Trying to achive perfect looking sarvangasan
Lele Guruji Yoga Varga
Yoga class since 1976 Estd - 1976
29/05/2026
एकमेका सहाय्य करू, अवघे करु उग्रासन
02/05/2026
1 st may 1976 Lele Guruji Started Yogasan Varga.
Yesterday We celebrated out 50th anniversary.
07/04/2026
पाठीचा कणा लवचिक बनवा आणि आरोग्य जपा! 🐍 कालच्या योगाभ्यासात आम्ही 'वक्रासन' (Vakrasan) चा सराव केला.
केवळ शरीराला पीळ देणे इतकाच याचा अर्थ नसून, वक्रासनाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत:
पाठीचा कणा लवचिक बनवण्यासाठी उपयुक्त.
पोटातील अवयवांना चालना मिळते (पचनशक्ती सुधारते!).
कंबरेचा ताण आणि जडपणा कमी होण्यास मदत होते.
स्वतःला फ्रेश आणि निरोगी ठेवण्यासाठी वक्रासनासारखा उत्तम सराव नाही. 💪
#योगा #वक्रासन #आरोग्यसंपदा #लवचिकता #फिटनेस
मोफत योगोपचार शिबिर
५० वर्षांची योग परंपरा आणि तुमचे आरोग्य!
🧘♂️✨नमस्कार पुणेकर!
लेले गुरुजी योग वर्गाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आणि जागतिक आरोग्य दिनानिमित्त, सोहम् उन्नयन प्रतिष्ठान व लेले गुरुजी योग वर्ग आयोजित खास 'योगोपचार शिबिर'.
गेल्या ५० वर्षांपासून आरोग्याची सेवा करणाऱ्या आमच्या संस्थेतर्फे विविध व्याधींवर मात करण्यासाठी हे शिबिर नक्कीच उपयुक्त ठरेल.
📅 शिबिराचे वेळापत्रक:
दि. ७ एप्रिल (मंगळवार) • सकाळी ७:०० - उच्चरक्तदाब • सकाळी ८:०० - पचनविकार • सायंकाळी ६:०० - मधुमेह
दि. ८ एप्रिल (बुधवार) • सकाळी ७:०० - मान व खांदेदुखी • सकाळी ८:०० - पाठ व कंबरदुखी • सायंकाळी ६:०० - गुडघे व टाचदुखी
दि. ९ एप्रिल (गुरुवार) • सकाळी ७:०० - हृदयविकार • सकाळी ८:०० - श्वसनविकार • सायंकाळी ६:०० -
स्त्रीरोग 📍 स्थळ:
लेले गुरुजी योग वर्ग, दुसरा मजला, नेहरू स्टेडियम, पुणे - ४११००२.
📝 नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी:
तुमचे नाव आणि तुमची तक्रार खालील क्रमांकावर व्हॉट्सॲप (WhatsApp) मेसेज करा:
📞 8007873020 / 9049137500
चला, योगसाधनेतून निरोगी आयुष्याकडे एक पाऊल टाकूया!
#पुणे #योगोपचार #योगवर्गी
30/03/2026
'लेले गुरुजी योग वर्ग' हे १९७६ पासून पुण्यातील एक विश्वासाचे नाव आहे. आम्ही फक्त योगासने शिकवत नाही, तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो.
आमच्या ग्रुपमध्ये येऊन योगाचा आनंद घ्या! तुम्हाला शारीरिक ताकद हवी असेल किंवा मनाची शांती, आमच्या ५० वर्षांच्या अनुभवामुळे तुम्ही अगदी सुरक्षित हातांत आहात.
आमच्या नवीन बॅचेसमध्ये सामील व्हा:
✅ सम्यक योग – शरीराचा समतोल आणि लवचिकता वाढवण्यासाठी.
✅ प्राणायाम – श्वसनाद्वारे उत्तम आरोग्यासाठी.
✅ ध्यान – मन शांत करण्यासाठी आणि तणाव घालवण्यासाठी.
📍 ठिकाण: नेहरू स्टेडियम, पुणे.
आजच भेट द्या आणि आरोग्याकडे पहिले पाऊल टाका!
lelegurujiyogavarga.in
09/03/2026
मनावरचा ताण. शरीरातला कडवटपणा.
ट्रॅफिक, ऑफिसचा दबाव, फोन आणि स्क्रीन... हे सर्व दररोज तुम्हाला नकळत थकवत असतात.
योगामुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात, मज्जासंस्था शांत होते आणि मनातील विचारांचा वेग मंदावतो.
तुम्ही अधिक चांगला श्वास घेता. शांत झोप लागते. आणि तुम्हाला स्वतःला हलकं वाटू लागतं.
ताण फक्त 'मॅनेज' करू नका — तो मुळापासून संपवा.
आजच संपर्क साधा आणि तुमचा योगाचा प्रवास सुरू करा.
-8007873020
03/02/2026
प्रयत्नशैथिल्यानन्तसमापत्तिभ्याम् -
प्रयत्न – अवयवांची विशिष्ट हालचाल करण्यासाठी तसेच त्यांना स्थीर ठेवण्याकरता केलेले प्रयत्न, शैथिल्य - या वृत्तीला आवर घालणे आणि अनंत समापत्ती - माझे अस्तित्व फक्त या दृष्य देहापुरते नसून ते अनंत ब्रह्मांडरूप आहे असे चिंतन करणे.
आपण जेंव्हा प्राणायाम किंवा धारणा करण्याकरता सरळ बसतो तेंव्हा गुडघे जमिनिकडे ढकलून, पाठीचा कणा सरळ ठेवण्याकरता विशेष ताकद वापरावी लागते म्हणजेच प्रयत्न करावा लागतो. तसे बसणे ही आपली सहज प्रवृत्ती नसते. एखादी नृत्य मुद्रा करताना, ती अर्थपूर्ण आणि प्रभावी करण्याकरता शरीराच्या सामान्य स्थितीपेक्षा विशेष प्रयत्न करावा लागतो. अशा प्रकारच्या हालचालीत शरीराची सहज प्रवृत्ती सोडून त्याला काहीसे बांधून घातल्यासारखे किंवा विशिष्ट स्नायू आवळून धरुन ती हालचाल करावी लागते. उदा – पळायचे झाले तर कंबर, खांदे, पोट येथील स्नायू किंचित का होईना आवळून धरावे लागतात. चित्र रंगवणे, चेकवर सही करणे, रांगोळी काढणे, शस्त्रक्रिया करणे किंवा तत्सम कलात्मक कामे करताना, शरीराचे अन्य स्नायू किंचित आवळून स्थीर करुन धरावे लागतात; व त्यावेळी हात, डोळे, ओठ इ. स्नायू नियंत्रितपणे वापरावे लागतात.
थोडक्यात मनासह, स्नायू व अंतर्गत अवयवांना विशिष्ट प्रकारे आकुंचित करुन धरणे या प्रक्रियेला प्रयत्न म्हणता येईल.
शैथिल्य - अशाप्रकारचे प्रयत्न करणे सोडून देणे म्हणजे शैथिल्य होय. उदा आपण टि. व्ही पाहताना किंवा मित्रांशी गप्पा मारताना बसलेले असतो, तेंव्हा असे मनाला आणि स्नायूंना आवरण्याचे प्रयत्न करत नाही. त्याप्रमाणे प्राणायामाकरता किंवा धारणेकरता बसतानाही प्रयत्न न करता सहज बसावे. असे पतंजलींचे म्हणणे आहे.
विशेष टीपः प्रत्यक्षात मात्र ना पूर्ण शिथिलीकरण करुन चालत ना पूर्ण आवर घालून चालत, दोन्हीचा समतोल करावा लागतो आणि तरच योगातील पुढील अंगांचा म्हणजे प्राणायाम व धारणा सराव करणे सोपे होते.
आता हे अनंतावर ध्यान करणे म्हणजे काय व त्याचा आसनाशी काय संबध? याबाबत असे म्हणता येईल की, शरीर-मनाच्या स्तरावरच्या अडचणींकडे लक्ष गेले की त्यांची तीव्रता जास्त जाणवते व त्यांना स्थिर करणे कठीण होते. अशावेळी अनंतावर ध्यान म्हणजेच मोजता न येणाऱ्या विषयांवर, उदा: समुद्र, अनंत-ईश्वर, अनंत-आकाश, विश्वात असणाऱ्या अनेक सूर्यमाला, इ. विषयांवर ध्यान (एकाग्रता) केल्यास ही स्थीरता साधणे सोपे होते.
काही अभ्यासकांच्या मते, भगवान विष्णू शेषावर झोपलेले असताना, एकदा शंकरांचे नृत्य पाहण्यात दंग होते व त्यामुळे त्यांचे शरीर आनंदाने कंपित होत होते. मात्र ते पडू नयेत म्हणून शेषांनी त्यांना कसे स्थीर ठेवले याचे ध्यान करावे.
30/01/2026
46 - स्थिरसुखमासनम् -
ज्या (चल किंवा स्थीर) स्थितीत, स्थिरता व सुख यांचा अनुभव येतो त्याला आसन म्हणावे.
आसन विषय समजून घेण्याकरता काही महत्वाच्या मुद्द्यांचा क्रमवार विचार करुया –
1. सामान्यपणे आसन म्हणल्यावर आपल्याला सर्वांगासन, हलसान, भुजंगासन, इ. चित्र डोळ्यासमोर येतात, पण पतंजलींची आसनविषयक संकल्पना वेगळी आहे. येथे ते कोणतीच विशिष्ट शारीरिक स्थिती सुचवत नाहीत. (त्यांच्यामते) स्थिरतेचा आणि सुखाचा अनुभव देणारी कोणतीही स्थिती म्हणजे आसन होय. आपल्याला अनेक स्थितींमधे असा (स्थीर आणि सुख) अनुभव येतो, उदा: झोपाळ्यावर बसून सावकाश झोका घेत रहाणे, सकाळी जाग आल्यावर अंथरुणात लोळत पडणे, समुद्राकडे पहात बसणे, लयबध्द नृत्य करणे वा पहात असणे; तसेच हलासन, भुजंगासन, इ. आसनांतही हा अनुभव येऊ शकतो, पण अगदी थोड्यावेळापुरताच असतो. मुख्य म्हणजे या आसनात शरीरातील विविध क्रियांचा वेग, दिशा बदलते, तसेच शरीराच्या काही भागांवर ताण किंवा दाब असतो म्हणून फारवेळ सुखाचा अनुभव करणे शक्य होत नाही. मग आसन म्हणजे काय?
2. याचे उत्तर गीतेच्या 6 व्या अध्यायात आपल्याला सापडते. योगेश्वर म्हणतात - उपविश्यासने युऩ्जान --- ।।12।। समं काय शिराग्रीवं धारयन्नचलं स्थिर: ----- ।। 13।। अशा स्थितीत बसा ज्यामधे धड, मान व डोके एका रेषेत राहिल.. थोडक्यात आसन म्हणजे अशी स्थिती, ज्यामधे धड, मान व डोके एका रेषेत राहिल व खूप वेळ (किमान 40 मि. कमाल 3 तास) सुखाने व स्थीरपणे बसता येईल. या साऱ्या अटी पूर्ण करणारी मोजकी आसने आहेत, उदा: सुखासन, सिध्दासन, पद्मासन, स्वस्तिकासन, वज्रासन, इ.
3. मात्र, माझ्यामते पतंजलींना शारीरिक स्थितीपेक्षा मानसिक स्थिरतेची अपेक्षा आहे, कारण पतंजलींचा योग हा मनोमय कोषापाशी सुरु होतो. थोडक्यात पतंजली शरीराच्या विशिष्ट स्थितीबाबत सांगत नसून त्यांचा आग्रह सुखानुभव व चित्ताची (मनाच्या) स्थिरतेविषयी आहे.
4. अन्नमय कोष (स्थूल शरीर) कोणत्या स्थितीत आहे यापेक्षा प्राण, मन व बुध्दी (सूक्ष्म शरीर) कोणत्या स्थितीत आहे हे महत्वाचे आहे. थोडक्यात चित्ताची (मनाची व बुध्दीची) स्थिरता व सुखावस्था ही योगातील पुढील प्रगतीकरता महत्वाची आहे.
याचा अर्थ असा नाही की मुद्दा १ व २ मधील स्थितीत स्थिरतेचा आवश्यकताच नाही. प्राणायाम व धारणेच्या सरावाकरता या स्थूल शरीराच्या स्थिरतेचे फार महत्व आहे. मात्र शरीराच्या स्थिरतेचा अत्याग्रह नको तेथून मनाच्या स्थिरतेकडे उडी मारायची आहे म्हणून मुद्दा ३ व ४ स्पष्ट केले आहेत.
20/01/2026
योगाने चित्ताची (मन,बुध्दी व अहंकाराची), व्याकरणाने भाषेची व वैद्यकशास्त्राने शरीराची शुद्धी करण्याऱ्या तीनही शास्त्रांचे शास्त्रकार (प्रवक्ते) वंदनीय, पतंजली मुनींना, हात जोडून वंदन करुया. हीच तीन शास्त्रे का तर, योगमार्गामधे मुख्य प्रक्रिया आहे की आपली कर्मे ही शून्य होणे आवश्यक आहे आणि आपण सारेजण या तीन स्तरांवरुन सतत कर्म करत असतो. ती थांबवणे महाकठीण आहे, पण भगवान कृष्ण म्हणतात की प्रत्यक्ष कर्म करुनही ती अकर्म (त्यांना फल नाही) करता येतात. असे अकर्म करण्याची युक्ती पतंजली थोडक्यात सांगतात म्हणून ते वंदनीय आणि अनुकरणीय आहेत. त्यांची तत्वे अधिकाधिक समजून घेऊन ती अंगीकारणे हेच जीवनाचे धेय्य असावे.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Address
Nehru Stadium, Swargate
Pune
411030