Sunandan Lele

Sunandan Lele

Share

Freelance Sports Journalist and loving it...

01/09/2026

फरक खूप मोठा आहे

आशिया खंडातील क्रिकेट संघांवर नजर टाकली तर प्रत्येक संघाला काही ना काही समस्या भेडसावत आहेत. भारताला गोलंदाजांचे समर्थ पर्याय दिसत नसल्याची चिंता आहे तर बांगलादेशला सातत्यपूर्ण खेळाची. अफगाणिस्तान फक्त टी२० आणि एक दिवसीय सामन्यात ठसा उमटवत आहे तर श्रीलंकेचा एकमेव आशेचा किरण सोनल दिनुशा ठरतो आहे. सर्वात कठीण परिस्थिती पाकिस्तान संघाची झाल आहे. २ कसोटी गमावल्यावर संघातील ७ खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजीचा प्रशिक्षक दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. आणि आता निवड समितीचा सदस्य मिसबाह उल हकने आपल्याशी काहीही सल्लामसलत न करता संघात बदल केले गेले म्हणून राजीनामा दिला आहे.

27/08/2026

जिद्दी सोनल दिनुशाने सामना वाचवला.

संथ झालेली खेळपट्टी, सोनल दिनुशाची अफलातून प्रदीर्घ खेळी आणि भारतीय गोलंदाजांच्यात दिसत नसलेले अतिरिक्त कौशल्य असा त्रिवेणी संगम दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी बघायला मिळाला. अथक मारा करून भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेचा दुसरा डाव संपवायला चार फलंदाजांना योग्य वेळेत बाद करायला यश आले नाही. पाचव्या दिवशी तब्बल ८२ षटके श्रीलंकन फलंदाजांनी तीन बळी जाऊन देत खेळून काढली. सोनल दिनुशाने सलग दुसऱ्या डावात शतक (नाबाद १३३ धावा) झळकावले आणि भारतीय संघाला शक्य वाटणाऱ्या कसोटी विजयापासून दूर ठेवले.

26/08/2026

आव्हान पेलत विजयाकडे वाटचाल!

साधारणपणे कसोटी सामन्यात पहिल्या तीन दिवसाच्या खेळावर बऱ्याच वेळा फलंदाजांचे राज्य असते आणि शेवटचे दोन दिवस गोलंदाज दादागिरी करतात असेच बघायला मिळाले आहे. नेमके उलटे चित्र दुसऱ्या कसोटीत बघायला मिळाले. चालू कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी खेळपट्टी जास्त प्रमाणात संथ झाल्याने भारतीय गोलंदाजांना एक एक श्रीलंकन फलंदाजाला बाद करायला घाम गाळावा लागला. पहिल्या डावात श्रीलंकेला २९० धावांमध्ये रोखून भारतीय कप्तानाने कसोटी जिंकायच्या प्रयत्नात फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात श्रीलंकन फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करत ६ बाद २२९धावा उभारल्या. श्रीलंकेच्या हाती १६ धावांची आघाडी जमा झाली असून उरलेले ४ फलंदाज लवकर बाद करून सामन्याच्या शेवटच्या दिवशी विजयी वाटचाल करायचा भारतीय संघाचा पक्का निर्धार आहे.

25/08/2026

श्रीलंकन फलंदाजांनी झुंज दिली

पसींदु सुरीयाबंदारा (८० धावा) आणि सोनल दिनुशाने दिलेल्या कडव्या लढतीमुळे भारतीय संघाला श्रीलंकेचा पहिला डाव संपवायच्या प्रयत्नात कष्ट करावे लागले. प्रसिध कृष्णा आणि मानव सुथारने परीक्षा बघणाऱ्या खेळपट्टीवर संयम राखत नेम धरून मारा केला. प्रसिध कृष्णा आणि मानव सुथारने ३-३ फलंदाज बाद केल्यानेच पहिल्या डावात श्रीलंकेला ८ बाद २६५ धावांमध्ये रोखण्यात भारताला यश आले. सोनल दिनुशाने सलग तिसऱ्या डावात खंबीर फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेतली. दोन वेळा पावसाने हजेरी लावल्याने भारतीय संघाच्या मनसुब्यांना धक्का लागला. सारांश जैनची गोलंदाजी निराश करणारी झाली.

24/08/2026

जयस्वालला शिक्षा आणि जुरेलचे शतक

कोलंबो कसोटी सामन्याचा दुसरा दिवस मजेचा झाला. एकीकडे मैदानावर केलेल्या चुकीची शिक्षा सामना अधिकाऱ्यांनी यशस्वी जयस्वालला सुनावली तर दुसरीकडे ध्रुव जुरेलने सुंदर फलंदाजी करत दुसरे कसोटी शतक झळकावले. रिषभ पंत बरोबर जुरेलने केलेली शतकी भागीदारी भारतीय संघाची सामन्यावरील पकड मजबूत करून गेली. फलंदाजांनी ५०० धावांचा डोंगर ओलांडून दिल्यावर भारतीय वेगवान गोलंदाजांनी काही धक्के श्रीलंकन फलंदाजांना दिले ज्याने दुसऱ्या दिवशीचा खेळ स्मरणीय झाला.

Photos from Sunandan Lele's post 24/08/2026

मदु नदीची बोट सफारी

गॉल कसोटी सामना संपल्यावर बेंटोटा गावी जाताना वाटेत मदु नदी लागते. या नदीचा पसारा मोठा आहे. मदु नदीत बोट सफारीला जाण्याचा अनुभव वेगळा होता. या नदीच्या पाक्षात ६० पेक्षा जस्त छोटी बेटं आहेत. यातील काही बेटांवर जाऊन वेगळे अनुभव घेता आले त्याची ही खास क्लीप.

24/08/2026

संधीचा फायदा असा घ्यावा

देवदत्त पडिक्कलला शून्य आणि १ धवेवर जीवदान लाभले. पण लक्षात घ्या की मिळालेल्या संधीचा फायदा त्याने कसा घेतला. लागोपाठ दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले त्याने. तेव्हढेच कौतुक असिथा फर्नांडोच्या दमल लावून केलेल्या वेगवान माऱ्याचे करायला लागेल. चांगली गो्ट अशी की ज्या खेळपट्टीचा इतिहास फक्त गोलंदाजांचे लाड करण्याचा आहे तिथे गोलंदाजांना जरा साथ लाभली आहे.

23/08/2026

रवींद्र जडेजा तू कमाल आहेस

तो बोलत नाही त्याची कामगिरी बोलते. तो गाजावाजा करत नाही की सोश मिडीयावर पोस्ट टाकत नाही पण त्याच्या फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातून त्याची महती आपल्याला समजते. होय रवींद्र जडेजा भारतासाठी जातिवंत अष्टपैलू खेळाडू म्हणून चोख काम करत आला आहे. त्याला आपण योग्य मान देतो का त्याच्या कामगिरीची दखल घेतो का हा प्रश्न क्रिकेट रसिक म्हणून आपण आपल्याला विचारला पाहिजे.

22/08/2026

खेळपट्टीचा इतिहास भीतीदायक.

जितकी मजा आनंद समाधान काही मैदानांवर कसोटी सामन्याचे वार्तांकन करताना मिळते तितकीच भिती काही मैदानांवर कसोटी सामना होणार म्हणल्यावर वाटते. गॉल मैदानाची खेळपट्टी फलंदाजांचे लाड करण्याबरोबर थोडी मदत गोलंदाजांनाही करत होती. म्हणून पहिल्या कसोटीत मजा आली. आता दुसरा कसोटी सामना कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्टस्‌ क्लबवर होणार आहे ज्याचा इतिहास फलंदाजांच्या तोंडाला पाणी सोडणारा तर गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणारा आहे. का ते थोडी आकडेवारी मांडतो म्हणजे तुम्हांला अंदाज येईल.

19/08/2026

मानव सुथारचा भेदक मारा

दिसायला सोपा वाटणाऱ्या कसोटी विजयाला हाती घ्यायला भारतीय संघाला ७७.४ षटकांचे कष्ट करावे लागले. कप्तान धनंजया डिसिल्वा आणि पहिल्या डावातील शतकवीर सोनल दिनुशाने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम शेवटच्या दिवशी गाळायला लावला. उपहाराअगोदर धनंजया डिसिल्वा बाद झाला आणि उपहारानंतर सोनल दिनुशा. त्या नंतरच विजयाचा मार्ग खुला झाला. मानव सुथारने दुसऱ्या डावात अचूक मारा करून ५५धावांमध्ये ६ श्रीलंकन फलंदाजांना बाद करून विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. उपहारानंतर पाऊण तासात श्रीलंकेचा दुसरा डाव २०६ धावांवर संपवला गेला आणि भारतीय संघाला १६५ धावांचा विजय हाती लागला.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune
411029