ट बॉक्सर – मुले: विप्लव मिश्रा – Ex-Services Club
▪️ बेस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर – मुली: अनुष्का राय – AK Boxing Academy, वाकड
▪️ बेस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर – मुले: सक्षम कदम – महाराणा वॉरियर्स
▪️ बेस्ट चॅलेंजर – मुली: वैष्णवी घुले – वीरा मल्टी स्पोर्ट्स अकॅडमी, वडकी
▪️बेस्ट चॅलेंजर – मुले:
ओम पाटील – Maval Boxing Club