भटकंती करण्याच्या आवडीने नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळं पाहायला शिकवले खरे, पण या वेळी योग आला तो अगदी प्रागैतिहासिक स्थळ पाहण्याचा.
लोथल: अविष्कार म्हणण्यापेक्षा वैभवशाली भारताचे अतिशय प्राचीन काळात असलेलं अस्तित्व.
३००-४०० वर्षांएवढी जुनी असलेल्या मुबंईत राहताना, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी असलेली इकडची भली मोठी जुनी बंदरं पाहून मला जो अभिमान वाटतो, त्या अभिमानाची उंची पराकोटीला जाण्याचे कारण म्हणजे लोथल.
होय, अंदाजे ४००० ते ४५०० हजार वर्षांपूर्वी म्हणजेच कांस्ययुगात अस्तिवात असलेलं आशियातलं कदाचित पहिलं /पहिल्यापैकी असलेलं बंदर (डॉक). त्या काळात तिथे अद्यतनित असं मानवनिर्मित बंदर बांधले गेले जेथून आंतरराष्ट्रीय व्यापार होत असे. लोथल हे अलीकडच्या काळातील नाव, त्यावेळचे नाव, समजण्यासाठी तिथल्या शिलालेखनाचे अजून तरी भाषांतर झाले नाही.
लोथल हे ठिकाण आजच्या गुजरात राज्यातील, अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलका-बगोदरा तालुक्यात आहे, गाव -सारगवाला.
लोथल हे तत्कालीन सरस्वती नदीच्या समुद्राला मिळणाऱ्या व्यापारी प्रवाहाला जोडून वसवलेलं कृत्रिम बंदर आहे. ज्याची बांधणी अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे, भरती-ओहोटी च्या वेळी पाण्याची पातळी सारखी राहण्यासाठी बांधलेले पाण्याचे सांडवे आहेत, तसेच बंदराच्या बाजूला गोदामं, दुमजली घरांची वस्ती, पाण्याच्या विहिरी, रांजणे, सांडपाण्याचे उत्कृष्ट नियोजन, कारखाने, दफनभूमी (मृतदेहाचे सांगाडे ), भांडी, दाग-दागिने, यांचे अवशेष आजतागायत जशी च्या तशी आहेत.
नदीला आलेला पूर, किंवा दुष्काळ, पश्चिमकडे आटत गेलेला समुद्र अश्या अनेक कारणांमुळे ही संस्कृती लोप पावली गेली असावी.
१९२२ ला हडप्पा मोहनजोदरो संस्कृती चा शोध लागला, १९४७ ला तो भाग पाकिस्तानात गेला. परंतु नंतर पुरातत्व खात्यातील शाश्त्रज्ञ श्री. एस. आर. राव यांनी ही वसाहत १९५४ ते १९६० या दरम्यान उत्तखनन करून शोधून काढली आणि हडप्पा - सिंधू - सरस्वती कालीन संस्कृतीच्या शोधातील अजून पक्के असे धागेदोरे मिळायला सुरु झाले.
हा परिसर पाहताना अभिमान येतो खरा, पण छाती फुगून येते ते येथील 'लापीस लुझुली' आणि 'कारनेलियन ' चा व्यापाराचे अंश पाहताना. लापीस लुझुली (निळे) व कारनेलियन (तपकिरी) म्हणजे सोने चांदी, हिरे-मोती यांच्याही कितीतरी शतकं अगोदर शोधात आलेले महागडे दागिण्यांचे खडे, जे भारतातून निर्यात होत असत, इजीप्तच्या संस्कृतीतील जे 'फॅरो' होते त्यांच्या मुकुटात हे खडे असत.
तसेच भगवान श्री राम यांनी सीतामाईसाठी ओळख म्हणून हनुमानाला जी मुद्रिका दिली होती, तश्या मुद्रिकांचे संदर्भ देखील येथे सापडले गेले आहे.
जगाचा इतंभूत इतिहास लिहिला गेला असेल वा नसेल, लोकांनी तो वाचला असेल वा नसेल, परंतु भारत जगाच्या पाठीवर आपले अस्तिव टिकवून होता ह्याचा उघड पुरावा म्हणजे लोथल ची वसाहत.
अश्या ह्या अद्वितीय वसाहतीला भेट देणे म्हणजे, माझ्या भटकंतीतला सोन्याचा मुलामा असलेला मैलाचा दगड.
माझा मित्र डॉ. राहुल जाधव याच्या सुपीक बुद्धीतून निवडले गेलेलं हे ठिकाण, ते ठिकाण मी सुद्धा पाहावं हा अट्टाहास, आणि लोथलवर त्याचा असलेला ऐतिहासिक, भोगोलिक अभ्यास ह्यांच्या संयोगाने ही शिदोरी आपल्या माहितीसाठी घेऊ शकलो आहे.
आपलाच,
प्रविण सोमवंशी
🌷 *निसर्गप्रेमी* 🌷
दुर्गसंवर्धन संस्था, महाराष्ट्र.
Nisarg Premi निसर्ग प्रेमी
Nisarg Premi is trekking and outdoor activity group which aims to take people out of theimes and let them explore, experience the beauty of nature.
We do provide services like coporate outings, trips/tours, school trips, treks all over Maharashtra. Nisarg Premi means nature lovers, this is a trekking group for the passionate trekkers who loves to explore nature and love to do adventurous activities.
24/05/2024
भटकंती करण्याच्या आवडीने नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळं पाहायला शिकवले खरे, पण या वेळी योग आला तो अगदी प्रागैतिहासिक स्थळ पाहण्याचा.
लोथल: अविष्कार म्हणण्यापेक्षा वैभवशाली भारताचे अतिशय प्राचीन काळात असलेलं अस्तित्व.
३००-४०० वर्षांएवढी जुनी असलेल्या मुबंईत राहताना, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी असलेली इकडची भली मोठी जुनी बंदरं पाहून मला जो अभिमान वाटतो, त्या अभिमानाची उंची पराकोटीला जाण्याचे कारण म्हणजे लोथल.
होय, अंदाजे ४००० ते ४५०० हजार वर्षांपूर्वी म्हणजेच कांस्ययुगात अस्तिवात असलेलं आशियातलं कदाचित पहिलं /पहिल्यापैकी असलेलं बंदर (डॉक). त्या काळात तिथे अद्यतनित असं मानवनिर्मित बंदर बांधले गेले जेथून आंतरराष्ट्रीय व्यापार होत असे. लोथल हे अलीकडच्या काळातील नाव, त्यावेळचे नाव, समजण्यासाठी तिथल्या शिलालेखनाचे अजून तरी भाषांतर झाले नाही.
लोथल हे ठिकाण आजच्या गुजरात राज्यातील, अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलका-बगोदरा तालुक्यात आहे, गाव -सारगवाला.
लोथल हे तत्कालीन सरस्वती नदीच्या समुद्राला मिळणाऱ्या व्यापारी प्रवाहाला जोडून वसवलेलं कृत्रिम बंदर आहे. ज्याची बांधणी अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे, भरती-ओहोटी च्या वेळी पाण्याची पातळी सारखी राहण्यासाठी बांधलेले पाण्याचे सांडवे आहेत, तसेच बंदराच्या बाजूला गोदामं, दुमजली घरांची वस्ती, पाण्याच्या विहिरी, रांजणे, सांडपाण्याचे उत्कृष्ट नियोजन, कारखाने, दफनभूमी (मृतदेहाचे सांगाडे ), भांडी, दाग-दागिने, यांचे अवशेष आजतागायत जशी च्या तशी आहेत.
नदीला आलेला पूर, किंवा दुष्काळ, पश्चिमकडे आटत गेलेला समुद्र अश्या अनेक कारणांमुळे ही संस्कृती लोप पावली गेली असावी.
१९२२ ला हडप्पा मोहनजोदरो संस्कृती चा शोध लागला, १९४७ ला तो भाग पाकिस्तानात गेला. परंतु नंतर पुरातत्व खात्यातील शाश्त्रज्ञ श्री. एस. आर. राव यांनी ही वसाहत १९५४ ते १९६० या दरम्यान उत्तखनन करून शोधून काढली आणि हडप्पा - सिंधू - सरस्वती कालीन संस्कृतीच्या शोधातील अजून पक्के असे धागेदोरे मिळायला सुरु झाले.
हा परिसर पाहताना अभिमान येतो खरा, पण छाती फुगून येते ते येथील 'लापीस लुझुली' आणि 'कारनेलियन ' चा व्यापाराचे अंश पाहताना. लापीस लुझुली (निळे) व कारनेलियन (तपकिरी) म्हणजे सोने चांदी, हिरे-मोती यांच्याही कितीतरी शतकं अगोदर शोधात आलेले महागडे दागिण्यांचे खडे, जे भारतातून निर्यात होत असत, इजीप्तच्या संस्कृतीतील जे 'फॅरो' होते त्यांच्या मुकुटात हे खडे असत.
तसेच भगवान श्री राम यांनी सीतामाईसाठी ओळख म्हणून हनुमानाला जी मुद्रिका दिली होती, तश्या मुद्रिकांचे संदर्भ देखील येथे सापडले गेले आहे.
जगाचा इतंभूत इतिहास लिहिला गेला असेल वा नसेल, लोकांनी तो वाचला असेल वा नसेल, परंतु भारत जगाच्या पाठीवर आपले अस्तिव टिकवून होता ह्याचा उघड पुरावा म्हणजे लोथल ची वसाहत.
अश्या ह्या अद्वितीय वसाहतीला भेट देणे म्हणजे, माझ्या भटकंतीतला सोन्याचा मुलामा असलेला मैलाचा दगड.
माझा मित्र डॉ. राहुल जाधव याच्या सुपीक बुद्धीतून निवडले गेलेलं हे ठिकाण, ते ठिकाण मी सुद्धा पाहावं हा अट्टाहास, आणि लोथलवर त्याचा असलेला ऐतिहासिक, भोगोलिक अभ्यास ह्यांच्या संयोगाने ही शिदोरी आपल्या माहितीसाठी घेऊ शकलो आहे.
आपलाच,
प्रविण सोमवंशी
🌷 #निसर्गप्रेमी 🌷
दुर्गसंवर्धन संस्था, महाराष्ट्र.
06/07/2022
. 🌷🍃 #निसर्गप्रेमी 🍃🌷
🌊 #अंधारबन_देवकुंड_एक_प्राणघातक_सापळा 🌊
पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे सौंदर्य अगदी मनमोहून टाकते आणि प्रत्येकाला वेड लागते ते पावसाळी भटकंतीचे. आपल्यापासून काही अंतरावर असलेली पर्यटन स्थळे, गड-किल्ले, धबधबे अनेक पर्यटकांना-भटक्यांना खुणावत असतात. परंतु काही स्थळांना भेट देताना तेथील भौगोलिक परिस्थिती सध्या काय आहे याबद्दल माहिती मिळवूनच तेथे भटकंती साठी जावे. असाच पुण्यापासून जवळच असलेल्या देवकुंड व अंधारबन परिसर नेहमी पावसाळी आकर्षणाचा विषय असतो. बहुतांशी हौशी भटक्यांना तेथील भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्यापेक्षा हा ट्रेक अतिवृष्टीत कसा करता येईल याकडे कल असतो. विविध माध्यमातून प्रसारित होणाऱ्या जाहिराती तर अक्षरशः वेडावून टाकतात. हा परिसर अत्यंत सुंदर आहे यात तिळमात्र शंका नाही पण अशा ठिकाणांची भटकंती ही भौगोलिक परस्थिती पाहूनच करायला हवी.
ताम्हिणी घाट, देवकुंड व अंधारबन परिसरातील होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तिथल्या ओढ्यां-नाल्यांचा प्रवाह काही अवधीत धोकादायक पातळीवर पोहचतो व अचानक बदलेल्या परिस्थितीचा अंदाज सहजासहजी येतही नाही आणि अशा अचानक उद्भवलेल्या कठीण परिस्थितीला कसे सामोरे जावे याचे ज्ञान व अत्यावश्यक असणारी साधनसामुग्री नसल्यामुळे पर्यायी अनेक अपघात होतात, शिवाय काही जणांना तर जीवाशी मुकावे लागते (दरवर्षी हा आकडा वाढतच असतो). मग अशी जीवघेणी भटकंती कशाला हवे? व अशा अतिउत्साही पर्यटकांमुळे हा परिसरही हकनाक बदनाम होतो त्याचे काय?
देवकुंड व अंधारबन परिसरात भटकंती करण्यापूर्वी अधिक सतर्क होणे गरजेचे आहे. शिवाय परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व गिर्यारोहण संस्थांनीही सुरक्षिततेचे सगळे निकष कटाक्षाने पाळायला हवेत, ज्या ठिकाणी धोका संभवतो अशा ठिकाणांपासून त्यांनी माघार घेऊन ग्रुपच्या सुरक्षिततेचा विचार प्रामुख्याने करायला हवा. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शक्यतो हा ट्रेक टाळावा. शिवाय इतर ठिकाणी भटकंती करताना ओढे-नाले ओलांडताना सुरक्षिततेची संपुर्ण खात्री करावी. परिस्थिती विपरीत असेल तर वेळीच माघार घ्यावी. निसर्गाचा आदर हाच भटकंतीचा खरा मूलमंत्र आहे.
अंधारबन व देवकुंड परिसरात पावसाळ्यात असणारा धोका व तेथील सत्य परिस्थिती याची अभ्यासपूर्ण माहिती फोटोद्वारे श्री. Ninad Bartakke यांनी मांडली आहे. प्रत्येकाने भटकंतीपूर्वी अवश्य पहावी व आवश्यक ती काळजी घ्यावी.
(ग्राफिक्स बद्दल श्री. Ninad Bartakke यांचे विशेष आभार)
✍🏻 समीर शेख
06/03/2022
~ संजीवनीचे स्थापत्यशास्त्र ~
Sanjivani machi -map ( rajgad fort )
(Zoom it for more details)
गुंजवणी,कानंदी,वेळवंडी आदी नद्यांच्या खो-यात स्वपराक्रमाच्या कथा व शिपराक्रमाच्या गाथा साांगत ताठ मानेने उभा असलेला किल्ले राजगड शिवछत्रपतींच्या दुर्गस्थापत्य शास्त्राचे सर्वोत्कृष्ट असे उदाहरण आहे.पद्मावती,सुवेळा,संजीवनी अशा माच्यांनी बेलाग आणि दुर्गम बनलेल्या याच दुर्गाच्या अंगी स्थापत्यशास्त्राचा एक लढाऊ आणि तितकाच देखणा अलंकार एका स्थापत्यविषारद राजाने मोठ्या गौडकौतुकाने चढवला आहे तो म्हणजे -संजीवनी
मुरूंबदेवाच्या पश्चिमेकडील एका धावत जाणा-या डोंगरसोंडेवर भल्याभल्यांची मती गुंग करणारा संजीवनी नावाच्या स्थापत्यशास्त्राचा एक सर्वोत्तम आराखडा ऐन डोंगरकड्यांवर मोठ्या कुशलतेने रेखाटला गेला आहे.
साधारण तीन टप्प्यांत उतरणा-या या माचीचे बांधकाम शत्रूसैन्यासाठी एक खास भूलभुलैया असून तट,बुरूज,चिलखती बुरूज, नाळ,माची,फांजी,जंग्या,दरवाजे,चोर दरवाजे अशा नानाविध दुर्गवैशिष्ट्यांनी इथला कोपरा आणि कोपरा अतिशय मजबूत केला गेला आहे. या माचीच्या तीनही टप्प्यांवर असणारी खास आणि स्वतंत्र अशी लढाऊ ,जीवनोपयोगी आणि प्रशासकीय रचना या माचीचे खास वैशिष्ट्यच असून एका दुर्गप्रेमी राजाच्या दुर्गस्थापत्यावर खास पैलू टाकणारी आहे.
राजांनी राजगड घडवला अस आपण नेहमीच म्हणतो परंतू राजांनी ऐन उमेदीत अगदी जीव लावून साकारलेल्या त्यांच्या या पहिल्या राजधानीचे अंगप्रत्यय त्यांच्याच दुर्ग नजरेतून पाहिलं की राजांनी राजगडावर मनापासून प्रेम देखील केलं याची प्रचिती हे विस्मयजनक बांधकाम पाहिले की जागोजागी यायला लागते .
~अmit निंबाळकर
#राजगड_म्हणजे_प्रेम 💗
देश अपना है, गंदा भी हम ही करेंगे,
ना जाने ये मानसिक्ता कब जायगी लोगो के ज़हन से...
हमारी तो आप सुनते ही नही, कम से कम इस वर्दी वाले की सुन लो जो दिन रात लगा रहता है, सिर्फ हमारी मदद करने के लिए.
Please, please, please don't pollute our beautiful country!!
Don't be just a tourist, be a responsible traveller!!
सध्या ट्रेकिंग चे फॅड वाढले आहे आणि त्यात बेफिकीरीमुळे अपघात वाढत आहेत. एक जबाबदार ट्रेकर म्हणून गडकिल्ले फिरतांना काय खबरदारी घेतली पाहिजे, हे जाणून घ्या निसर्गप्रेमी परिवार, महाराष्ट्र यांचे वरिष्ठ सदस्य आणि कायदेशीर सल्लागार अँड. श्री. फिरोज तांबोळी सरांकडून Radio City 95 FM वर RJ सतरंगी ऋचा सोबत.
17/02/2021
⚠️ सध्या ट्रेकिंग चे फॅड वाढले आहे आणि त्यात बेफिकीरीमुळे अपघात वाढत आहेत. एक जबाबदार ट्रेकर म्हणून गडकिल्ले फिरतांना काय खबरदारी घेतली पाहिजे, हे जाणून घ्या #निसर्गप्रेमी परिवार, महाराष्ट्र यांचे वरिष्ठ सदस्य आणि कायदेशीर सल्लागार अँड. श्री. फिरोज तांबोळी सरांकडून 95 FM Radiocity वर 1 वाजता
ंगीऋचा सोबत.
#निसर्गप्रेमी
14/12/2020
हिरव्यागार वनराईतून नागमोडी जाणारे रस्ते, डोंगर कपारीतून वाहणारे झरे आणि यातूनच फेसाळत कोसळणारे धबधबे, हिरवेगार जंगले व त्यातील अनोखी जीवसृष्टी, धुक्याची झालर व त्यातून हळुवारपणे डोकावणारी सूर्यकिरणे, आणि सभवताली ताठ मानेनं डौलात उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या अथांग पर्वतरांगा. अशा ही आल्हाददायक भटकंती म्हणजे सारं काही मनाचा, शरीराचा थकवा घालवणारं असंच.💞
रोजच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही ऊर्जा हवी असेल तर एकदा तरी ह्या सहयाद्रीच्या कुशीत सहकुटुंब भटकंती करायला हवीच. सहयाद्रीच्या कुशीत नेहमी हुंदडत असताना एक गुज मला समजले, कोणत्याही गडकिल्ल्यावर अथवा सहयाद्रीच्या कुशीत कोठेही शांत विसावलो की काही क्षणातच तेथील हळूवारपणे येणारी वाऱ्याची झुळुक, किलबिलणारे पक्षी, झाडावरील पाने-फुले, खळखळून वाहणारे झरे व साक्षात सह्याद्री आपल्याशी बोलू लागतो. वेगवेगळे पैलू उलगडून आपल्या समोर ठेवतो, चोरवाटा दाखवतो, वेगवेगळी डोळ्यांची पारने फेडणारी विहंगम दृश्य दाखवतो, निसर्गाच्या विविध किमया व छटा पसरवतो. यासोबतच आपला स्फूर्तिदायी इतिहासही सांगतो. एवढं काही न मागता मिळून जाते की आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाल्याखेरीज राहत नाही.
आपला लाडका सहयाद्री केवळ मार्गदर्शकाची भूमिका न बजावता तो तुमची काळजी ही तितकिच घेतो. बस या मोबदल्यात आपणही या सुंदर निसर्गाला सांभाळायला नको का ???
✍🏻 समीर शेख
निसर्गप्रेमी परिवार, महाराष्ट्र.
#मधु_मकरंदगड
हिरवाईने नटलेल्या आणि दवबिंदूंनी ओथंबलेल्या डोंगररांगा, डोंगराच्या आसऱ्याने संथ-निखळपणे वाहणाऱ्या नागमोडया नद्या, इतिहासाचे सुवर्ण पान लिहिलेला रडतोंडीचा घाट, जावळीचं खोरं अन घनदाट-किर्रर्र जंगलातून जाणारी एकेरी वाट, बोचऱ्या थंड वाऱ्याची सुंदर अशी साथ...
या सर्वांच्या सोबतीने केलेला आडवाटेवरचा एक भन्नाट ट्रेक, प्लेझर वरून १७० किमीचा प्रवास, स्वर्गही थोटका वाटेल असं भरगच्च मिळाल्यावर एखाद्या भटक्याला अजून काय हवं 💖💖💖
10/12/2020
#सोनजाई
सहयाद्रीच्या कुशीत वसलेले आणि दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरात आणि परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. महाबळेश्वर-पाचगणीच्या वाटेवर असलेले हे शहर स्ट्रॉबेरीच्या आंबट-गोड स्वादासोबत येथील निसर्ग, ऐतिहासिक पाऊलखुणा आणि आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक, निसर्गप्रेमीची नेहमीच वर्दळ असते. तरीही काही ठिकाणे अजूनही दुर्लक्षित आहेत. स्थानिक लोक सोडले तर बाहेरच्या पर्यटकांना ही ठिकाणे क्वचितच माहीत असतील, त्यातीलच एक ठिकाण म्हणजे "सोनजाई". वाई शहरात प्रवेश करताच पूर्व-पश्चिम पसरलेली एक छोटीशी डोंगररांग नजरेस पडते. याच डोंगरांगेच्या पूर्वेकडील भागाकडे "वैराटगड" आणि पश्चिम भागाकडे पाचगणी शहर वसलेले आहे. हीच डोंगररांग सोनजाईचा डोंगर म्हणून या परिसरात ओळखली जाते.
सोनजाई डोंगराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते - "मछिंद्रनाथांनी गोरक्षाच्या झोळीतील श्रीलंकेहुन आणलेली एक सोन्याची वीट ही कृष्णा नदीच्या पात्रात फेकून दिली, साधू-संतास संपत्तीचा मोह नसावा असा त्यांचा हेतू होता. परंतु यामुळे गोरक्ष हे मछिंद्रनाथांवर संतापले, मछिंद्रनाथांनी प्रतिउत्तरादाखल वाई शहराच्या पूर्व-पश्चिम पसरलेला संपूर्ण डोंगरच सोन्याचा केला आणि "तुला हवं तेवढं सोनं घे" असे सांगितले. यावर गोरक्षांना त्यांची चूक समजली व त्यांनी मछिंद्रनाथांची माफी मागितली. ज्याठिकाणी सोन्याची वीट फेकली ते ठिकाण म्हणजे ओजर्डे गावाजवळील कृष्णा नदीचा "सोनेश्वर डोह" आणि सोन्याचा केलेला डोंगर म्हणजेच "सोनजाईचा डोंगर".
सोनजाईच्या डोंगरावर मुख्य सोनुबाई/सोनजाई व काळूबाई असे दोन मंदिरे आहेत, शिवाय नाथपंथीय भिक्षुक गोसावी समाजाचा मठही आहे. प्रमुख सोनजाईचे मंदिर हे डोंगराच्या मध्यभागी खडकात खोदलेल्या व वरती लाकडी दुसरा मजला असलेल्या बंदिस्त वाड्यात आहे. सोन्याच्या डोंगरावर असलेली देवी ती म्हणजे "सोनजाई" म्हणून ओळखली जाते. बाजूलाच पाण्याचे खोदीव खांब टाकं आहे (बारमाही येथे पाणी असते). खडकातील ह्या लेण्या नाथपंथीयापूर्वी बौद्धसंप्रदायाच्या भिक्षुकांसाठी बांधल्या असाव्यात (इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील) असा तर्क लावला जातो. सहयाद्रीची ही डोंगररांग म्हणजे त्याकाळी देशातून कोकणात आणि कोकणातून देशात ये-जाण्यासाठीचे प्रवेशव्दारच, त्यामुळे वाटसरू, व्यापारी यांच्यासाठी पाण्याचे टाकं आणि खडकातील खोल्या(लेण्या) मुक्कामासाठी कदाचित बांधलेल्या असाव्यात.
डोंगराच्या पश्चिमबाजूस चिंचोळ्या कड्याचा आधार घेत काळूबाईचे मंदिर डौलदार पणे उभे आहे. वाई शहरातून हेच मंदिर डोंगराचा जणू मुकुटमणी आहे असे भासते. काळूबाई मंदिराच्या मागील बाजूस एक दरीवजा खिंड आहे. याबद्दलही एक दंतकथा सांगितली जाते - कृष्णा नदी ही दक्षिण वाहिनी करण्याचा निश्चय भीमाने केला होता. देवीने एक अट भीमाला घातली की हे काम कोंबडा आरवायच्या आत पूर्ण व्हायला हवे. भीमाने केवळ एकच खोरे मारले इतक्यात कोंबडा अरवला आणि त्याचा संकल्प अधुरा राहिला. काळुबाई देवीने मुद्दामून लवकर कोंबडा आरवून याच्यामध्ये घाट घातला कारण नदीचा प्रवाह नैसर्गिक असावा अशी देवीची इच्छा होती. याच छोट्या दारीला "भीमाचे खोरे" म्हणून ओळखले जाते. डोंगराच्या इतर भागात मठातील लोकांची शेती, स्मशानभूमी, जनावरांचा गोठाही आहे. बावधनच्या प्रसिद्ध बगाडासाठी येथूनच बैल जोडी पाठवली जाते.
सहयाद्रीतील ही डोंगररांग निसर्गाची जणू चौफेर उधळण करत आहे असेच भासते. येथून पांडवगड, केंजळगड, रायरेश्वरचे पठार, वैराटगड, चंदन-वंदन, मांढरदेवी सहज नजरेस पडते. धोम धरण, नागेवाडीचे धरण आणि सोबतच वाईचा परिसर नितांत सुंदर दिसतो.
वाई किंवा बावधन मार्गे ४५ मिनिटांची चढाई केल्यानंतर अबाल-वृद्धांना सहज जाता येईल असे हे ठिकाण आहे. निसर्गाचा आनंद मनमुराद लुटण्यासाठी आणि पौराणिक/ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी नक्कीच या ठिकाणास एकदा तरी भेट द्यायला हवी.
✍🏻 समीर शेख
निसर्गप्रेमी परिवार, महाराष्ट्र.
Pic Courtesy: @रोहित मुंगसे ❣️
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
490, Sh*tole States, Flat No 1, Opposite Gadgil School, Shaniwar Peth
Pune
411030