ShivarGani

ShivarGani

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ShivarGani, Sports, pune, Pune.

"गावगाड्यातला प्रत्येक माणुस हा चालतं बोलतं विद्यापीठच!"
"जिव्हाळा अन् आपुलकीनं भरलेल्या आपल्या माणसांना अन् त्यांच्या भावविश्वाला खर्‍या अर्थाने रेखाटावं हा खरा अट्टहास!"🌱

29/01/2026

शेतातली सेंद्रिय केळी!🌱

25/01/2026

🩷

01/01/2025

आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं... माझं चुकलं म्हणून हसत माघारी फिरण्यात मोठा आनंद वाटतो! कुणाशी वाद घालण्यात आता मजाच उरली नाही! पहिल्यासारखे आता भले हरले तरी चालेल पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासन तास चर्चा करण्यात मजा वाटत नाही!
आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा दोन पावलं मागे घेण्यात शहाणपणा वाटतो!
लोक आपल्याला चुकीचं समजतील याचे काहीच वाटत नाही!
चुक किंवा बरोबरच्या पलीकडे पण एक जग असतं तिथे फक्त शांतता असते!
अगोदर जग खूप वेगाने धावत आहे,वेगाने दुनिया पुढे चालली आहे,आपण या सगळ्यात मागे राहू याचं टेन्शन यायचं!
पण आता सावकाश चालणं योग्य वाटतं... कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येते!
आता पुढे चालणाऱ्या ला वाट करून द्यायची!
आपण कडेच्या साईड पट्टीवर निवांत चालत राहायचं!
वाटेत सुख मिळेल दुःख मिळेल... हसायचं रडायचं आणि चालत राहायचं!🌱
#2025

नववर्षाभिनंदन!😊

28/09/2024

बकाल झालेलं पुणे.

स्मार्ट सीटीच स्वप्न दाखवत पुण्याला कधी दुर्दैवाच्या दशावताराच्या खाईत लोटल हे पुणेकरांना कळलं सुद्धा नाही. काल मुसळधार पाऊस पडला. काही कामानिमित्त पिंपरीला जायचं होत. चारच्या सुमारास बोपोडीच्या अलीकडे पोहचलो. खडकी रेल्वे स्टेशन ते बोपोडी हा अर्धा पाऊण किलोमीटरचा प्रवास करायला तब्बल पावणे तीन तास लागले. आता तिकडे जावून उपयोग नव्हता. म्हणून तसच सिग्नल ला डावी कडे वळलो अन औंध मार्गे घरी येऊ म्हणल.

तर औंध भाग इतका जॅम की दिड तास एकाच जागी. कसरत करत गणेशखिंड रोडला एक तासने पोहचलो. गणेशखिंड पासुन कोर्ट पर्यंत यायला दिड तास लागला. फारतर २० किलोमीटरचा प्रवास. पण तब्बल साडेसहा तास लागले.

खरच विचार करण्याची वेळ आलीये. हा सगळा भार शहराला सोसतोय का ? का केवळ मोजक्या लोकांच्या राजकीय महत्वकांक्षा शहराचा बळी घेतोय. त्यांना हवे ते लोकांच्या माथी मारल जातंय का ?

एस्कॉर्ट घेऊन बोंबलत फिरणाऱ्या लोकांना ह्या वेदना समजणार नाही. ह्या सहा सात तासात कित्येक लोकांची महत्त्वाची काम असतील. काहींना मेडिकल इमर्जन्सी असेल. कित्येक श्वास घुसमटले असतील ह्याच सोयरसुतक कोणाला नसते.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली बकाल झालेल्या पुण्यात सामान्य पुणेकरांना दुर्दैवाचे दशावतार ह्याची देही ह्याची डोळा पाहुन भोगण्या पलीकडे काही पर्याय नाही.

आलिया भोगासी. भोगा.


#पुणे #पुणेमनपा #पुणेशहर
#पुणेकर #पुणेट्रॅफिक

16/08/2024
09/08/2024

"गावगाड्यातली अस्सल कला!"

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune
Pune