Viraj Sports Academy

Viraj Sports Academy

Share

Viraj Sports Academy
Mallakhamb (Pole, Hanging, Rope)
Yoga
Fitness
Trekking

Pashan l Kothrud l Aundh

Vedanta sports academy carries out mallakhamb(rope, pole,hanging).fitness,yoga,trekking, we participate in and provide training for district, state,national, international level competitions.

31/03/2026

Photos from Viraj Sports Academy's post 09/08/2025

मल्लखांब फेडरेशन ऑफ जपानचे सचिव श्री. विवेक साबळे यांच्या पुढाकाराने भारत व जपान यांच्यामध्ये खेळाडू विनिमय कार्यक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत जपानी खेळाडूंना महाराष्ट्रातील तज्ज्ञांकडून मल्लखांबचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील प्रशिक्षक आणि खेळाडू टोकियोला जाऊन तेथील जपानी खेळाडूंना मल्लखांबचे प्रशिक्षण देत आहेत.

अलीकडेच जपानमधील खेळाडू श्री. शिनया हिरातसुका यांनी पुणे जिल्ह्यातील शिव छत्रपती पुरस्कार विजेते श्री. पंकज शिंदे यांच्याकडून विराज स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये सात दिवस मल्लखांबचे प्रशिक्षण घेतले. श्री पंकज शिंदे हे स्वतः अनुभवी प्रशिक्षक असून त्यांनी जपानी खेळाडूंना मल्लखांबचे मूलभूत प्रशिक्षण दिले.

श्री. शिनया हिरातसुका यांनी श्री. विवेक साबळे यांच्या समवेत पुणे जिल्ह्यातील विविध मल्लखांब संस्थांना भेट दिली. यामध्ये
विराज स्पोर्ट्स अकॅडमी
क्रिएटिव्ह स्पोर्ट्स फाउंडेशन
आर. एस. स्पोर्ट्स अकॅडमी
स्वधा स्कूल
विद्यांचल स्कूल यांचा समावेश होता.
या भेटीदरम्यान माजी आमदार श्री. दीपक पायगुडे यांनी जपानमध्ये मल्लखांबचा होत असलेला विकास आणि तेथील संस्कृतीविषयी उत्सुकतेने विचारणा केली. त्यांनी जपानी समाजात मल्लखांबला मिळणारा प्रतिसाद, तेथील प्रशिक्षण पद्धती, आणि भारतीय क्रीडापरंपरेची जपानमधील ओळख या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली.

जपानी विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. विवेक साबळे यांनी पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष श्री. सत्यजित शिंदे, कार्याध्यक्ष श्री. विनायक बापट, सचिव श्री. योगेश येवले, सदस्य डॉ. श्री. तुषार गुजर, आणि तांत्रिक समिती सदस्य श्री. पंकज शिंदे
यांचे मनःपूर्वक आभार मानले.

सदर उपक्रम भारत आणि जपान यांच्यातील सांस्कृतिक व क्रीडा संबंध अधिक दृढ करणारा ठरला असून,भविष्यात जपानमधील मल्लखांबचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने लवकरच पुण्यातील प्रशिक्षक व खेळाडूंचा जपान दौरा आयोजित करण्याचा मानस असल्याचे श्री. विवेक साबळे यांनी सांगितले.

Photos from Viraj Sports Academy's post 04/08/2025

दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी विराज स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे इंट्रा क्लब मल्लखांब स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत विराज अकॅडमीच्या तीन शाखांच्या (पाषाण, कोथरूड,औंध) ९० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धा विद्यांचल स्कूल औंध येथे घेण्यात आली. स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून फिटनेस इंडस्ट्री मधील नामवंत व्यक्ती आणि मल्लखांब खेळाडू सौ. गौरी सभासद व जपान फेडरेशन ऑफ मल्लखांब सचिव श्री. विवेक साबळे, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष श्री. सत्यजित शिंदे उपस्थित होते. पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे सचिव श्री. योगेश येवले यांचे मार्गदर्शन मिळाले. खजिनदार सोनाली भरेकर मोहित,सदस्य श्री डॉ. तुषार गुजर यांची मोलाची साथ लाभली.
स्पर्धेत आलेल्या पालकांनी मुलांचे कौतुक आणि अभिनंदन केले त्याचप्रमाणे सर्व पाहुण्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.



Photos from Viraj Sports Academy's post 23/06/2025

आज दिनांक २३ जून २०२५ रोजी जागतिक ऑलिंपिक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने स.प महाविद्यालय टिळक रोड येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी मल्लखांबातील छत्रपती पुरस्कार विजेते व पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे तांत्रिक समिती सदस्य श्री पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांता स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी मल्लखांबाची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांना प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे *क्रीडामंत्री माननीय श्री. दत्तात्रय (मामा ) भरणे* तसेच महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आयुक्त शितल तेली - उगले
उपसंचालक श्री सुधीर मोरे ,पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जगन्नाथ लकडे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव श्री नामदेव शिरगावकर यांनी भरभरून दाद दिली.
त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील ऑलिंपिक खेळाडू व अर्जुन पुरस्कार विजेते यांनी देखील खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमास पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते अध्यक्ष श्री सत्यजित शिंदे, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या खजिनदार सौ सोनाली मोहित, व पुणे जिल्हा मधलं काम संघटनेचे सदस्य डॉ. तुषार गुजर देखील उपस्थित होते. याप्रसंगी आपले अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव श्री नामदेव शिरगावकर यांची मल्लखांब खेळाच्या प्रगती संदर्भात साधकबाधक चर्चा झाली.

17/04/2024

Dear friends, Happy to tell you that Vedanta Academy and Sanskrit Vidya Mandir successfully did the Mallakhamb Demonstration in Ludhiana. On the occasion of Air Defance Regiment Raising Day.






13/03/2024

१० मार्च २०२४ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब निवड चाचणी स्पर्धेमध्ये आपल्या *वेदांता अकॅडमी* च्या खेळाडू कु. चिन्मयी टिळक आणि कु. अन्वी म्हसवडे या दोघींची अनुक्रमे १२ व १४ वर्षाखालील गटामध्ये दि. १७ मार्च २०२४ रोजी पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
तरी या दोघींचे मनः पूर्वक अभिनंदन..
आणि पुढील कामगिरी साठी शुभेच्छा 💐💐💐

Photos from Viraj Sports Academy's post 07/10/2023

Pune District Mallakhamb Selection 37th National Games 2023
Organized by and

Under the auspices of .

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Pashan Sus Road
Pune

Opening Hours

Monday 5pm - 8pm
Tuesday 5pm - 8pm
Wednesday 5pm - 7pm
Thursday 5pm - 8pm
Friday 5pm - 8pm
Saturday 5pm - 8pm